Lokmat Agro >लै भारी > Dragon Fruit Farming : एरंडगावच्या मंगलाताईंनी फुलवली ड्रॅगनफ्रूटची शेती, वर्षांकाठी लाखोंचं उत्पन्न 

Dragon Fruit Farming : एरंडगावच्या मंगलाताईंनी फुलवली ड्रॅगनफ्रूटची शेती, वर्षांकाठी लाखोंचं उत्पन्न 

Latest News Dragon Fruit Farming Mangalatai sathe of flourished dragon fruit farming, earning lakhs of rupees annually see details  | Dragon Fruit Farming : एरंडगावच्या मंगलाताईंनी फुलवली ड्रॅगनफ्रूटची शेती, वर्षांकाठी लाखोंचं उत्पन्न 

Dragon Fruit Farming : एरंडगावच्या मंगलाताईंनी फुलवली ड्रॅगनफ्रूटची शेती, वर्षांकाठी लाखोंचं उत्पन्न 

Dragon Fruit Farming : विशेष म्हणजे याच शेतात त्यांनी सागाची देखील आंतरपीक म्हणून लागवड करून शेतकऱ्यांपुढे आदर्श उभा केला आहे. 

Dragon Fruit Farming : विशेष म्हणजे याच शेतात त्यांनी सागाची देखील आंतरपीक म्हणून लागवड करून शेतकऱ्यांपुढे आदर्श उभा केला आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक : दुष्काळी येवला तालुक्यातील (Yeola Taluka) शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही प्रयोगशीलतेच्या जोरावर यशाची शिखरे गाठली आहेत. असाच एक प्रयोग एरंडगाव खुर्द येथील मंगलाताई साठे या महिला शेतकऱ्याने केला असून, 'ड्रॅगनफ्रूट' या (Dragon Fruit Farming) आरोग्यदायी फळाच्या लागवडीतून त्यांनी लाखोंचे उत्पन्न घेतले आहे. विशेष म्हणजे याच शेतात त्यांनी सागाची (Saag Farming) देखील आंतरपीक म्हणून लागवड करून शेतकऱ्यांपुढे आदर्श उभा केला आहे. 

कायम दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या येवला तालुक्यातील शेतकरी आता आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून शेतीत चांगल्या प्रकारे उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत आहेत. द्राक्ष, डाळिंब या फळ पिकातून शेतकरी प्रगती साधत असतानाच दुष्काळी तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे पीक घेतले जाते; पण या पारंपरिक पिकांना फाटा देऊन एरंडगाव खुर्द येथील मंगला साठे (Mangala Sathe) या शेतकरी महिलेने पती बाबासाहेब साठे व कुटुंबाच्या मदतीने आपल्या तीन एकर शेतजमिनीपैकी एक एकर क्षेत्रात ड्रॅगनफ्रूटची लागवड केली आहे. 

विशेष म्हणजे त्यामध्ये त्यांनी आंतरपीक म्हणून सागाची देखील लागवड केली असून, भविष्यात त्यातूनही लाखो रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळणार आहे. या फळाची माहिती त्यांना यू-ट्यूबच्या माध्यमातून मिळाली. त्यानंतर त्यांनी कृषी विभागाचे अवधूत मेहेत्रे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी  तांत्रिक मार्गदर्शन करून मंगलाताईंना ड्रॅगन लागवडीसाठी प्रोत्साहन दिले. २०२१ मध्ये लागवडीसाठी त्यांनी एक एकरसाठी 'जम्बो रेड' जातीच्या २२५० झाडांची लागवड केली. 

वर्षाकाठी सरासरी दीड ते २ लाखांचे उत्पन्न 

त्याचवर्षी आंतरपीक म्हणून सागाची ५५० झाडेदेखील लागवड केली आहे. यात २०२१ ला लागवड करण्यासाठी जवळपास ३ लाख ५० हजार रुपये खर्च झाला तर पुढील वर्षी २०२२ एक लाख ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. २०२३ दुसऱ्या वर्षी १ लाख ८० हजार, २०२४ ला २ लाख ८० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. मंगलाताई यांना पती बाबासाहेब साठे व मुलगा दिनेश यांची भक्कम साथ लाभली आहे. भविष्यामध्ये ड्रॅगन फ्रुट रोपांची निर्मिती करणार आहेत. कृषी विभागामार्फत लायसन्सची प्रक्रिया सुरु असल्याचे साठे यांनी सांगितले. तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, मंडळ कृषी अधिकारी के. वाय, सिद्दीकी, भगत व अवधूत मेहेत्रे यांचे मार्गदर्शन लाभते आहे.


आरोग्यासाठी उपयुक्त 
आरोग्यासाठी चांगले असलेल्या ड्रॅगनफ्रूट या विदेशी फळाची साल अतिशय पातळ व गर लाल-पांढऱ्या रंगाचा असून, हे फळ मधुमेह, हृदयरोग आजाराला फायद्याचे असते. यामध्ये भरपूर लोह असल्याने पचनक्रिया चांगली राहते. रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यासाठी या फळाचे सेवन फायदेशीर ठरत असल्याचा दावा केला जातो. या दाव्यांमुळे देशी मार्केटमध्येही या फळाला मागणी वाढली आहे.


मंगलाताई साठे या महिला शेतकऱ्याने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ड्रॅगनफ्रूटची यशस्वी लागवड करून एक आदर्श निर्माण केला आहे. इच्छुकांनी कृषि विभागाशी संपर्क साधावा. 
- शुभम बेरड, कृषी अधिकारी, येवला

Web Title: Latest News Dragon Fruit Farming Mangalatai sathe of flourished dragon fruit farming, earning lakhs of rupees annually see details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.