Join us

ग्रामीण तरुणांसाठी सुवर्णसंधी.. राज्य सरकारच्या ह्या योजनेतून कमवा महिन्याला दहा हजार वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 1:46 PM

Yojanadut महाराष्ट्र राज्यात सरकारी योजनांचा प्रचार करणे आणि महाराष्ट्रातील जास्तीत जास्त नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री योजना दूत या पदासाठी ५० हजार रिक्त जागांसाठी भरती आयोजित केली आहे.

महाराष्ट्र राज्यात सरकारी योजनांचा प्रचार करणे आणि महाराष्ट्रातील जास्तीत जास्त नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री योजना दूत या पदासाठी ५० हजार रिक्त जागांसाठी भरती आयोजित केली असून, मुख्यमंत्री योजना दूतसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

भरतीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा अथवा मुलाखत घेतली जाणार नाही आणि उमेदवारांची निवड ही थेट केली जाणार आहे. तुम्हीदेखील नोकरीच्या शोधात असल्यास तुम्हाला या राज्य सरकारच्या कार्यक्रमाचा लाभ घेऊन तुमच्या गावात किंवा तुमच्या शहरात राहूनच काम करता येणार आहे.

महिन्याला दहा हजार मानधननिवड झाल्यानंतर राज्य सरकारच्या वतीने या सर्व उमेदवारांना महिन्याला दहा हजार रुपये वेतनश्रेणी दिली जाणार आहे, निवड झालेल्या उमेदवारांचा ६ महिन्यांसाठीचा करार केला जाणार आहे. या करारामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढ करण्यात येणार नाही. निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी सुविधांचा लाभदेखील दिला जाणार नाही, याची सर्व अर्जदारांनी नोंद घेणे आवश्यक आहे.

आवश्यक पात्रता काय?■ योजनेचा अर्ज करण्यासाठीचा उमेदवार १८ ते ३५ वर्षे वयोगटातील असावा,■ उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असणे आवश्यक आहे.■ कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर शिक्षण पूर्ण झालेले असावे.■ उमेदवाराकडे संगणक चालविण्याचे कौशल्य असणेदेखील आवश्यक आहे.■ उमेदवाराकडे अद्ययावत असलेला मोबाइल म्हणजेच स्मार्टफोन असणे आवश्यक आहे.■ उमेदवाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.■ उमेदवाराच्या आधारकार्डला बँक खातेदेखील लिंक असणे आवश्यक असणार आहे.

आवश्यक कागदपत्रे काय?■ अर्जदाराचे आधार कार्डदेखील असणे आवश्यक आहे.■ शैक्षणिक पुरावा म्हणून पदवी उत्तीर्ण असलेले प्रमाणपत्र असावे.■ उमेदवाराचा रहिवासी दाखला असावा.■ वैयक्तिक बँक खात्याचा तपशीलदेखील असणे आवश्यक आहे.■ उमेदवाराकडे पासपोर्ट साइज फोटो असावा आणि उमेदवाराचे हमीपत्र असावे.

कोणती कामे करावी लागणार?निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची सर्व माहिती दिली जाणार आहे. प्रशिक्षित योजनादूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे बंधनकारक असणार आहे. योजनादूतांनी राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवरील यंत्रणांशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल, यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुन्यातील अहवाल ऑनलाइन अपलोड करतील.

येथे संपर्क साधा■ तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी असणारे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचेशी संपर्क करू शकता.

टॅग्स :सरकारराज्य सरकारनोकरीसरकारी योजनामहाराष्ट्र