भरडधान्य (मिलेट्स) ही हवामानास अनुकूल पिके घेण्याकडे शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्याचा लहानसा प्रयत्न. अन्न, चारा आणि इंधन म्हणून ग्राहकांची याला मागणी आहे. आपली ही ऐतिहासिक आणि पारंपारिक पिके येणाऱ्या काळात अधिक मौल्यवान होताना दिसत आहेत. भरडधान्य पिकांचा इतिहास पाहता तांदूळ आणि गव्हापूर्वी आपल्या संस्कृतीत आणि लोककथांमध्ये त्यांचा प्रमुख उल्लेख केलेला दिसतो आहे.
भारत सरकारने संयुक्त राष्ट्रसंघासह २०२३ हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान्य (मिलेट) वर्ष म्हणून घोषित केले आहे. आणि त्याच अनुषंगाने देशभरात आणि जगभर चालवल्या जाणाऱ्या जनजागृती मोहिमांमध्ये छोटीसी भूमिका पार पाडत आहे. शेतकऱ्यांच्या अन्न आणि उपजीविका सुरक्षेसाठी, ग्राहकांच्या पोषणातील विविधतेसाठी आणि या दोघांच्याही आरोग्यासाठी भरडधान्य मिलेट पिके महत्वाची आहेत.
भरडधान्य पिकांचे वर्गीकरण मोठे मिलेट आणि छोठे मिलेट असे करण्यात आले आहे तसेच इतरही काही दुर्मिळ भरडधान्य पिके आहेत.
- मोठी मिलेट : ज्वारी, बाजरी आणि नाचणी.
- छोटी मिलेट : वरई, राळा, सावा, कोदो, बर्टी, ब्राऊन टॉप मिलेट.
- इतर : टेफ, फोनीओ, जॉब्स ऑफ टीअर्स, सिकीया.
भरडधान्य पिके डोंगर उतारावर उताराच्या जमिनी, हलक्या प्रतीच्या मातीत सुद्धा उत्तमप्रकारे येतात. कोणत्याही निविष्ठांशिवाय, हवामान बदलाच्या परिस्थितीत तग धरून येणारी ही पिके म्हणजे अन्न आणि पोषण सुरक्षा साध्य करण्यासाठी आपल्यासाठी वरदानच आहेत. आदिवासी भागात ह्यांना देवधान्य असेही म्हटले जाते आणि पीकनिहाय त्यांना विविध भागात तिथल्या स्थानिक नावाने ओळखले जाते. भरडधान्ये उपयुक्त पोषण तत्वांनी समृद्ध असल्याने त्यांना सुपर फूड असेही म्हटले जाते,
भरडधान्य पिके (मिलेट) आणि त्यांची विशेषता
- कमी कार्बन फुटप्रिंट.
- उच्च तापमानात आणि फार कमी पाण्यात जगतात.
- दुष्काळाच्या काळात उभा असणारी.
- हवामान बदलात तग धरणारी.
- शेतकऱ्यांसाठी चांगली जोखीम व्यवस्थापन.
- अन्न, चारा ते मद्यनिर्मिती आणि जैव इंधनापर्यंत अनेक उपयोग.
भरडधान्य पिके डोंगर उतारावर उताराच्या जमिनी, हलक्या प्रतीच्या मातीत सुद्धा उत्तमप्रकारे येतात. कोणत्याही निविष्ठांशिवाय, हवामान बदलाच्या परिस्थितीत तग धरून येणारी ही पिके म्हणजे अन्न आणि पोषण सुरक्षा साध्य करण्यासाठी आपल्यासाठी वरदानच आहेत. आदिवासी भागात ह्यांना देवधान्य असेही म्हटले जाते आणि पीकनिहाय त्यांना विविध भागात तिथल्या स्थानिक नावाने ओळखले जाते. भरडधान्ये उपयुक्त पोषण तत्वांनी समृद्ध असल्याने त्यांना सुपर फूड असेही म्हटले जाते.
भरडधान्य पिके (मिलेट) आणि त्यांची विशेषता
आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये आणि आशियातील काही भागांमध्ये मोठ्या भरडधान्यांची पिके हि मुख्य अन्न म्हणून घेतली जात आहेत. भरडधान्ये सर्वात मोठ्या जागतिक आरोग्य स्वाद्य संस्कृतीमध्ये देखील बसतात. एक सुपर फूड, प्राचीन धान्य, ग्लूटेन मुक्त, कमी ग्लायसेमिक इंडेक्स (खाल्लेल्या अन्नातून ग्लुकोज साखर सुट्टी होऊन रक्तप्रवाहात किती वेगाने येते यावर त्या अन्नपदार्था ग्लायसेमिक इंडेक्स ठरवला जातो) उच्च फायबर आणि वजन नियंत्रित करण्यासाठी याचा प्रभावीपणे आपल्या आहारात आपण अंतर्भाव करू शकतो.