सांगली : कोयना धरणात ६४.५५ टीएमसी, तर वारणा २९.९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून एक हजार ५० क्युसेक, तर वारणा (चांदोली) धरणाचे दोन वक्राकार दरवाजे उचलून २ हजार १५२ क्युसेक, तर वीजनिर्मिती केंद्रातून १ हजार ६४८ क्युसेक असा एकूण ३ हजार ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग मंगळवापासून सुरू आहे.
यामुळे 'वारणा', 'कृष्णा' नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. सांगली आर्यविन येथे कृष्णेची पाणीपातळी २७ फूट ६ इंचावर गेली आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस असून २४ तासांत कोयनेला १६४, तर नवजा येथे १४५ मिलिमीटर पर्जन्यमान झाले
कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरूच असून, धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. शिराळा तालुक्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे वारणा नदीकाठावर पूरस्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय धरणातून पाणी सोडल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठावर सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जिल्ह्याच्या बहुतांश भागात मंगळवारी दिवसभर पावसाची उघडझाप सुरूच राहिली. गेल्या चार दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे वारणा नदीकाठावर पूरस्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय धरणातून पाणी सोडल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठावर सतर्कतेचा इशारा दिला आहे. दुष्काळी तालुक्यातही पावसाचा जोर कायम आहे.
धरणातील पाणीसाठा
धरण | आजचा साठा | क्षमता |
कोयना | ६४.५५ | १०५.२५ |
धोम | ०६.६३ | १३.५० |
कन्हेर | ०६.११ | १०.१० |
वारणा | २८.१५ | ३४.४० |
दूधगंगा | १६.७२ | २५.४० |
राधानगरी | ०७.३६ | ०८.३६ |
तुळशी | ०२.६२ | ०३.४७ |
कासारी | ०२.०४ | ०२.७७ |
पाटगाव | ०३.२६ | ०३.७२ |
धोम | ०२.०३ | ०४.०८ |
उरमोडी | ०४.१० | ०९.९७ |
तारळी | ०३.४२ | ०५.८५ |
अलमट्टी | ९१.८३ | १२३.०८ |
अधिक वाचा: Ujani Dam Water Level: आठ दिवसांत उजनी मृत साठ्यातून बाहेर येण्याची शक्यता वाचा सविस्तर