Lokmat Agro >शेतशिवार > Kharif Season : शेतकऱ्यांनो भाताचे बियाणे खरेदी करायचंय, मग बातमी तुमच्यासाठी, वाचा सविस्तर 

Kharif Season : शेतकऱ्यांनो भाताचे बियाणे खरेदी करायचंय, मग बातमी तुमच्यासाठी, वाचा सविस्तर 

Latest News Rice seeds available at Divisional Research Center at Igatpuri, contact here | Kharif Season : शेतकऱ्यांनो भाताचे बियाणे खरेदी करायचंय, मग बातमी तुमच्यासाठी, वाचा सविस्तर 

Kharif Season : शेतकऱ्यांनो भाताचे बियाणे खरेदी करायचंय, मग बातमी तुमच्यासाठी, वाचा सविस्तर 

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील विभागीय संशोधन केंद्रावर भात बियाणे उपलब्ध झाले आहे.

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील विभागीय संशोधन केंद्रावर भात बियाणे उपलब्ध झाले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक : खरीप हंगाम तोंडावर आला असून पिकांच्या लागवडीसाठी कृषी विज्ञान केंद्रे, कृषी सेवा केंद्रे तसेच शासनाने ठरवून दिलेल्या विक्री केंद्रावर बियाणे उपलब्ध होत आहेत. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील विभागीय संशोधन केंद्रावर देखील भात बियाणे उपलब्ध झाले आहे. उद्यापासून म्हणजेच मंगळवार 28 मेपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. 

नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने कांदा, द्राक्ष, टोमॅटोसह विविध भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. त्याचबरोबर नाशिकचा पश्चिम पट्टा असलेल्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा आदी भागात तांदळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्यामुळे इगतपुरीलाभात संशोधन केंद्रही असल्याने शेतकऱ्यांना भात पिकासंदर्भात विविध अडचणींवर मार्गदर्शन दिले जाते. सद्यस्थितीत भाताची लागवड करण्यासाठी पूर्व मशागतीची कामे सुरु आहेत. काही दिवसात लागवडीला प्रारंभ होईल. त्यामुळे येथील संशोधन केंद्रावर भाताचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. 

त्यानुसार इगतपुरी संशोधन केंद्राने जाहीर केलेल्या सूचनेनुसार शेतकरी बंधूंना कळविण्यात येते की, मंगळवार पासून विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी या संशोधन केंद्रावर इंद्रायणी भाताचे (सत्यप्रत) बियाणे उपलब्ध झाले आहे. भात बियाणांची 16 किलो बॅग 1040 रुपयांना विक्री केली जात आहे. सध्या हि विक्री व्यवस्था चालू होत असून सर्वांनी बियाणे खरेदी करणेसाठी लोहकरे - 8805084282, डॉ. चौरे - 9421188589, प्रा. परदेशी - 7588052793 या नंबर वर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

युरिया गोळी खतही उपलब्ध 

तसेच याच संशोधन केंद्रावर शेतकऱ्यांना आवश्यक असलेला युरिया (गोळी खत) देखील उपलब्ध झाला आहे. युरिया-DAP ब्रिकेट (गोळी खत) 35 किलोची बॅग 770 रुपयांना विक्री केली जात आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना गोळी खत खरेदी करावयाचे असल्यास किंवा इतर माहितीसाठी संबंधित नंबर वर संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे. 
 

Web Title: Latest News Rice seeds available at Divisional Research Center at Igatpuri, contact here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.