वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील पिंप्री फॉरेस्ट आणि मानोरा तालुक्यातील म्हसणीनजीक असलेल्या अडाण प्रकल्पाच्या पातळीत सततच्या पावसामुळे वाढ होत आहे. अशात पातळी नियंत्रित करण्यासाठी चार दिवसांपासून या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
बुधवारी सकाळी या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग अधिक वाढविण्यासाठी पाचही दरवाजे प्रत्येकी ५० सेंटीमीटरने उघडण्यात आले होते.
आता यातून प्रतिसेकंद १५०.६४ घनमीटरचा विसर्ग करण्यात येत होता. जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे अडाण प्रकल्पाची पातळी सतत वाढत आहे. प्रकल्पाच्या पातळीत होत असलेली वाढ लक्षात घेता सोमवारपासून या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
३१ जुलै रोजी या प्रकल्पाचे पाचही दरवाजे प्रत्येकी ५० सेंटीमीटरने उघडून त्यातून प्रतिसेकंद १५०.६४ घनमीटरचा विसर्ग करण्यात येत होता.