टेंभुर्णी : गेल्या आठवड्यात उजनी धरण ओव्हर फ्लो झाल्याने उजनी धरणातून रविवार, दि. ४ ऑगस्टपासून २० हजार क्युसेक विसर्ग भीमा नदीत सोडण्यात आला होता. गेल्या आठ दिवसात उजनी धरणातून ३० टीएमसी पाणीसाठा सोडून देण्यात आला आहे.
धरणातून १२ हजार ३५० क्युसेक विसर्ग भीमा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. दौंड येथून ११ हजार ४५६ क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत आहे.
तर उजनी मुख्य कालवा २ हजार १०० क्युसेक, भीमा-सिना जोड कालवा ९०० क्युसेक, सिना-माढा उपसा सिंचन २१०, दहिगाव ८० क्युसेक सोडण्यात येत आहे.
सध्या उजनी धरणाची पाणी पातळी १०६.४९ टक्के झाली आहे. तर १२०.७१ टीएमसी एकूण पाणीसाठा असून ५७.०५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
दौंड येथून २ लाख १० हजार क्युसेक पर्यंत विसर्ग पोहोचला होता. तर धरणातून १ लाख २६ हजार क्युसेक इतका विसर्ग उजनीतून सोडण्यात आला होता.