Lokmat Agro >शेतशिवार > मक्यावर अमेरिकन लष्करी अळी आली आहे? कसे कराल व्यवस्थापन

मक्यावर अमेरिकन लष्करी अळी आली आहे? कसे कराल व्यवस्थापन

American fall armyworm on maize? How to control | मक्यावर अमेरिकन लष्करी अळी आली आहे? कसे कराल व्यवस्थापन

मक्यावर अमेरिकन लष्करी अळी आली आहे? कसे कराल व्यवस्थापन

सदर कीड बहुभक्षी असून ८० पेक्षा जास्त वनस्पतींवर उपजिविका करते. परिणामी सर्वच हंगामामध्ये किडीसाठी यजमान वनस्पती सहजपणे उपलब्ध होतात.

सदर कीड बहुभक्षी असून ८० पेक्षा जास्त वनस्पतींवर उपजिविका करते. परिणामी सर्वच हंगामामध्ये किडीसाठी यजमान वनस्पती सहजपणे उपलब्ध होतात.

शेअर :

Join us
Join usNext

महाराष्ट्रात मागील दोन ते तीन वर्षांपासून अमेरिकन लष्करी अळी (फॉल आर्मीवर्म शास्त्रीय नाव-स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा कीड मका पिकावर सतत मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव करताना आढळते आहे. भारतात जुन जुलै, २०१८ मध्ये सर्व प्रथम तमिळनाडू व दक्षिण कर्नाटकातील काही जिल्ह्यामध्ये या किडीची नोंद झाली. तदनंतर झपाट्याने या किडीचा प्रसार शेजारील आंध्रप्रदेश व तेलंगना या राज्यात झालेला दिसून आला. महाराष्ट्रात तांदुळवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे प्रथमतः या किडीचा प्रादुर्भाव झाला होता. जवळपास सर्वच मका उत्पादक जिल्ह्यात या किडीचा प्रादुर्भाव होतांना दिसुन येतो आहे.

सदर कीड बहुभक्षी असून ८० पेक्षा जास्त वनस्पतींवर उपजिविका करते. परिणामी सर्वच हंगामामध्ये किडीसाठी यजमान वनस्पती सहजपणे उपलब्ध होतात. ही कीड मका, मधुमका, ज्वारी, बाजरी, भात ही तृणधान्य पिके तसेच कापूस, सोयाबीन, ऊस या पिकाना देखील मोठ्या प्रमाणावर आदुर्भाव करते त्यामुळे वेळीच तिचे व्यवस्थापन होणे गरजेचे आहे.

ओळख व जीवनक्रम

पतंग
नर पतंगाचे पुढील पंख करड्या व तपकिरी रंगाचे असून पंखाच्या टोकाकडे व मध्यभागी पांढरे ठिपके असतात. तर मादी पतंगाचे पुढील पंख पूर्णपणे करड्या रंगाचे असतात. नर व मादी पतंगाचे मागील पंख चमकदार पांढरे असून कडा करड्या रंगाच्या असतात. पतंग निशाचर असून ७ ते १२ दिवस जगतात. उष्ण व दमट वातावरणात ते खुपच सक्रीय असतात.
अंडी
मादी पतंग पानांच्या वरच्या किंवा खालील बाजूस पोग्यामध्ये पिवळसर सोनेरी घुमटाकार १०० ते २०० अंडी पुजंक्यामध्ये घालते. त्यावर लोकरीसारखे मऊ सरक्षक आवरण असते. अंडी अवस्था २ ते ३ दिवसाची असते.
अळी
अळी अवस्था पिकाला प्रत्यक्ष नुकसान करणारी असल्यामुळे ती ओळखतांना पुढील खुणा लक्षात ठेवाव्यात. पूर्ण वाढलेली अळी ३.१ ते ३.८ से.मी. लांब असते. अळीचा रंग फिकट हिरवा ते जवळपास काळा असतो. पाठीवर फिकट पिवळ्या रंगाच्या तिन रेषा असतात. डोक्यावर उलट्या इंग्रजी V अक्षरासारखी खुण असते तर कडेने लालसर तपकिरी पट्टा असतो. शरीरावरील आठव्या खंडावर चौकोनी आकारात फुगीर गोल अंडी अथवा फिकट रंगाचे चार ठिपके दिसुन येतात. अळीच्या शरीरावर इतरत्र कुठेही अशी ठेवण दिसत नाही. या दोन बाबींवरूनच प्रामुख्याने या प्रजातीची ओळख करता येणे सोपे होते. सामान्य लष्करी अळीचे शरीर तपकिरी असले तरी बहुतांश अळीची पाठ हिरवट असते व अशा अळीच्या पाठीवर फुगीर ठिपके गडद रंगा ऐवजी हलक्या रंमार्च असतात. अळी अवस्था सहा टप्यामध्ये पूर्ण होते. अळी अवस्था उन्हाळ्यात १४ दिवसाची तर हिवाळ्यात किंवा थंड वातावरणात ती ३० दिवसापर्यंत असू शकते.
कोष
कोषावस्था जमिनीत २ ते ८ सें.मी. खोलीवर मातीच्या आवेष्टनात आढळते. कोष लालसर - तपकिरी रंगाचे असतात. कोषावस्था ९ ते ३० दिवसांपर्यंत असू शकते. अशा प्रकारे ३२ ते ४६ दिवसामध्ये किडीचा एक जीवनक्रम पूर्ण होतो. सतत पाऊस आणि ढगाळ हवामान सतत एक आठवड्यापर्यत राहिल्यास किडीची मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून येते.

