Lokmat Agro >स्मार्ट शेती > घरच्या घरी फळे आणि भाजीपाला साठवण्यासाठी शून्य उर्जेवर आधारित शितकक्ष उभारण्याची सोपी पद्धत

घरच्या घरी फळे आणि भाजीपाला साठवण्यासाठी शून्य उर्जेवर आधारित शितकक्ष उभारण्याची सोपी पद्धत

A simple method of setting up a Zero Energy Freezer for storing fruits and vegetables at home | घरच्या घरी फळे आणि भाजीपाला साठवण्यासाठी शून्य उर्जेवर आधारित शितकक्ष उभारण्याची सोपी पद्धत

घरच्या घरी फळे आणि भाजीपाला साठवण्यासाठी शून्य उर्जेवर आधारित शितकक्ष उभारण्याची सोपी पद्धत

शून्य उर्जेवर आधारित शितकक्ष

शून्य उर्जेवर आधारित शितकक्ष

शेअर :

Join us
Join usNext

शून्य उर्जेवर आधारित शितकक्ष

फळे आणि भाजीपाल्याची नासाडी टाळण्यासाठी त्यांना चांगला बाजार भाव मिळण्यासाठी, शेतामध्ये फळे आणि भाजीपाला साठवण्यासाठी शेतकरी आपल्या शेतामध्ये शून्य उर्जेवर आधारित शितकक्ष म्हणजेच झीरो एनर्जी कूल चेंबर उभारू शकतात. यासाठी कोणत्याही प्रकारची उर्जेची आवश्यकता नसते. हा शितकक्ष बाधायला अत्यंत सोपा आणि कमी खर्चिक आहे. 

शितकक्ष उभारणीची पद्धत

बाष्पीभवनाचा थंडपणा या तत्वावर शून्य उर्जेवर आधारित शितकक्षाची रचना करण्यात आलेली आहे. ह्या शीत-कक्षाची उभारणी विटा, वाळू, बांबू, गवत, पोती अशी नेहमी मिळू शकणारी साधने वापरून करता येते. ह्या कक्षातील तापमान बाहेरील तापमानापेक्षा सुमारे १०-१५ डिग्री से. ने कमी असते व आर्द्रततेचे प्रमाण ८५ ते  ९५ % असते. या शितकक्षाची रचना हि हौदासारखी असते.

याची उंची ६७.५ सेमी उंचीच्या दोन भिंती घालून या दोन भिंतीमधील अंतर हे ७.५ सेमी ठेवावे भिंतींमधील दोन पोकळीत बारीक चाळून ओली वाळू भरावी, रुंदी ११५ सेमी आणि लांबी १६५ सेमी ठेवावी. 

शितकक्षाची देखभाल

वाळू, विटा व वरचे छप्पर सतत ओले ठेवावे. यासाठी दररोज सकाळी आणि संध्याकाळी दिवसातून दोन वेळा पाणी देऊन भिंत चागली ओली करावी. शक्य असल्यास पाण्याच्या टाकीला जोडलेली ठिबक सिंचन यंत्रणा वापरावी. शीत कक्षातील तापमान आणि आद्रतेच्या नियंत्रणाबाबत सांगायचे म्हणजे दिवसातून दोन वेळा पाणी दिल्याने विटा थंड होतात.

शितकक्षात साठवलेली फळे आणि भाजीपाल्याची उष्णता पाणी शिंपडल्याने बाहेर काढून टाकली जाते. यामुळे फळे आणि भाजीपाल्याचे आयुष्य वाढते. त्याचबरोबर फळे आणि भाजीपाला ताजा, टवटवीत दिसतात. त्याचबरोबर वजनातील घट कमी होते. फळ पिकण्याची प्रक्रिया हळुवार आणि एकसारखी होते.

लेखक 
प्रा. बी.जी.म्हस्के
सहाय्यक प्राध्यापक, एम.जी.एम. नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली छत्रपती संभाजीनगर.
डॉ. एन.एम. मस्के
प्राचार्य, एम.जी.एम. नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली छत्रपती संभाजीनगर.

Web Title: A simple method of setting up a Zero Energy Freezer for storing fruits and vegetables at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.