Lokmat Agro >शेतशिवार > किटकनाशके खरेदी करताय तर काय करावे? काय करू नये

किटकनाशके खरेदी करताय तर काय करावे? काय करू नये

What to do when buying pesticides? does and don't | किटकनाशके खरेदी करताय तर काय करावे? काय करू नये

किटकनाशके खरेदी करताय तर काय करावे? काय करू नये

किटकनाशक खरेदी करण्यासाठी आपण कीटकनाशके विक्रेते यांच्याकडे जात असतो. अशावेळी खरेदी करताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी आपण माहिती पाहणार आहोत.

किटकनाशक खरेदी करण्यासाठी आपण कीटकनाशके विक्रेते यांच्याकडे जात असतो. अशावेळी खरेदी करताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी आपण माहिती पाहणार आहोत.

शेअर :

Join us
Join usNext

पिक व्यवस्थापनात पिक संरक्षण घटकात कीटकनाशके हि महत्वाची निविष्ठा आहे आणि यावर शेतकऱ्यांचा अतोनात खर्च होत असतो. आपण खर्च करत असतो पण आपण जे कीटकनाशक खरेदी केले आहे त्याबद्दल आपणाला कितपत माहित असते हे शंकास्पद आहे.

कीटकनाशक खरेदी करण्यासाठी आपण कीटकनाशके विक्रेते यांच्याकडे जात असतो. अशावेळी खरेदी करताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. कीटकनाशके खरेदी करताना काय करावे? आणि काय करू नये?

हे करा

  • वैध परवाना असलेल्या नोंदणीकृत कीटकनाशक विक्रेत्यांकडूनच कीटकनाशके खरेदी करा.
  • तज्ञांचा सल्ला घेऊनच कीटकनाशके खरेदी करा.
  • एका विशिष्ट क्षेत्रात एका फवारणीसाठी आवश्यक असतील तेवढेच कीटकनाशके खरेदी करा.
  • कीटकनाशकांच्या डबा/पॅकेट्सवर मंजूर लेवले पहा.
  • लेबलांवर बॅच क्रमांक, नोंदणी क्रमांक, उत्पादनाची तारीख/कालबाह्यता पहा.
  • डब्यामध्ये/पॅकेटमध्ये चांगले पॅक केलेले सिलबंद कीटकनाशके खरेदी करा.
  • खरेदी पावती घेणे जरुरीचे आहे. त्यावर सर्व माहिती अचूक लिहीलीली असावी.


हे करु नका

  • फूटपाथ विक्रेत्यांकडून किंवा परवाना नसलेल्या व्यक्तीकडून कीटकनाशके खरेदी करू नका.
  • संपूर्ण हंगामासाठी मोठ्या प्रमाणात कीटकनाशके खरेदी करू नका.
  • डब्यावर मान्यताप्राप्त लेबल नसलेली कीटकनाशके खरेदी करू नका.
  • कालबाह्य झालेले कीटकनाशक कधीही खरेदी करू नका.
  • सीलबंद नसलेल्या, गळती होत असलेल्या डब्यामधून पॅकेटमधुन कीटकनाशके खरेदी करू नका.
  • कमी किमतीत डिस्काऊंट मध्ये देतो ह्याला बळी पडू नका.
  • बिल नंतर घेतो असे चालणार नाही. बिल खरेदी वेळीच घ्या.

 

Web Title: What to do when buying pesticides? does and don't

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.