Lokmat Agro >लै भारी > रोजंदारीवर काम करणारे विदर्भातील हे शेतकरी पोल्ट्रीतून झाले करोडपती

रोजंदारीवर काम करणारे विदर्भातील हे शेतकरी पोल्ट्रीतून झाले करोडपती

Millionaire Farmer of Vidarbha | रोजंदारीवर काम करणारे विदर्भातील हे शेतकरी पोल्ट्रीतून झाले करोडपती

रोजंदारीवर काम करणारे विदर्भातील हे शेतकरी पोल्ट्रीतून झाले करोडपती

श्री. मेटकर यांचे वडील वनविभागामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी. सन १९८४ मध्ये वडिलांचे जनरल प्रोविडेंट फंड (जीपीएफ) मधून रुपये ३०००/- काढून त्या भांडवलावर घराच्या गच्चीत श्री. मेटकर यांनी १०० ब्रॉयलर कोंबड्या पासून व्यवसायाला सुरुवात केली. त्यांची ही यशकथा.

श्री. मेटकर यांचे वडील वनविभागामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी. सन १९८४ मध्ये वडिलांचे जनरल प्रोविडेंट फंड (जीपीएफ) मधून रुपये ३०००/- काढून त्या भांडवलावर घराच्या गच्चीत श्री. मेटकर यांनी १०० ब्रॉयलर कोंबड्या पासून व्यवसायाला सुरुवात केली. त्यांची ही यशकथा.

शेअर :

Join us
Join usNext

श्री. रविंद्र माणिकराव मेटकर हे अमरावती जिल्ह्यातील मसाला अंजनगाव बारी रोड येथील राहणारे शेतकरी. त्यांनी दहावी नंतर रोजंदारीने कामावर जात “कमवा आणि शिका” प्रकारातून एम कॉम पर्यंत शिक्षण घेतलेले शेतकरी. श्री. मेटकर यांचे वडील वनविभागामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी. सन  १९८४ मध्ये वडिलांचे जनरल प्रोविडेंट फंड (जीपीएफ) मधून रुपये ३०००/- काढून त्या भांडवलावर घराच्या गच्चीत श्री. मेटकर यांनी १००  ब्रॉयलर कोंबड्या पासून व्यवसायाला सुरुवात केली. सन १९९४ पर्यंत  हळूहळू या कोंबड्यांची संख्या वाढवत ४०० पर्यंत नेली.

या व्यवसायातील पैसा कमवण्याच्या संधि ओळखून त्यांनी १९९६ ला बँक ऑफ इंडिया कडून ५ लाखाचे कर्ज उचलले व ४००० कोंबड्या पाळण्यास सुरुवात केली. उत्कृष्टरित्या चाललेल्या या धंद्यास २००६ सालच्या बर्ड फ्लू ने प्रचंड नुकसानीच्या गर्तेत ढकलले.

त्यातून उभारी घेत पुन्हा २००८ मध्ये बँक ऑफ इंडिया कडून २५ लाखाचे कर्ज घेत २०००० अंडी देणाऱ्या कोंबड्यांचा व्यवसाय सुरू केला.  त्या कोंबड्यांची संख्या वाढवत ती आता १.५० लाखापर्यंत झाली आहे. या कोंबड्यांपासून प्रति दिवस जवळपास ९००००/- अंडी मिळतात. या अंड्यांची ४ रुपये प्रति अंडे याप्रमाणे मध्यप्रदेशातील इंदोर, खंडवा, बैतूल याचबरोबर राज्यातील अनेक ठिकाणी विक्री करतात. अशा तऱ्हेने प्रतिदिन रुपये ३,६०,०००/- एकूण उत्पन्न मिळवतात. त्या मधून खर्च वजा जाता रुपये प्रती दिन रु. ६०,००० /- नफा शिल्लक राहतो.

त्यांनी केवळ अंड्यांच्या मार्केटिंग वर लक्ष न देता कुक्कुट पालन उद्योगा च्या खर्चात बचत करण्यासाठी कोंबड्यांना  लागणारे खाद्य जे बाजारात साधारण रु. २४/- रुपये प्रति किलो प्रमाणे मिळते ते त्यांनी स्वतः रुपये २०/- प्रति किलो ने तयार केले. यातून त्यांना दैनंदिन लागणाऱ्या १३ टन खाद्यातून जवळपास रुपये ५२०००/- ची  प्रति दिन बचत केली. याचबरोबर कोंबडी खत विक्रीतुन त्यांना लाखो रुपये मिळतात.

या कुकुटपालन व्यवसायाबरोबरच ते  ५० एकर शेती मध्ये १००० संत्रा, ३०० मोसंबी, ७० चिकू, २०० नारळ, ६००० केळी व १० एकरावर सेंद्रिय कापूस लागवड करून प्रति एकर १५ क्विंटल कापसाचे उत्पादन ते  घेत आहेत. स्थानिक बाजारपेठ आणि इतर ठिकाणी ते स्वत: याचे  उत्पादक ते ग्राहक तत्वावर जास्तीच जास्त मार्केटिंग करून   चांगल्या पद्धतीने पैसे कमवतात.

