यंदा राज्यात हळदीला चांगला भाव मिळत असल्याचे चित्र दिसत असून मागील चार दिवसांपासून लोकलसह राजापुरी व नंबर वन हळदीला चांगला बाजार भाव मिळत असल्याचे चित्र आहे. सांगलीत राजापुरी हळद 17 हजार रुपयांच्या वर गेल्याचे पणन विभागाने नोंदवले. इतर ठिकाणीही 11 ते 17 हजारांपर्यंत बाजार भाव सुरू असल्याचे अधिकृत माहितीनुसार दिसून येत आहे.
राज्यात मागील आठवडाभरापासून स्थानिक हळदीसह राजापुरी, नंबर वन तसेच हायब्रीड जातीच्या हळदीची बाजारपेठेत आवक होत आहे. शेतकऱ्यांना सर्वसाधारण 14 ते 17 हजार रुपयांचा भाव मिळत आहे. परिणामी हळद विक्री कडे कल वाढलेला आहे.
दरम्यान शनिवारी हिंगोलीत सर्वाधिक 1850 क्विंटल हळदीचे आवक झाली. तसेच सांगलीमध्ये 535 क्विंटल हळद विक्रीसाठी आली होती. यावेळी सांगलीत शेतकऱ्यांना 16705 रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळाला. तर हिंगोली तर 14 हजार 900 रुपये भाव सुरू होता.
आज रविवारी वसमत कुरुंदा बाजार समितीत 137 क्विंटल हळदीचे आवक होत आहे. शेतकऱ्यांना 14,500 ते 16 हजार रुपयांपर्यंत भाव मिळत असून जिंतूर व पूर्णा या बाजार समिती 14 ते 15 हजार रुपयांचा भाव सुरू आहे.