नाशिक : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ असेलल्या घोटी ग्रामपालिकेच्या वतीने तीन दिवशीय डांगी संकरित जनावरे, तसेच औद्योगिक आणि कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रभरातून शेतकरी प्रदर्शनासाठी दाखल झाले असून बक्षीसपात्र जनावरांची निवड करण्यात होणार आहे. या राजस्तरीय डांगी जनावरे व कृषी प्रदर्शनास शेतकरी दुकानदार व कुस्तीप्रेमींनी सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांकडून करण्यात आला आहे.
तांदळाचे आगार म्हणून ओळख असलेल्या घोटी येथील डांगी जनावरांचे आणि कृषी प्रदर्शन हे संपूर्ण राज्यात वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते. या प्रदर्शनात राज्यभरातील वेगवेगळ्या ठिकाणांहून डोगी जनावरे विक्रीसाठी आणली जातात. या जनावरांच्या खरेदीसाठी विविध भागातून शेतकरी येत असतात. यानिमित्त कृषी प्रदर्शनही आयोजित करण्यात येत असते. तालुक्यासह राज्यातील हे सर्वात मोठे कृषी प्रदर्शन राहात असल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकरीवर्ग प्रदर्शन पाहण्यासाठी येत असतो. डांगी जनावरांचे राज्यातील सर्वांत मोठे प्रदर्शन घोटीत होत असल्याने महाराष्ट्र शासनासह सर्वच यंत्रणांचा यात सहभाग असतो. पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद व घोटी ग्रामपालिका यांच्या पुढाकाराने हे प्रदर्शन भरविण्यात येत असून, उल्लेखनीय बाब म्हणजे यावर्षचि हे ५० वे प्रदर्शन आहे.
शेतकरी आणि कृषी क्षेत्राला प्रेरणादायी असा प्रदर्शनाचा उपक्रम ५० वर्षापासून घोटी ग्रामपालिका राबवत आहे. या प्रदर्शनाचा लाभ राज्यभरातील शेतकऱ्यांना होत असल्याने शेतकरी मोठ्या संख्यने उपस्थित राहत असतात. राज्यस्तरीय डांगी जनावरे व कृषी प्रदर्शनात शेतकरी, दुकानदार आणि कुस्तीप्रेमीनी सहभाग घ्यावा, असे आवाहन घोटी ग्रामपालिकेच्या सरपंच सदस्यांकडून केले आहे. डांगी जनावरांचे राज्यातील सर्वांत मोठे प्रदर्शन घोटीत होत असल्याने महाराष्ट्र शासनासह सर्वच यंत्रणांचा यात सहभाग असतो. पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद व घोटी ग्रामपालिका यांच्या पुढाकाराने हे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. तसेच कृषी आरोग्यविषयक तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाच्या योजनांबाबत स्टॉल देखील उभारण्यात आले आहेत
डांगी संकरित जनावरांसह कृषी प्रदर्शन
घोटी येथे आयोजित डांगी संकरित जनावरांसह कृषी प्रदर्शन हे त्याच्या वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. राज्यात अनेक ठिकाणी कृषी प्रदर्शनांचे आयोजन होत असले तरी जोडीने जनावरांचे प्रदर्शन केवळ घोटीत होत असते. उल्लेखनीय अशा जनावरांची निवड करुन त्यांच्या मालकांना बक्षीसेही दिली जातात. त्यामुळे राज्यभरातून डांगी संकरित जनावरे घेऊन शेतकरी या प्रदर्शनात सहभागी होत असतात. या प्रदर्शनाचा शेतकऱ्यांना लाभ होत असल्याने दूरदूरच्या गावाहून शेतकरी सहभाग घेत असतात.
इथली डांगी जनावरे राकट
नाशिकचा इगतपुरी तालुका म्हटला की सर्वाधिक पाऊस पडण्याचे ठिकाण म्हणून ओळखला जातो. इगतपुरी बरोबरच त्र्यंबकेश्वर आदी भागात भात लागवड मोठ्या प्रमाणावर होत असते. अशावेळी डांगी जनावरे भर पावसातही शेतात राबत असतात, हे त्यांचं महत्वपूर्ण वैशिष्ट्य मानले जाते. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात शेतकऱ्यांकडे डांगी जनावरे अधिक आढळून येतात. त्यामुळे शेतीकामासाठी केवळ डांगी जनावरांचा उपयोग केला जातो. त्यामुळेच घोटी परिसरात डांगी जनावरांचे प्रदर्शन सुरू केले. आणि या प्रदर्शनाला मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे.