Lokmat Agro >हवामान > सिंचनासाठी कोयनेतून पाणी वापराला कपात

सिंचनासाठी कोयनेतून पाणी वापराला कपात

Reduction of water use from koyana dam for irrigation | सिंचनासाठी कोयनेतून पाणी वापराला कपात

सिंचनासाठी कोयनेतून पाणी वापराला कपात

सिंचन आणि वीजनिर्मितीच्या नियोजित पाणी वापरात ११.७१ टीएमसी कपात प्रस्तावित आहे. यामध्ये सिंचनाच्या २.८६ आणि वीजनिर्मितीसाठी ८.८५ टीएमसी पाणी कपात असणार आहे.

सिंचन आणि वीजनिर्मितीच्या नियोजित पाणी वापरात ११.७१ टीएमसी कपात प्रस्तावित आहे. यामध्ये सिंचनाच्या २.८६ आणि वीजनिर्मितीसाठी ८.८५ टीएमसी पाणी कपात असणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

सातारा जिल्ह्यात यावर्षी कमी पर्जन्यमान झाल्याने कोयना धरणही भरले नाही. त्यामुळे सिंचन आणि वीजनिर्मितीच्या नियोजित पाणी वापरात ११.७१ टीएमसी कपात प्रस्तावित आहे. यामध्ये सिंचनाच्या २.८६ आणि वीजनिर्मितीसाठी ८.८५ टीएमसी पाणी कपात असणार आहे. याबाबतची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

कोयना धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी इतकी आहे. मात्र, यावर्षी पावसाळी हंगामापूर्वी १ जूनला धरणात १७.६४ टीएमसी पाणीसाठा होता. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत पर्जन्यमानात ४४० मिलिमीटरची तूट आणि आवकमध्येही ३९.७१ टीएमसी इतकी घट झाली. त्यातच १ जून ते १४ ऑक्टोबर या कालावधीत सिंचनासाठी ५.४६ आणि वीजनिर्मितीसाठी २३.०३ टीएमसी पाण्याचा वापर झालेला आहे. धरणामधून सिंचनासाठी ४२.७० टीएमसी वार्षिक पाणी वापराचे प्रकल्पीय नियोजन असते. यामधील दि.१ जुलै ते १४ ऑक्टोबरदरम्यान खरीप हंगामात ४.३९ टीएमसी पाणीवापराचे नियोजन आहे.

कोयना प्रकल्पांतर्गत बहुतांशी सिंचन क्षेत्र सांगली जिल्ह्यातच आहे त्यामुळे सांगलीसाठी मागणीनुसार धरणातून सिंचनासाठी विसर्ग करण्यात येतो. मागीलवर्षी खरीप हंगामात पाणीवापर ०.४७ टीएमसी इतका मर्यादित होता. मात्र, यावर्षी खरिपात सांगली सिंचनकडून मागणी करण्यात आली. त्यामुळे धरणातून २.३६ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. दुष्काळी स्थितीमुळे गतवर्षीपेक्षा दोन टीएमसी जादा पाणी दिले आहे.

मार्चमध्ये पाणी वापराचे फेरनियोजन
कमी पर्जन्यमानामुळे धरणामधील पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे पिण्यासह सिंचन व वीजनिर्मितीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होणार आहे. रब्बी हंगामातील प्रत्यक्ष पाणी वापर आणि धरणामधील शिल्लक पाणीसाठा याचा विचार करून मार्चमध्ये उन्हाळी हंगामामधील पाणी वापराचे फेर नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहितीही देण्यात आली.

Web Title: Reduction of water use from koyana dam for irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.