पुणे विभागातील 720 लघु मध्यम व मोठ्या धरणांमध्ये आज दिनांक 16 एप्रिल रोजी 30.47% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. वाढत्या तापमानामुळे धरण साठ्यात वेगाने घट होत आहे. मागील वर्षी याच दरम्यान पुणे विभागात 38.33% पाणीसाठा शिल्लक होता.
डिंभे धरणात आज 28.70% पाणीसाठा शिल्लक असून चाकसमान 23.39%, भाटघर 11.61%, पवना 34.34%, पानशेत 34.35%, खडकवासला 53.98%, निरा देवघर 37.45% पाणी शिल्लक आहे.
गतवर्षी सरासरी पाऊस घटल्याने यंदा राज्यातील बहुतांश धरणांमध्ये पाणीसाठा कमी राहिला. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन वेगाने होत आहे. परिणामी धरणांमध्ये पाणीसाठा घटत चालला आहे. त्यामुळे पुणेकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.
पुण्यातील सर्वाधिक पाणी क्षमता असणारे भाटघर धरणात केवळ 11.61% पाणीसाठा शिल्लक असून मागील वर्षी तो 30.14 टक्के एवढा होता. धरणात आज 77.30 दलघमी म्हणजे केवळ 2.7 टीएमसी पाणी उरले आहे.
पुणे विभागातील लघु मध्यम व मोठ्या अशा 22 धरणांमध्ये पाणीसाठा खालावत चालला आहे. पावसाळ्याला अजून दोन महिने उरले आहेत. दरम्यान अनेक भागात टँकरच्या पाण्याला सुरुवात झाली आहे.
कोणत्या धरणात किती पाणी?