बार्शी : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती ही भुसार मालाची उतार पेठ म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे.
बाजारात यंदाच्या हंगामातील उडीद मालाची आवक मागील दोन-तीन दिवसांपासून सुरू झाली असून उडदाला ७१००- ८३०० ते ८५०० रुपये क्विंटल दर मिळत आहे.
याविषयी अधिक माहिती देताना बाजार समितीचे सचिव तुकाराम जगदाळे म्हणाले की, यंदा पाऊस वेळेवर झाल्याने पेरण्या वेळेत झाल्या.
त्यामुळेच उडीद आणि मूग विक्रीसाठी बाजारात लवकर दाखल झाले आहे.
उडीद आवक ही २६० ते ३०० होत आहे. मात्र, पुढील आठवड्यात आवक मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा: तूर पिकातील किडींच्या नियंत्रणासाठी ह्या आहेत सोप्या तीन पद्धती