Lokmat Agro >स्मार्ट शेती > कोरडवाहू शेतीमध्ये या पेरणी यंत्राने पेरणी करा होईल २५ टक्के उत्पादनात वाढ

कोरडवाहू शेतीमध्ये या पेरणी यंत्राने पेरणी करा होईल २५ टक्के उत्पादनात वाढ

25 percent increase in production will be achieved with this sowing machine in dry land farming | कोरडवाहू शेतीमध्ये या पेरणी यंत्राने पेरणी करा होईल २५ टक्के उत्पादनात वाढ

कोरडवाहू शेतीमध्ये या पेरणी यंत्राने पेरणी करा होईल २५ टक्के उत्पादनात वाढ

BBF Sowing बी.बी. एफ. हे ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र असून रुंद वरंबे व सऱ्या पाडणे, पेरणी आणि खते देणे अशी तिन्ही कामे एकाच वेळी केली जातात. यामध्ये दोन फाळ आणि पेरणीचे फण यातील अंतर गरजेनुसार कमी जास्त करता येते.

BBF Sowing बी.बी. एफ. हे ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र असून रुंद वरंबे व सऱ्या पाडणे, पेरणी आणि खते देणे अशी तिन्ही कामे एकाच वेळी केली जातात. यामध्ये दोन फाळ आणि पेरणीचे फण यातील अंतर गरजेनुसार कमी जास्त करता येते.

शेअर :

Join us
Join usNext

बी.बी. एफ. हे ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र असून रुंद वरंबे व सऱ्या पाडणे, पेरणी आणि खते देणे अशी तिन्ही कामे एकाच वेळी केली जातात. यामध्ये दोन फाळ आणि पेरणीचे फण यातील अंतर गरजेनुसार कमी जास्त करता येते.

तसेच सऱ्यांची रुंदीही कमी जास्त करता येते. उदा. वरंब्यावर सोयाबीन पिकाच्या ३ ते ४ ओळी ३० सें.मी. किंवा ४५ सें.मी. अंतरावर ३ ओळी घेता येतात. फाळामध्ये तयार होणाऱ्या सऱ्यांची रुंदी ३० ते ४५ सें.मी. गरजेनुसार ठेवता येते.

कोरडवाहू शेतीमध्ये जलसंधारणाच्या दृष्टीने बीबीएफ पद्धत अतिशय उपयुक्त आहे. तसेच अधिक व सततच्या पावसामध्ये अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने बीबीएफ पद्धत उपयोगी आहे. या पद्धतीमुळे सर्वसाधारणपणे २० ते २७ टक्क्यांपर्यंत जलसंधारण तर २५ टक्के उत्पादनात वाढ दिसून आली आहे.

बी.बी.एफ. पेरणी यंत्राचे फायदे
-
बीबीएफ पेरणी यंत्राच्या सहाय्याने उतारास आडवी पेरणी केल्यास मुलस्थानी जलसंधारण होते.
- या पध्दतीत कोरडवाहू शेतीमध्ये जलसंधारणाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे. पावसाच्या दिर्घकालीन खंड काळात याचा लाभ होतो.
- अंतरपिक पध्दतीचा अवलंब करून अधिकचे उत्पन्न घेता येते.
- बीबीएफ पध्दतीने निविष्ठा खर्चात (बियाणे, खते इ.) २० ते २५% बचत.
- खत व बियाणे एकाच वेळी पेरल्यामुळे खताचा कार्यक्षम वापर होतो.
- उत्पन्नामध्ये २५ ते ३०% वाढ होते.
- वरंब्यावर ओलावा टिकवून ठेवला जात असल्याने पर्जन्यामान खंडाच्या कालावधीत सुध्दा पाण्याचा ताणाची तीव्रता कमी होते.
- जास्त पर्जन्यमान झाल्यास या पध्दतीमधील सरीमधून अतिरिक्त पाणी वाहून जाण्यास मदत होते.
- पिकास मुबलक हवा सुर्यप्रकाश मिळाल्याने पिकाची जोमदार वाढ होऊन पिक किड रोगास बळी पडत नाही.
- पिकामध्ये अंतर मशागत करणे उभ्या पिकांस सरी मधून फवारणी यंत्राव्दारे किटकनाशक फवारणे शक्य होते.
- या पध्दतीचा अवलंब केल्याने जमिनीची धुप कमी प्रमाणात होऊन सेंद्रीय कर्बाचा हास थांबल्याने जमिनीची जलधारण क्षमता वाढते.
- या पध्दतीमुळे जमिनीची सच्छीद्रता वाढून जमिन भूसभुसीत होते. परिणामी पिकाची वाढ उत्तम होते.

अधिक वाचा: Kharif Pikvima यंदाच्या खरीपसाठीही मिळणार एक रुपयात पिक विमा

Web Title: 25 percent increase in production will be achieved with this sowing machine in dry land farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.