Join us

एका झाडापासून आठ ते नऊ क्विंटल उत्पादन देणारी चिंचेची नवीन जात; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 08:44 IST

Shivai Chinch परभणी कृषी विद्यापीठाच्या संभाजीनगर येथील फळ संशोधन केंद्राने विकसित केलेला चिंच वाण 'शिवाई' यांना महाराष्ट्र राज्यात लागवडीस राष्ट्रीय पातळीवर अधिसूचीत करण्यासाठी मान्यता देण्यात आली.

उद्यानविद्या पिकांची गुणवत्ता, अधिसूचना आणि वाण प्रसाराणासाठीच्या दिनांक ५ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या ३१व्या केंद्रीय उपसमितीच्या बैठक झाली.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या संभाजीनगर येथील फळ संशोधन केंद्राने विकसित केलेला चिंच वाण 'शिवाई' यांना महाराष्ट्र राज्यात लागवडीस राष्ट्रीय पातळीवर अधिसूचीत करण्यासाठी मान्यता देण्यात आली.

या नवीन वाणांच्या मान्यतेमुळे शेतकऱ्यांना अधिक दर्जेदार आणि परिणामकारक वाण मिळून त्यांच्या उत्पादनामध्ये सकारात्मक बदल होतील.

चिंचेचा वाण ‘शिवाई’ वाणाबद्दल१) या वाणाच्या फळाची लांबी २०.४३ सेंटीमीटर, रुंदी ३.१३ सेंटीमीटर.२) फळाची सरासरी वजन ३५.३३ ग्राम, प्रति किलो गराचे वजन ४९७.०७ ग्राम.३) एकूण विद्राव्य घटकाचे प्रमाण ४१.६ टक्के.४) फळाची आम्लता ३१.२ टक्के.५) चिंचेतील चिंचोक्याचा आकार मोठा आणि संख्या कमी असल्यामुळे गर जास्त मिळतो.६) शिवाई वाणाच्या एका झाडापासून फळाचे उत्पादन आठ ते नऊ क्विंटल (प्रति झाड ८४३.३३ किलो) उत्पादन निघते.७) हा वाण कीड रोधक असून कोरडवाहू भागात उपयुक्त ठरणार आहे.

प्रक्रिया उद्योगात चिंचेला मागणी आहे. चॉकलेट, जेलीसह विविध खाद्यपदार्थात चिंच वापरतात. फटाके उद्योगात चिंचोक्याच्या पावडरला मागणी असते.

या वाणांच्या विकासासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इन्द्र मणि, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांचे महत्वपूर्ण सहकार्य आणि मार्गदर्शन मिळाल्याबद्दल शास्त्रज्ञानी कृतज्ञता व्यक्त केली आहे. चिंचेचा वाणविकासामध्ये डॉ. संजय पाटील, डॉ. रवी चव्हाण, डॉ. जी. एम. वाघमारे, डॉ. मोहन पाटील यांचे योगदान महत्वपूर्ण ठरले.

अधिक वाचा: मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्राकडून गहू, भात आणि तेलबियांच्या या आठ नवीन जाती विकसित

टॅग्स :फलोत्पादनफळेवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठविद्यापीठशेतकरीपीकशेती