गेल्या आठवडाभरापासून भाजीपाल्याचे दरही गगनाला भिडले आहेत. किरकोळ बाजारात लसूण तीनशे रुपये किलो झाला आहे.
दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे पावसामुळे राज्यातील विविध बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक घटली आहे. तर दुसरीकडे मागणी अधिक असल्यामुळे किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर कडाकडले आहेत.
कोथिंबीर, कोबी, मिरची, टमाटे शंभर रुपये किलोने किरकोळ बाजारात विकली जात आहेत. होलसेल बाजारात टमाटे प्रति कॅरेट २,२५० पर्यंत पोहोचले आहेत. बाजार समित्यांमध्ये स्थानिक भाजीपाला उत्पादकांऐवजी इतर जिल्ह्यातून माल विक्रीस येत आहे.
बाजारात केवळ भाजीपालाच नव्हे तर डाळीचे दर तेजीत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस तरी भाजीपाल्याचे दर चढतेच राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पणन मंडळाच्या अधिकृत महितीनुसार लसणाची आजची गुरुवार (दि.१८) आवक व दर (दुपारी १२ पर्यंत)
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
18/07/2024 | ||||||
श्रीरामपूर | --- | क्विंटल | 30 | 7000 | 8000 | 7500 |
पुणे | लोकल | क्विंटल | 180 | 10000 | 23000 | 16500 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 45 | 13000 | 15000 | 14000 |
हेही वाचा - ज्वारीचे उपपदार्थ करून मिळवा अधिकचा नफा; ज्वारीचे मूल्यवर्धन व पोषणमूल्य