बायोडायनॅमिक शेतीमधे निसर्गाचा अर्थात सूर्य, चंद्र, शनि, पृथ्वी, गुरे, मानव अणि वातावरणाचा योग्य समन्वय साधला जातो. या तंत्रज्ञानाची शास्त्रीय ज्ञानाशी सांगड घातली जाते. शेतीसाठी उपयोगात येणारे सर्व निविष्ठा शेतावरच तयार केल्या जातात.
जसे सेंद्रिय पद्धतीने पिक अवशेषाचे पुनरचक्रीकरण, भू-सुधारण्यासाठी, बिजप्रक्रियासाठी बायोडायनॅमिक सी.पी.पीचा वापर, पिक संरक्षणासाठी बायोडायनॅमिक सी.पी.पी सोबत निवडक वनस्पती पाले, गोमूत्र, इत्यादीचा प्रमाणशीर वापर करण्यात येतो.
बायोडायनॅमिक कंपोस्टने जमिनीचा सेंद्रिय कर्ब प्रमाण वाढविण्यास मदत होते, जमीन नरम होऊन पावसाचे पाणी जमिनीत झिरपुन भूजल पातळीत वाढ होते. त्यामुळे पिकाच्या वाढीच्या कालावधीत पावसाचा खंड पडल्यास पिके ताण सहन करू शकतात. यासाठी अत्यंत कमी खर्चाची व शाश्वत उत्पादनाची ही पद्धत समजुन घेणे महत्वाचे आहे.
सी.पी.पी. (काऊ पॅट पीट) तयार करणेसी.पी.पी. एक बहुउपयोगी प्रिपरेशन आहे.तयार सीपीपीचा उपयोग कंपोस्ट खत करण्या व्यतिरीक्त बीज संस्कार, किटकनाशके तसेच भुमीसुधारक साठी करता येतो.
साहित्य१) दुध देणाऱ्या गायीचे शेण ६० किलो२) अंड्याचे कवच पावडर (भुकटी) २०० ग्रॅम३) बेसॉल्ट खडकाची पावडर (खडी क्रशर मधील पावडर) ५०० ग्रॅम४) गुळाचे पाणी २०० ग्रॅम५) बायोडायनॅमिक प्रिपरेशन ५०२ ते ५०७ कल्चरचे दोन संच
कृती१) जमिनीत ३ × २ x १ फुट आकाराचा विटांचा कुंड तयार करुन जमिनीवर अर्धा फुट उंचीचे राहिल असे बांधकाम करावे, कुंड सर्व बाजूने शेणमातीने लिंपून घ्यावे.२) दुभत्या गाईचे शेण, शेणातील काडीकचरा काढून स्वच्छ करुन त्यात २०० ग्रॅम गुळाचे पाणी टाकावे.३) २०० ग्रॅम अंड्याच्या कवचाची भुकटी (पुड) आणि ५०० ग्रॅम बेसाल्ट दगडाची पूड किंवा ट्युबवेलची माती वरील मिश्रणात मिसळून घ्यावी. हे मिश्रण १० ते १५ मिनीटे चांगले मळुन एकजीव करावे.४) हे सर्व तयार केलेल्या कुंडात मोकळे टाकावे. मिश्रण सपाट करुन घ्यावे. त्यावर दोन ओळीत प्रत्येक ६ छिद्र करुन बायोडायनॅमिक प्रिपरेशन ५०२ ते ५०६ चे दोन संच समांतर टाकावे. प्रिपरेशन ५०७ चे द्रावण अर्धा लिटर पाण्यात १५ मिनीटे चांगले घोळून घ्यावे ते शेवटच्या दोन छिद्रात टाकावे आणि शिल्लक पाणी कुंडात शिंपडावे.५) खड्ड्याला ओल्या गोणपाटाने झाकुन ठेवावे.६) खड्ड्यामधील मिश्रणाला पहिली उकरी १४ दिवसानंतर आणि पुढे प्रत्येक आठ दिवसानंतर पल्टी घ्यावी. ४० ते ६० दिवसांत सीपीपी खत तयार होते.
फायदे१) जमिनीत जिवाणूंची वाढ होते.२) वनस्पती वाढीसाठी अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो.३) जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.४) पिकांत रोग किड प्रतिकार शक्ती वाढते.५) बियाणे उगवण शक्ती उत्तम होते.६) वनस्पतीची सुक्ष्म मुलद्रव्यांची कमतरता भरुन काढली जाते.
सी.पी.पी. वापरण्याची पध्दती • बीजप्रक्रिया - ५०० ग्रॅम सीपीपी एक एकर क्षेत्राचे बियाणेसाठी - वापरावे किंवा ५० ग्रॅम प्रती किलो बियाणांसाठी वापरावे.• फवारणी - उभ्या पिकांवर २.५ किलो सीपीपी १०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे• फळझाडासाठी वृक्ष लेप - १ किलो सीपीपी वापरुन वृक्षलेप तयार करुन १०० झाडांसाठीवापरावे.• जमिनीत खत - २.५ किलो सीपीपी १०० लिटर पाण्यात मिसळुन जमिनीवर शिंपडावे.• द्रवरूप खत किटकनाशक - १ किलो सीपीपी ५० लिटर पाण्यात मिसळून द्रवखत/किटकनाशक तयार• कंपोस्ट खत तयार करणेसाठी - १ किलो सीपीपी १५ द ५ द ४ फुट आकाराच्या कंपोस्ट डेपोसाठी वापरावे.
सीपीपीची वैशिष्ट१) सीपीपीमध्ये ट्रायकोडर्मा ही जिवंत बुरशी आढळून आली आहे.२) घरी बनविता येत असल्यामुळे शेतकऱ्यांना सोईस्कर पडते.३. अत्यंत कमी कालावधीत कंपोस्ट बनविणे शक्य होते.