Lokmat Agro >शेतशिवार > Aamchur production : सातपुड्यातील आमुचर उत्पादकांचे गणित बिघडले, नेमकं कारण काय? 

Aamchur production : सातपुड्यातील आमुचर उत्पादकांचे गणित बिघडले, नेमकं कारण काय? 

Latest News Amchur production decreased by 40 percent in Satpuda range nandurbar district | Aamchur production : सातपुड्यातील आमुचर उत्पादकांचे गणित बिघडले, नेमकं कारण काय? 

Aamchur production : सातपुड्यातील आमुचर उत्पादकांचे गणित बिघडले, नेमकं कारण काय? 

यंदाही आमचूरसाठी उत्पादनासाठी आदिवासी बांधव सज्ज झाले होते. मात्र उत्पादन घटल्याने..

यंदाही आमचूरसाठी उत्पादनासाठी आदिवासी बांधव सज्ज झाले होते. मात्र उत्पादन घटल्याने..

शेअर :

Join us
Join usNext

नंदुरबार :सातपुड्यात देशातील दुसऱ्या क्रमांकाचे आमचूर उत्पादन घेण्यात येते. यामुळे सातपुड्याच्या अर्थकारणाला बळकटी मिळते. वर्षभराचे आर्थिक नियोजन आमचूर उत्पन्नानुसारच केले जाते. परंतु यंदा हे उत्पादन ४० टक्के घटले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच बिघडले आहे.

चवदार स्वयंपाकासाठी वापरले जाणारे विविध उत्पादने व अनेक प्रकारची औषधी निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या आमचूरसाठी सातपुड्याची चौथी रांग प्रसिद्ध आहे. या भागात आमचूरचे मुबलक प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यंदाही आमचूरसाठी उत्पादनासाठी आदिवासी बांधव सज्ज झाले होते. मोलगी व धडगाव या दोनच बाजारपेठा उपलब्ध आहे. दोन महिन्यांपासून ते वर्षभराचे आर्थिक नियोजन ठरविणारे दोन्ही बाजारपेठेत शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. पावसाळा जसा जवळ येतोय तशा दोन्ही बाजारपेठा फुलू लागल्या. दरदिवशी शेकडो क्विंटल आमचूर दाखल होत असून यातून लाखो रुपयांची उलाढालही होत आहे. 

सातपुड्यातील शेतकऱ्यांच्या ते वर्षभराचे आर्थिक नियोजन ठरविणारे हे उत्पादन असल्याने आमचूरच्या किमतींकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सद्यस्थितीत आमचूरला प्रतवारीनुसार ८० ते २५० रुपये प्रतिकिलो पर्यंतचा भाव मिळत आहे. यावर शेतकऱ्यांचे समाधान नसून ते चांगल्या किंमतीच्या प्रतीक्षेत आहे. मोलगी बाजारात ९ ते १० व्यापाऱ्यांकडून आमचूरची यंदाही खरेदी सुरू आहे. मागील वर्षी आमचूरला १५० पासून ३२० रु. प्रतिकिलो भाव मिळला होता. यंदा यात पुन्हा वाढ होईल, अशी अपेक्षा होती, परंतु यात २५ ते ३० टक्के घट झाली आहे. यामुळे आदिवासींमध्ये नाराजी आहे. अवकाळी पावसामुळे उत्पादन घटून दर्जाही खालावला आहे.


देशातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ
छत्तीसगड राज्यातील जगदलपूर, रायपूर, संबलपूर ही आमचूरची प्रथम क्रमांकाची बाजारपेठ आहे. त्यानंतर मोलगी आणि धडगाव ही महाराष्ट्रातील गावे देशात आमचूरसाठी प्रसिद्ध आहेत. मध्यप्रदेशातील छिंदवाडा, गुजरात राज्यातील नाडियाद, उत्तर प्रदेशातील कानपूर आणि लखनऊ, पंजाबमधील अमृतसर, राजस्थानातील बांसवाडा, आंध्र प्रदेशातील निजामाबाद याठिकाणीही आमचूरची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते. धडगाव आणि मोलगी येथून खरेदी केलेले आमचूर दिल्ली, जयपूर, इंदोर, अहमदाबाद, मुंबई व छिंदवाडा येथे रवाना होतो.


३० कोटींची उलाढाल
२०२२ मध्ये १५० ते ३३० पर्यंत  प्रतिकिलो भाव, २०२३ मध्ये १० ते २६० पर्यंत भाव, २०२४ मध्ये १२५ ते २८० रुपये भाव होता. ■ मोलगी येथे आठ मोठे व्यापारी आमचूरची खरेदी करतात. धडगाव वेथील बाजारात व्यापाऱ्यांकडून केवळ दीड महिन्याच ३० कोटींची उलाढाल होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

मागील वर्षी भारतातील इतर बाजारपेठांपेक्षा धडगाव व मोलगी बाजारात सर्वाधिक आमचूर दाखल होवून त्याची खरेदी करण्यात आली होती. देशातील इतर बाजारात अपेक्षेनुसार माल मिळत नव्हता. गेल्या वर्षी खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या कंपन्यांकडून मागणी वाढल्याने धडगाव व मोलगीच्या आमचूरला चांगला भाव मिळाला होता. यंदा मात्र सगळीकडे माल असल्याने दर कमी झाले आहेत.
- राजू सांखला, आमचूर, व्यापारी, मोलगी ता. अक्कलकुवा

Web Title: Latest News Amchur production decreased by 40 percent in Satpuda range nandurbar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.