चंद्रपुर : शेतातील कापूस वेचणीस 9Cotton Market) सुरुवात झाली असून चंद्रपूर जिल्ह्यातील येथील पारस कॉटन इंडस्ट्रीज येथे कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. या शुभमुहूर्तावर शेतकऱ्यांच्या कापसाला ०७ हजार २०९ रुपये भाव मिळाला आहे. तर आज बाजार समित्यांमध्ये कापसाला कमीत कमी ६ हजार ५०० रुपयांपासून ते ७ हजार रुपयांपर्यंत दर मिळाला.
एकीकडे कापूस वेचणीला वेग आला असून काही जिल्ह्यात कापूस खरेदीला (Cotton Auction) सुरवातही झाली आहार. आता दीपावलीची लगबग बघता, बळीराजांनी कापूस विक्रीस आणण्यास सुरुवात केली आहे. नेमका हाच धागा पकडत पारस कॉटन इंडस्ट्रीजने कापूस खरेदीचा शुभारंभ केला. या इंडस्ट्रीजने आज कापूस खरेदीला सुरवात केली. पहिल्या दिवशी ०७ हजार २०९ रुपये भाव दिला आहे. बाजारातही सरासरी हाच दर मिळत असल्याचे चित्र आहे.
आजचे कापूस बाजारभाव (todays Cotton Market Price) पाहिले असता नंदुरबार बाजारात सर्वसाधारण कापसाला प्रति क्विंटल कमीत कमी ५ हजार ६०० रुपये ते सरासरी ६ हजार ५५० रुपये दर मिळाला. किनवट बाजारात सरासरी ६ हजार ५०० रुपये, भद्रावती बाजारात ७ हजार रुपये, तर वडवणी बाजारात ६ हजार ७५० रुपये दर मिळाला.
तर वरोरा बाजारात लोकल कापसाला कमीत कमी ६ हजार ७०० रुपये तर सरासरी ६ हजार ९०० रुपये दर मिळाला. वरोरा-माढेली बाजारात कमीत कमी ६ हजार ८०० रुपये तर सरासरी ७ हजार रुपये दर मिळाला. कोपरणा बाजारात सरासरी ६ हजार ६०० रुपये दर मिळाला. तर वर्धा बाजारात माध्यम स्टेपल कापला ७ हजार १०० असा सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
आजचे बाजारभाव
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
29/10/2024 | ||||||
नंदूरबार | --- | क्विंटल | 80 | 5600 | 7025 | 6550 |
सावनेर | --- | क्विंटल | 300 | 7000 | 7000 | 7000 |
किनवट | --- | क्विंटल | 6546 | 6400 | 6600 | 6500 |
भद्रावती | --- | क्विंटल | 128 | 7000 | 7000 | 7000 |
वडवणी | --- | क्विंटल | 185 | 6300 | 6800 | 6750 |
वरोरा | लोकल | क्विंटल | 216 | 6700 | 7000 | 6900 |
वरोरा-माढेली | लोकल | क्विंटल | 290 | 6800 | 7200 | 7000 |
कोर्पना | लोकल | क्विंटल | 1263 | 6500 | 6750 | 6600 |
वर्धा | मध्यम स्टेपल | क्विंटल | 325 | 7000 | 7250 | 7100 |