नाशिक : तब्बल दीड महिना प्रतीक्षाकेल्यानंतर वरुणराजाची नाशिकवर कृपा झाली असून गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा Dam storage) वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यात गंगापूर धरणही ५८.५४ टक्के भरले आहे. शहरातही पावसाने संततधार धरल्याने गोदावरी पात्रात पाणी वाढल्याने नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.
जिल्ह्यातील (Nashik District) धरणांमध्येही पाणीसाठा वाढला आहे. भावली धरणात १२८४ दशलक्ष घनफूट इतके पाणी जमा झाल्यानंतर त्यातून विसर्ग करण्यात येत आहे. बुधवार, दि. २४ पासून भावली धरण भरल्यानंतर त्यातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर दारणा धरणातून सुरू असलेला विसर्ग कायम आहे. इगतपुरी वगळता बाकीच्या तालुक्यांत पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली असून नऊ तालुक्यांनी सरासरीची शंभरी ओलांडली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात गेल्या वर्षीपेक्षा निम्माच पाऊस नोंदवण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाच्या सरी कायम असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
पाच दिवसांत शहरात ८९ मिमी पाऊस
महिनाभरापासून प्रतीक्षेत असलेल्या पावसाने अखेरीस नाशिककडे कृपादृष्टी वळवली. मंगळवारपासून सुरु झालेला हा पाऊस सरासरी ८९ मिमी इतका होता. मंगळवारी दिवसभरात २५.४ मिमी तर बुधवारी दिवसभरात २०.२४ मिमी पावसाची नोंद झाली. गुरुवारी दिवसभरात ३४.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. शुक्रवारी ६ मिमी तर शनिवारी फक्त १ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
काही धरणाचा पाणीसाठा
गंगापूर 58.54 टक्के, 29.5 टक्के, गौतमी गोदावरी 55.94 टक्के, पालखेड 38.90 टक्के, करंजवण 19.55 टक्के, दारणा 83.44 टक्के, भावली 100 टक्के, मुकणे 32.77 टक्के, कडवा 89.40 टक्के, नांदूर मध्यमेश्वर 98.44 टक्के असा, तर नाशिक जिल्ह्यातील एकूण धरणांचा आढावा घेतला असता 36.28 टक्के जलसाठा झाला आहे.