Zero Tillage Technology : शून्य मशागत संवर्धित शेती (Conservation Farming) पद्धतीचा वापर करून जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी विकसित केलेले तंत्र म्हणजे 'शून्य मशागत तंत्र' होय. (Zero Tillage Technology)
संवर्धित शेती करण्यासाठी राज्यात कोल्हापूर येथील प्रगत शेतकरी आणि कृषितज्ज्ञ प्रतापराव चिपळूणकर यांनी स्वतः च्या शेतीतील प्रयोगातून विना नांगरणीची शेती सिद्ध करून दाखवली आहे. (Zero Tillage Technology)
संवर्धित शेतीमध्ये जमिनीच्या सुपिकता आणि विशेष करून सेंद्रिय कर्बाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. विना नांगरणीच्या शेतीमध्ये सुरूवातीलाच गादी वाफ्यावर पिकांची लागवड केली जाते. (Zero Tillage Technology)
नंतर गादीवाफे न मोडता आणि कोणतीही मशागत म्हणजेच नांगरणी, कुळवणी, वखरणी न करता तसेच पाभरीने पेरणी न करता पुढील पिकांची टोकण पद्धतीने लागवड केली जाते.
तणांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी निंदनी, भांगलणी किंवा कोळपणी न करता तणनाशकांचा वापर केला जातो. पिकांची काढणी करताना पिके जमिनीलगत कापून घेतली जातात आणि खोडाचे अवशेष (राख), धसकटे व मुळे तशीच जमीनीत गाडली जातात.
या तंत्रात पिके किंवा तणे मुळासकट उपटून काढली जात नाहीत त्यामुळे पिकांची व तणांची मुळे जमिनीत राहतात, कुजतात आणि त्यापासून सेंद्रिय खत तयार होते.
राज्यात आता अनेक शेतकरी शून्य मशागत तंत्राकडे वळताना दिसत आहेत. या तंत्राचा वापर करून सोयाबीन, कापूस, मका, सुर्यफुल, हरभरा, झेंडू, भात आदी पिके घेतली जातात. हे तंत्र फायदेशीर असल्याचा प्रयोगशील शेतकऱ्यांनी अनुभव घेतला आहे.
नो-टिल फार्मिंग
शून्य मशागत तंत्र (नो-टिल फार्मिंग) म्हणजे जमिनीची मशागत (नांगरणी, कुळवणी, वखरणी) न करता थेट बियाणे पेरण्याची पद्धत, जिथे मातीला कमीत कमी त्रास होतो आणि मातीची सुपीकता टिकून राहण्यास मदत मिळते.
तंत्राचे काय आहेत फायदे?
जमिनीची धूप कमी होते : मशागत केल्याने मातीची धूप होण्याची शक्यता वाढते, तर शून्य मशागत यावर नियंत्रण ठेवते.
जमिनीची सुपीकता टिकून राहते : मशागतीमुळे मातीतील कार्बन आणि पोषक तत्वे कमी होतात, तर शून्य मशागत तंत्राचा वापर केल्यास ते टिकून राहते.
पाणी आणि ऊर्जा बचत : मशागतीसाठी लागणारा वेळ, ऊर्जा आणि पाणी यांची बचत करण्यास मदत मिळते.
उत्पादन खर्चात बचत : शून्य मशागतीमुळे उत्पादन खर्चात बचत करण्यास मदत होते.
शून्य मशागतीची पद्धत
गादी वाफ्यावर लागवड : सुरुवातीला गादी वाफ्यावर पिकांची लागवड केली जाते. त्यानंतर कोणतीही मशागत न करता, त्याच गादी वाफ्यावर पुढील पिकांची लागवड करतात.
तणनाशकांचा वापर : तणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तणनाशकांचा वापर करतात.
टोकण पद्धतीने पेरणी : बियाणे टोकण पद्धतीने पेरले जातात, ज्यामुळे मातीला कमी त्रास होतो.
शून्य मशागतीचे प्रकार
शून्य मशागत : ही पद्धत तांदूळ आणि इतर पिकांसाठी वापरली जाते.
विना-नांगरणी : या पद्धतीत नांगरणी, कुळवणी, वखरणी यांसारख्या मशागती न करता थेट बियाणे पेरले जाते.
शून्य मशागतीची गरज काय?
जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी शून्य मशागत उपयुक्त आहे.
उत्पादन खर्च कमी करण्यासाठी मशागतीसाठी लागणारा खर्च कमी होतो.
पर्यावरणासाठी : जमिनीची धूप कमी होऊन पर्यावरणावर होणारा नकारात्मक परिणाम कमी करते.
जमिनीत शिरणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात वाढ होते. सेंद्रिय पदार्थ मातीत टिकून राहणे आणि पोषक तत्व वाढण्यास मदत करते. या पद्धतींमुळे जमिनीखाली आणि पृष्ठभागावरील नैसर्गिक जीवजंतूच्या प्रमाणात वाढ दिसून येते. सेंद्रिय पद्धतीत तण दाबण्यासाठी आच्छादन पिके लावून त्याचे अवशेष जमिनीत गाडले जाते. त्यामुळे ही पर्यावरणपूरक असे तंत्र आहे.
हे ही वाचा सविस्तर : Zero Tillage Technology: शुन्य मशागत 'तंत्र'च का? जाणून घ्या सविस्तर