यंदा पावसाळ्यात समुद्राला तब्बल २२ दिवस मोठी भरती येणार आहे. या काळात साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. २० सप्टेंबरला पावसाळ्यातील सर्वांत मोठी भरती समुद्रतटीय नागरिकांना अनुभवता येणार आहे.
यावेळी जोरदार पाऊस अतिवृष्टी झाल्यास पूरसदृश परिस्थितीचा सामना रायगड जिल्ह्यातील शेतकरी, नागरिकांना बसून मोठे संकट येऊन मोठी वित्तहानी होण्याची शक्यता आहे.
मान्सूनदरम्यान समुद्राला येणाऱ्या संभाव्य मोठ्या भरतीचे अंदाजपत्रक आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत जाहीर करण्यात आले आहे. यावर्षी पावसाळ्यात २२ दिवस समुद्राला मोठे उधाण येईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यात जूनमधील सात दिवस, जुलैमधील चार, ऑगस्टमधील पाच आणि सप्टेंबरमधील सहा दिवसांचा समावेश आहे.
या दिवशी समुद्राला साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा आणि मोठी भरती येणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर समुद्र, खाडी तसेच नदी किनाऱ्यावरील गावांना स्थानिक पातळीवर आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पूर्वतयारी आवश्यक
• रायगड जिल्ह्यातील १२५ गावातील लोकांना या उधाण भरतीच्या संकटाला सामोरे जावे लागणार असल्याने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला याबाबत पूर्वतयारी करणे गरजेचे आहे.
• रायगड जिल्ह्यात नदी, खाडी आणि समुद्रकिनाऱ्यावर एकूण ३८५ गावे आहेत. या गावांना स्थानिक पातळीवर नियोजन करण्याबाबतचे आदेश रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिले आहेत.
पेणला धोका
पेण शहर आणि तालुक्यातील बाळगंगा, पाताळगंगा, भोगावती, अंबा नदी वि किनारी असलेल्या गावांमधील ३३ गावांना या उधाण भरतीच्या संकटाला सामोरे जातांना दुथडी भरुन वाहणाऱ्या नद्यांचे प्रवाहाचे पाणी भारतीचे पाणी थोपवून धरणे त्यामुळे नदीच्या पात्रातील पाणी रौद्र रूप धारण करून नदी पातळी वाढते. या गावात पाणी शिरून मोठी आर्थिक हानी होण्याची शक्यताही आहे.
मोठ्या भरतीचे दिवस
तारीख | लाटांची वेळ | लाटांची उंची (मीटर) |
४ जून | सकाळी ११.१७ वा | ४.६१ |
६ जून | दुपारी १२.०५ वा. | ४.६९ |
७ जून | दुपारी १२.५० वा. | ४.६७ |
८ जून | दुपारी १.३४ वा. | ४.५८ |
२३ जून | दुपारी १.०९ वा. | ४.५१ |
२४ जून | दुपारी १.५३ वा. | ४.५४ |
२२ जुलै | दुपारी १२.५० वा. | ४,५९ |
२३ जुलै | दुपारी १.२९ वा. | ४.६९ |
२४ जुलै | दुपारी २.११ वा. | ४.७२ |
१९ ऑगस्ट | सकाळी ११.४५ वा. | ४.५१ |
२० ऑगस्ट | दुपारी १२.२२ वा. | ४.७० |
२१ ऑगस्ट | दुपारी १२.५७ वा. | ४.८१ |
२२ ऑगस्ट | दुपारी १.३५ वा. | ४.८० |
२३ ऑगस्ट | दुपारी २.१५ वा. | ४.७२ |