Nashik Dam Storage : नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) बहुतांश धरणे ओव्हरफ्लो झाली असून गंगापूर धरण देखील 86 टक्क्यांवर पोहचले आहे. मात्र अद्यापही मनमाड परिसरातील काही धरणे तळाशीच असल्याचे चित्र अवघे. आजमितीस नाशिक जिल्ह्यातील एकूण 24 प्रकल्पात 66.89 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. तर जिल्ह्यातील माणिकपुंज, मन्याड, नागासाक्या ही धरणे पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने नाशिक जिल्ह्यात (Rain) दमदार हजेरी लावली. तब्बल दीड महिना प्रतीक्षेत असणारा नाशिक जिल्हा या पावसाने सुखावला. जवळपास अनेक धरणे आजमितीस 70 टक्क्यांच्या पुढे आहेत. मात्र आता तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे धरणसाठा काहीसा स्थिरावला आहे. आजमितीस गंगापूर धरण 86.13 टक्के भरले आहे. सद्यस्थितीत 245 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. इतर धरणातील पाणीसाठा किती झाला आहे, हे पाहुयात...
असा आहे 14 ऑगस्टरोजीचा पाणीसाठा
गंगापूर 86.13 टक्के, कश्यपी 61.23 टक्के, गौतमी गोदावरी 91.76 टक्के, पालखेड 55.74 टक्के, करंजवण 67.38 टक्के, दारणा 87.37 टक्के, भावली 100 टक्के, मुकणे 59.17 टक्के, कडवा 81.58 टक्के, नांदूर मध्यमेश्वर 100 टक्के, पुणेगाव 76.8, ओझरखेड 51.55 टक्के, यात भोजापूर, हरणबारी, केळझर हि धरणे 100 टक्के भरली आहेत. असा एकूण धरणांचा आढावा घेतला असता 66.89 टक्के जलसाठा झाला आहे.