राज्यात पावसाने ओढ दिली असून मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाने ब्रेक घेतल्याचे चित्र आहे. दरम्यान, राज्यातील धरणांमध्ये किती पाणीसाठा उरलाय? जाणून घ्या..
राज्यात १९.९३ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मराठवाड्यात ९.२६ टक्के पाणीसाठा उरला असून पुणे विभागात १२.८८ टक्के पाणी शिल्लक आहे. नाशिक विभागात २२.५४ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
कोकणात सध्या पाऊस सुरु झाला असून कोकण विभागातील धरणांमध्ये २८.७१ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. अमरावती, नागपूर विभागातील धरणांमध्ये ३६.७९, ३५.७७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.