Nashik Dam Storage : नाशिक जिल्ह्यासाठी (Nashik district) दिलासादायक बातमी असून शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण (Gangapur Dam) निम्म्यावर आले आहे. तर नाशिक जिल्ह्यातील धरणात एकूण 33.72 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मात्र पावसाचे दोन संपण्याच्या मार्गावर असताना अद्यापही धरणे तहानलेलीच आहे. गंगापूर धरण समूहातील गंगापूर आणि गौतमी गोदावरी धरण 50 टक्क्यांच्या वर आहे.
गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात दमदार पाऊस (Heavy rain) सुरू असल्याने धरणांच्या पाणीपातळीत काहीशी वाढ होत आहे. केवळ भावली धरण 100 टक्के भरले असून 5 धरणे 50 टक्क्यांच्या वर गेली आहेत. तर उर्वरित धरणे 30 टक्क्यांच्या खालीच आहेत. तर ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव ही धरणे अद्यापही शून्यावर आहेत. त्यामुळे अद्यापही जिल्ह्यासाठी दमदार पावसाची आवश्यकता असल्याचे चित्र आहे.
सध्याचा पाणीसाठा किती?
आजच्या जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार कश्यपी 26.62 टक्के, गौतमी गोदावरी 52.78 टक्के, पालखेड 32.62 टक्के, तर इगतपुरी पट्ट्यातील धरणांमध्ये चांगला पाणीसाठा झाला आहे. यात दारणा 82.61 टक्के, भावली 100 टक्के, वालदेवी 58.96 टक्के, मुकणे 29.80 टक्के, नांदूर मध्यमेश्वर 98.44 टक्के, इकडे गिरणा धरण समूह देखील पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. या धरण समूहातील चणकापुर 20.97 टक्के, हरणबारी 29.50 टक्के, केळझर 9.62 टक्के, गिरणा 11.75 टक्के तर पुनद 45.33, माणिकपुंज 0 टक्के असं एकूण 33.72 टक्के असा जलसाठा उपलब्ध आहे. तर मागील वर्षी 42.22 टक्के जलसाठा होता.