नुकसानीचा प्रकार

लष्करी अळीचा प्रादूर्भाव मका पिकावर सर्वच अवस्थांमध्ये आढळून येतो. अळ्या-सुरुवातीस समुहाने राहतात पानांचा पृष्ठभाग खरबडून खातात. पहिल्या व दुसऱ्या अवस्थेतील अळ्यांनी पानांचा हिरवा पापुद्रा खाल्ल्यामुळे पानांवर पांढरे चट्टे पडल्याचे दिसते. मोठ्या झाल्यावर अळ्या स्वतंत्रपणे पिकाचे नुकसान करतात. तिसऱ्या अवस्थेतील अळ्या पोंग्यामध्ये शिरून पाने खायला सुरुवात करतात. त्यामुळे पोग्यांतून बाहेर आलेल्या पानांवर एका रेषेत एकसमान छिद्रे दिसून येतात. पाचव्या अवस्थेतील अळी पोंग्यामध्ये राहून पाने खात असल्याने मोठ्या आकाराची छिद्रे दिसतात. तर सहाव्या अवस्थेतील अळी अतिशय खादाड असून अधाशीपणे पाने खाते व पोंग्यामध्ये मोठ्या प्रमाणात विष्टा टाकलेली आढळते या अवस्थेत मक्याची पाने झडल्यासारखी दिसतात. ही कीड स्वजातीय भक्षक असल्यामुळे एका पोंग्यांत एक किंवा दोनच अळ्या आढळून येतात. बऱ्याच वेळा अळी कणसाच्या बाजूने आवरणास छिद्रे करून आतील दाणे देखील खाते.

प्रादुर्भाव वाढण्याची कारणे
प्रवास क्षमता या किडीचा पतंग एका रात्रीत सुमारे १०० कि.मी. पर्यंत तर वायाचा वेग अनुकूल राहिल्यास ३० तासात १६०० कि.मी. पर्यंत गेल्याची नोंद आहे. यामुळे दुर्गम भागातील मका पिक शोधून तिथेही सहजपणे अंडी घालू शकत असल्याने जवळपास सर्वच जिल्ह्यात मका पिकावर या किडीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे.

उच्च प्रजनन दर
या किडीचे जीवनचक्र वर्षभर चालू असते. सदर किडीची प्रजनन क्षमता प्रचंड असून मादी तिच्या जीवनक्रमात सुमारे एक ते दोन हजार अंडी घालते व त्यामुळे अल्पावधीतच किडीच्या संख्येत प्रचंड वाढ होते.

सद्य स्थितीत पिक अवस्थेनुरूप करावयाचे व्यवस्थापन

- पिकाचे आठवड्यातून किमान दोनवेळा नियमित सर्वेक्षण केल्यास वेळीच अळीचा प्रादूर्भाव ओळखणे शक्य होते.
- कामगंध सापळ्यांचा वापर मक्यावरील लष्करी अळीच्या सर्वेक्षणासाठी एकरी ५ कामगंध सापळे वापरावेत. या कामगंध सापळ्यांमध्ये ३ पतंग प्रती सापळा आढळून आल्यास ट्रायकोग्रामा प्रीटीओसम किंवा टीलेनोमस रेमस यांनी परोपजीवग्रस्त केलेली ५०,००० अंडी प्रती एकर या प्रमाणात एक आठवड्याच्या अंतराने ३ वेळा शेतात प्रसारण करावे.
- प्रकाश सापळ्यांचा वापर किडीचे पतंग मोठ्या प्रमाणावर आढळून येत असल्यास, प्रकाश सापळ्यांचा वापर करून पतंग पकडावेत व रॉकेल मिश्रित पाण्यात बुडवून मारावेत.
- किडीचे अंडीपुंज व जास्तीत जास्त अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात.
- किडीचे पर्यायी खाद्य तणे जसे हराळी (सायनोडॉन डॅक्टीलांना) सिंगाडा (बकव्हीट), डिजीटेरीया प्रजाती (कॅबग्रास) इ. वेळोवेळी काढून नष्ट करावीत.
- पिकाची काढणी लवकर करावी त्यामुळे नंतरच्या हंगामातील किडीच्या प्रादुर्भावातून सुटका होईल.
- प्रत्यक्ष शेताचे निरीक्षण करताना शेतात नागमोडी किंवा इंग्रजी W अक्षरासारखे फिरून पाच ठिकाणे व २० झाडे किंवा दहा ठिकाणे व १० झाडे निवडावीत. समजा २० झाडांपैकी २ झाडे प्रादुर्भावीत असतील तर नुकसान पातळी १० टक्के आहे असे समजावे व अर्थिक नुकसान संकेत पातळी लक्षात घेऊन त्वरित उपाययोजना कराव्यात.

कृषी विभाग
महाराष्ट्र शासन

 

Web Title: American fall armyworm on maize? How to control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.