Lokmat Agro >शेतशिवार > झळा दुष्काळाच्या; डाळिंब बागांचा खराटा, लाखो रुपयांचा फटका

झळा दुष्काळाच्या; डाळिंब बागांचा खराटा, लाखो रुपयांचा फटका

drought update; Pomegranate orchards destroyed by water shortage, loss of lakhs rupees | झळा दुष्काळाच्या; डाळिंब बागांचा खराटा, लाखो रुपयांचा फटका

झळा दुष्काळाच्या; डाळिंब बागांचा खराटा, लाखो रुपयांचा फटका

विकतचे पाणी परवडत नाही म्हणून शेतकऱ्यांनी बागा सोडून दिल्या आहेत. काहींनी थोड्या थोड्या पाण्यावर बागा जगविण्याचा प्रयत्न केला आहे. पाणी कमी पडल्याने झाडांची प्रतिकार शक्ती कमी झाली आहे पुढील हंगामात किती उत्पादन देतील ही एक शंका आहे.

शेअर :

Join us
Join usNext

जत तालुक्यात गेले वर्षभर पाऊस नसल्यामुळे डाळिंब बागा जळून गेल्या आहेत. पाणी नसल्यामुळे बागेत झाडावर अक्षरशः एकही पान नसल्याने बागांचा खराटा झाला आहे. बागांचा सांगाडाच शिल्लक राहिला आहे. शेतकरी बागा काढून टाकत आहेत. टँकर भरण्यासाठी पाणी मिळत नसल्याने बागा वाचविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे.

अनुकूल हवामान कमी पाण्यात व खडकाळ जमिनीवर येणारे पीक डाळिंब आहे. डाळिंब पीक तालुक्याचे एक समीकरण बनले आहे. पोषक हवामानामुळे दर्जेदार डाळिंबांची निर्मिती होते. तालुक्याचे हुकमी नगदी पीक म्हणून डाळिंबाकडे पाहिले जाते.

तालुक्यात ११ हजार ३४४.५९ हेक्टर डाळिंबाचे क्षेत्र आहे. शेततळी, कूपनलिका खोदून उजाड फोंड्या माळरानावर बागा फुलविल्या आहेत. डिसेंबर, जानेवारी महिन्यातच विहिरी, तलाव, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. सध्या ६५ गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.

म्हैसाळचे पाणी सोडण्याचे केवळ आश्वासन दिले जात आहे. कर्नाटकातील तुबची बबलेश्वर योजनेचे पाणी आले नाही. पूर्व भागाची अवस्था पाणी उशाला, कोरड घशाला झाली आहे. अनेक भागांत सहा महिन्यांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

विकतचे पाणी परवडत नाही म्हणून शेतकऱ्यांनी बागा सोडून दिल्या आहेत. काहींनी थोड्या थोड्या पाण्यावर बागा जगविण्याचा प्रयत्न केला आहे. पाणी कमी पडल्याने झाडांची प्रतिकार शक्ती कमी झाली आहे पुढील हंगामात किती उत्पादन देतील ही एक शंका आहे.

त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. तालुक्यात २०१२ला दुष्काळ पडलेला होता त्यावेळच्या तत्कालीन राज्य सरकारने डाळिंब बागा जगविण्यासाठी एकरी १० हजार रुपये पाण्यासाठी दिले होते सध्या बागांना सरकारी मदतीची खरी गरज आहे.

जत तालुक्यात डाळिंब पीक विम्यात दुजाभाव
तालुक्यात २०२२-२३ सालचा डाळिंब फळबाग पीक विमा ट्रिगरच्या निकषानुसार नुकसान भरपाई देताना दुजाभाव झाला आहे. जत, शेगाव, डफळापूर, मुचंडी, कुंभारी, माडग्याळ, तिकोंडी या मंडलाला हेक्टरी ९२ हजार ५०० रुपये, तर उमदी, संख मंडलला केवळ ३२ हजार ५०० रुपये विमा मिळाला आहे.

डाळिंब बागांना पाच महिन्यांपासून पाणी नाही. पाण्याअभावी बागा वाळल्याने शेतकरी त्या जेसीबीच्या सहाय्याने काढून टाकत आहेत. डाळिंब बागा पाणी घालून जिवंत ठेवण्याची गरज आहे. तरच पुढील काळात उत्पादन देऊ शकतात. त्यासाठी सरकारने बागांना पाणी आणि वाचविण्यासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी होत आहे. - आप्पू चिकाटी डाळिंब बागायतदार, दरीबडची

Web Title: drought update; Pomegranate orchards destroyed by water shortage, loss of lakhs rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.