Lokmat Agro >स्मार्ट शेती > Honeybee किटकनाशकांपासून मधमाशांचे संरक्षण कसे कराल?

Honeybee किटकनाशकांपासून मधमाशांचे संरक्षण कसे कराल?

How to protect honeybees from pesticides? | Honeybee किटकनाशकांपासून मधमाशांचे संरक्षण कसे कराल?

Honeybee किटकनाशकांपासून मधमाशांचे संरक्षण कसे कराल?

शेतीत गरजेनुसार वर्षभरात केव्हाही कितीही मधपेट्या ठेवता येतात. मधपेट्यात पाळलेल्या मधमाशा ह्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज हलविता येत असल्याने त्यांचा परागीभवनासाठी जास्तीत जास्त उपयोग करुन घेता येतो.

शेतीत गरजेनुसार वर्षभरात केव्हाही कितीही मधपेट्या ठेवता येतात. मधपेट्यात पाळलेल्या मधमाशा ह्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज हलविता येत असल्याने त्यांचा परागीभवनासाठी जास्तीत जास्त उपयोग करुन घेता येतो.

शेअर :

Join us
Join usNext

आज आधुनिक तंत्रज्ञानानुसार शेतीपिकांवर फवारणी केली जात असल्याने किटक संवर्गातील उपयुक्त किटकांचा नाश होत आहे. तसेच आता वर्षभरात कोणत्याही हंगामात शेतीपिके घेण्याची पध्दत अवलंबली जात आहे.

मात्र त्यावेळी कीटक संवर्गातील प्राणी उपलब्ध असतीलच असे नाही. त्यामुळे मधमाशापालनाशिवाय पर्याय राहत नाही. शेतीत गरजेनुसार वर्षभरात केव्हाही कितीही मधपेट्या ठेवता येतात. मधपेट्यात पाळलेल्या मधमाशा ह्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज हलविता येत असल्याने त्यांचा परागीभवनासाठी जास्तीत जास्त उपयोग करुन घेता येतो.

किटकनाशकांपासून मधमाशांचे संरक्षण
१) पेटीतील हवा योग्य प्रकारे खेळती राहील याकडे लक्ष द्यावे.
२) फारच गरज वाटल्यास (आर्थिक नुकसान पातळी गाठल्यास) किटकनाशकांचा योग्य त्या ठिकाणी वापर करावा.
३) मधमाशांना हानी होणार नाही अशा किटकनाशकांचा (एन. एस. के. ई. ५ टक्के) याचा उपयोग करावा.
४) शक्य नसल्यास पेट्या फवारणीच्या ठिकाणापासून कमी कमी २ ते ३ मि.मी. अंतरावर ठेवाव्यात.
५) भुकटी स्वरुपातील किटकनाशके मधमाशांना जास्त घातक असल्याने त्यांचा वापर टाळावा. उदा. भुकटी स्वरुपातील मिथाईल पॅराथिऑन, क्लोरपायरीफॉस, सायपरमेथ्रीन इ.
६) फवारणी करण्या आगोदर मधपालांना सुचना द्याव्यात म्हणजे त्यांना योग्य ती काळजी घेता येईल.
७) किटकनाशकांची फवारणी पिकांना फुले येण्यापूर्वी किंवा गरज पडल्यास परागीभवन होऊन गेल्यानंतर करावी.
८) फवारणी केलेल्या किटकनाशकांची उपयुक्तता साधारणताः १२ ते १५ तासांची असावी. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मधमाशीच्या कामावर विपरीत परिणाम होणार नाही.
९) नियोजीत किटकनाशकांची फवारणी करणे गरजेचे असल्यास फवारणीच्या आदल्या रात्री जेव्हा माशा पेटीत येतात तेव्हा पेटी उचलून दुसऱ्या शेतात जेथे चांगला फुलोरा आहे तेथे ठेवावीत. आठ दिवसांनी पेटी पुन्हा नेहमीच्या जागी आणावी.
१०) सुर्यास्त झाल्यानंतर फवारणी करावी म्हणजे सर्व मधमाशा पेटीत येतात व रात्रभर किटकनाशकांचा संपर्क येत नाही. निसर्गात अस्तित्वात असणाऱ्या निरनिराळ्या मधमाशींच्या जातींचे संगोपन व संवर्धन करणे गरजेचे आहे. मधमाश्यांना मारक असणाऱ्या पद्धती टाळाव्यात.

किटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
०२४२६-२४३२३४

अधिक वाचा: कमी पाण्यात येणारं कोरडवाहू शेतीला वरदान असणारं आवळा पिक

Web Title: How to protect honeybees from pesticides?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.