या शेतीव्यवसायात जवळपास ३० महिला व ५० पुरुषांना कायमस्वरूपी रोजगार त्यांनी उपलब्ध करून दिला. तर स्वतःच्या शेतातील कूपनलिकेचे पाणी गावासाठी उपलब्ध करून दिले. परिसरातील शाळा, अनाथालय यांना मोफत अंडी देखील देऊन ते समाज कार्य देखील  तितक्याच तळमळीने करत आहे.

श्री. मेटकर यांच्या शेतीची वैशिष्टे:

  • ते स्वतः पूर्ण वेळ शेती करतात.
  • एकत्र कुटुंब असून प्रत्येकाला त्याच्या क्षमतेनुसार कामाची विभागणी करून दिली आहे.
  • १०० कोंबड्यापासून कुक्कुटपालन व्यवसायची सुरुवात करून हळू हळू व्यवसाय वाढवत नेला. यात त्यांनी या व्यवसायचे प्रशिक्षण घेत चांगला अभ्यास केला.
  • कुक्कुटपालन उत्पादन खर्च कमी करण्यावर भर दिला. त्यात कोंबडी खाद्य स्वत: तयार करून मोठी बचत केली.
  • अंडी विविध बाजारपेठेत विकून उत्पादक ते ग्राहक तत्वावर अधिक पैसे मिळवले.
  • कुक्कुट पालन बरोबर कापूस आणि विविध फळ पिकांची लागवड सेंद्रिय पद्धतीने करत कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवले.
  • कृषि विद्यापीठ, कृषि विभाग, इतर चांगले व्यावसायिक शेतकरी यांना भेटी देत, त्यांचे मार्गदर्शन घेत आणि प्रयोगशील वृत्तीने नेहमी चांगले उत्पादन घेत राहिले.
  • विविध एकमेकांना पूरक एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करीत त्यांनी एकाच व्यवसाय/पीक पद्धत या वरील अवलंबन  कमी केले. त्यामुळे हवामान बद्दल, विविध नैसर्गिक आपत्ति, बाजार भावातील चढ उतार या सारख्या विपरीत परिस्थितीत शाश्वत उत्पन्न मिळेल या दृष्टीने नियोजन केले.
  • त्यांचा एक मुलगा कृषि पदवी तर दूसरा अभियांत्रिकी शिक्षण घेत आहे. हे शिक्षण त्यांना हा व्यवसाय पुढे वाढीसाठी उपयुक्त ठरणार आहे.
  • ट्रॅक्टर, पॉवरटिलर, फवारणी यंत्र या सारख्या विविध यंत्रांचा प्रभावी वापर करीत मजुरांवरील अवलंबन कमी केले आहे. त्याच बरोबर मजुरीच्या खर्चात बचत केली आहे.
  • जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवून जमीन समृद्ध केली आणि त्यात सेंद्रिय उत्पादने घेत अधिक नफा मिळवला.       
  • श्री. मेटकर हे राज्यातीलच नव्हे तर देशातील शेतकऱ्यांना यूट्यूब च्या माध्यमातून, फोनद्वारे सातत्याने कुकूटपालन व शेती व्यवसायाच्या संदर्भात मार्गदर्शन करतात. या सर्व व्यवसायात त्यांचे बंधू श्री. दिलीप मेटकर आणि त्यांची दोन्ही मुले आणि कुटुंबियांना सहकार्य करतात.   

या उत्कृष्ट पद्धतीने शेती व्यवसाय करणाऱ्या श्री. मेटकर यांचे पासून अनेक युवकांनी प्रेरणा घेत आपल्या शेतीत सकारात्मक बदल केले आहेत.
श्री. मेटकर यांच्या या प्रयोगशील वृत्तीची व शेतीकडे व्यवसाय म्हणून बघणाऱ्या दृष्टिकोनाची अनेक माध्यमांनी दखल घेत त्यांना खालील पुरस्कार देण्यात आले आहेत.

  • डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठचा आदर्श शेतकरी पुरस्कार
  • भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचा नव संशोधक शेतकरी पुरस्कार
  • राज्य शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार
  • राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार
  • बारामती कृषी विज्ञान केद्राचा  पुरस्कार
  • युवा प्रताप पुरस्कार
  • इंडियन एग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटने दि. २५ फेब्रुवारी २०२१  रोजी त्यांना अध्यक्षता पुरस्कार (फेलो अवार्ड्स) २०२१ देऊन माननीय केंद्रीय कृषिमंत्री श्री. नरेंद्रजी तोमर साहेब यांच्या हस्ते गौरविण्यात आले.


श्री.रविंद्र मेटकर त्यांनी अभ्यासपूर्ण चिकित्सक वृत्तीने, व्यावसायिक तत्वावर, जिद्द, चिकाटीने शेती व्यवसायात आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे कार्य हे कृषी क्षेत्रातील सर्वांना अत्यंत प्रेरणा व दिशा देणारे आहे.
श्री. रविंद्र माणिकराव मेटकर
९८८१३ ०३७०२

Web Title: Millionaire Farmer of Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.