Lokmat Agro >हवामान > उजनी धरणाच्या पाणीसाठ्याची परिस्थिती काय?

उजनी धरणाच्या पाणीसाठ्याची परिस्थिती काय?

What is the water storage situation of Ujani Dam? | उजनी धरणाच्या पाणीसाठ्याची परिस्थिती काय?

उजनी धरणाच्या पाणीसाठ्याची परिस्थिती काय?

चालू वर्षी मात्र धरणात २२ टक्केच पाणीसाठा झाला आहे. उर्वरित पावसाळ्यात पुणे जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नाही तर येणाऱ्या काळात तीव्र पाणीटंचाई सामोरे जावे लागू शकते.

चालू वर्षी मात्र धरणात २२ टक्केच पाणीसाठा झाला आहे. उर्वरित पावसाळ्यात पुणे जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नाही तर येणाऱ्या काळात तीव्र पाणीटंचाई सामोरे जावे लागू शकते.

शेअर :

Join us
Join usNext

दौंड येथून उजनी धरण्यात येणारा विसर्ग नगण्य असल्याने व धरणातून पिण्यासाठी नदीपात्रात पाणी सोडले असल्याने मागील चार दिवसात सुमारे एक टीएमसी पाणी कमी झाले आहे. मागील वर्षी २२ सप्टेंबर रोजी धरण १०५ टक्के भरले होते. चालू वर्षी मात्र धरणात २२ टक्केच पाणीसाठा झाला आहे. उर्वरित पावसाळ्यात पुणे जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नाही तर येणाऱ्या काळात तीव्र पाणीटंचाई सामोरे जावे लागू शकते.

मागील दोन-तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर उजनीच्या पाणलोट क्षेत्रात बऱ्यापैकी पाऊस पडत आहे. मात्र त्यामध्ये जोर नसल्याने बंडगार्डन येथून येणारा विसर्ग स्थिर असून दौंड येथून येणारा विसर्ग ही कमी जास्त होत असून त्यामध्ये फारशी वाढ झालेली नाही.

यातच सोलापूर शहरासह भीमा नदी काठावरील इतर शहरे व गावांना पिण्यासाठी ५००० क्यूसेकने पाणी सोडण्यात आले आहे. धरणात मात्र दौंड येथून तीन ते अडीच हजार क्युसेकने विसर्ग येत असल्याने मागील चार दिवसात धरणातील उपयुक्त जलसाठा एक टीएमसीने कमी झाला आहे. भविष्यात उजनीतील पाण्याचे मायक्रो नियोजन करण्याची गरज आहे. मागील वर्षी गरज नसताना व शेतकऱ्यांचीही मागणी नसताना सलग साडेचार महिने कॅनल मधून शेतीसाठी पाणी सोडल्याने १११ टक्के भरलेले उजनी धरण केवळ ढिसाळ नियोजनामुळे ३६ टक्के मायनस मध्ये गेले होते.

धरणाची सद्यस्थिती
- एकूण पाणी पातळी  ४९२.६०५ मीटर
- एकूण जलसाठा  ७५.४८ टीएमसी
- उपयुक्त जलसाठा  ११.८२ टीएमसी
- टक्केवारी  २२
- बंडगार्डन  ७२९क्युसेक
- दौंड  २३४९ क्युसेक

पाणी नियोजन करताना फक्त उजनी धरणापुरता विचार न करता भीमा खोरे हा एक घटक समजून या खोऱ्यातील एकत्रित पाण्याचे नियोजन कसे करावयाचे हे महत्त्वाचे आहे. उजनी धरणाच्या वरील वापर करते व खालील बाजूचे वापर करते असे दोन भाग पडतात. वरील भागातील लोक अधिक पाणी वापरतात. - अनिल पाटील, जलतज्ञ

Web Title: What is the water storage situation of Ujani Dam?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.