लासलगाव (जि. नाशिक) कृषी उत्पन्न बाजार समितीने आज सोमवार (दि.०७) रोजी राज्यातील विविध बाजार समित्यांच्या मागण्यांसाठी एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात, सर्व शेतकरी व संबंधित मार्केट घटकांना सूचित करण्यात आले आहे की, सोमवारी लासलगाव मुख्य बाजार, निफाड व विंचूर उपबाजार आवारातील तसेच मानोरी खुर्द येथील तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रावरील कांदा, भुसार व तेलबिया शेतीमालाचे लिलाव बंद राहतील.
सध्या अनेक शेतकरी उन्हाळ कांद्यासह मूग, भुईमूग, सोयाबीन, उडीद, आदी भुसार बाजारात विक्री करिता घेऊन येत आहे. मात्र बाजार समितीने पुकारलेल्या या संपामुळे कांदा विक्रीवर व भुसार उत्पादक शेतकऱ्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना काहीअंशी आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.
तथापि, आज लासलगाव मुख्य बाजार, निफाड व विंचुर उपबाजार, मानोरी खुर्द येथील टोमॅटो व भाजीपाला यांचा लिलाव सामान्यपणे चालू राहणार आहे.