टेंभुर्णी : उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात वाढ झाली आहे. विसर्ग ३ हजार १०० क्युसेकने वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसाने दौंड विसर्गात वाढ झाली आहे. सध्या उजनी धरणाचीपाणी पातळी वजा ४३.६८ टक्के झाली असून, जून महिन्यात आत्तापर्यंत १७ टक्के पाणी पातळी वाढली आहे.
गेल्या आठवडाभरात उजनी पाणलोट व भीमा खोऱ्यातील पावसाने विश्रांती घेतल्यामुळे उजनीत पाणी पातळी संथ गतीने वाढत होती. दोन दिवसांपूर्वी पुणे शहर व पिंपरी-चिंचवड परिसरात दमदार पाऊस झाल्याने मंगळवारी सायंकाळपासून दौंड येथील विसर्गात वाढ होत गेली.
मंगळवारी सायंकाळी दौंड विसर्ग २ हजार ७०० क्युसेक होता तर बुधवारी सकाळी ३ हजार १०२ क्युसेक उजनीत मिसळत होता. तो सायंकाळी कायम होता. सध्या उजनी धरणात पाणीसाठा ४०.३५ टीएमसी झाला असून, एकूण ९ टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे.
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्यास उजनीची पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. गतवर्षी २६ जून रोजी उजनी धरणाची पाणी पातळी वजा ३४.२० टक्के होती. गतवर्षीचा तुलनेत यंदा ९ टक्के पाणी पातळी कमी आहे.
अधिक वाचा: Koyna Dam पावसाचा जोर ओसरला, कोयनेत आलं किती पाणी