Lokmat Agro >स्मार्ट शेती > बाजारपेठेच्या अभ्यासानुसार लिंबू फळपिकात कसा धरावा बहार

बाजारपेठेच्या अभ्यासानुसार लिंबू फळपिकात कसा धरावा बहार

According to the market study, how to bahar management in lemon | बाजारपेठेच्या अभ्यासानुसार लिंबू फळपिकात कसा धरावा बहार

बाजारपेठेच्या अभ्यासानुसार लिंबू फळपिकात कसा धरावा बहार

फळांना बाजारात मागणी कशा प्रकारे राहील याचा विचार करून व आपल्याकडे सिंचनासाठी किती पाणी उपलब्ध राहील या बाबीचा विचार करून मग कोणता बहार घ्यावयाचा हे ठरवावे.

फळांना बाजारात मागणी कशा प्रकारे राहील याचा विचार करून व आपल्याकडे सिंचनासाठी किती पाणी उपलब्ध राहील या बाबीचा विचार करून मग कोणता बहार घ्यावयाचा हे ठरवावे.

शेअर :

Join us
Join usNext

फळांना बाजारात मागणी कशा प्रकारे राहील याचा विचार करून व आपल्याकडे सिंचनासाठी किती पाणी उपलब्ध राहील या बाबीचा विचार करून मग कोणता बहार घ्यावयाचा हे ठरवावे. कागदी लिंबामध्ये खालीलप्रमाणे बहार असतात.

अ.क्र.बहारफुले येण्याची वेळफळे उपलब्ध होण्याची वेळबाजारभाव
आंबे बहारजानेवारी-फेब्रुवारीजुन-जूलैबाजारात मागणी कमी असल्यामुळे भाव कमी
मृग बहारजुन-जूलैनोव्हेबर-डिंसेंबरलोणच्यासाठी मागणी बऱ्यापैकी
हस्त बहारऑक्टोंबर-नोव्हेंबरएप्रिल-मेमागणी जास्त असल्यामुळे भाव चांगले मिळतात.

अशा प्रकारे कागदी लिंबामध्ये मृग, हस्त आणि आंबे बहार असे तीन बहार येतात. बहार घेण्यापुर्वी जमिनीच्या प्रकारानुसार ३० ते ६० दिवसांचा पाण्याचा ताण द्यावा लागतो. ताण पूर्ण झाल्यानंतर झाडाची पाने गळण्यास सुरूवात होत आणि पाने सुकल्यासारखी दिसतात. ताण पुर्ण झाल्यानंतर झाडाना पहिले पाणी २५ टक्के, दुसरे पाणी ५० टक्के तिसरे पाणी ७५ टक्के व त्यानंतर १०० टक्के पाणी देऊन ताण तोडावा, पाण्यासोबत खतांच्या मात्रा द्याव्यात.

कागदी लिंबामध्ये हस्त बहार घेणे फायद्याचे का?
१) हस्त बहाराची फळ उन्हाळ्यात मिळतात त्याची प्रत चांगली असते.
२) फळांवर खैऱ्या (कँकर) रोगाचे प्रमाण अल्प असते.
३) फळांना शीतपेय तयार करण्यासाठी मागणी मोठ्या प्रमाणावर असते.
४) फळांना बाजारात भाव चांगला मिळतो.

हस्त बहार घेण्यामध्ये अडचणी
हस्त बहार घेण्यासाठी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाण्याचा ताण द्यावा लागतो. त्यावेळी ताण देणे जमत नाही.

उपाययोजना
हस्त बहार घेण्यासाठी झाडांना ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात ताण देणे शक्य नसते. झाडांची वाढ थांबवून झाडांमध्ये कार्बोदकांचे प्रमाण वाढविण्यासाठी काही इतर उपाय योजना कराव्या लागतात. तथापी या योजना काळजीपुर्वक करणे आवश्यक आहे. त्या योजना खालीलप्रमाणे आहेत.
१) पावसाळ्याच्या सुरूवातीला जुन महिन्यात शेंड्याकडुन ३० सेंमीपर्यंत फांद्याची छाटणी करावी.
२) सायकोसील या संजीवकाच्या २००० पीपीएम तीव्रतेच्या दोन फवारण्या १५ दिवसाच्या अंतराने ऑगस्ट महिन्यात कराव्यात किंवा प्रत्येक झाडास १० ते १५ मिली पॅक्लोबुट्राझॉल जमिनीमधून द्यावे.

अधिक वाचा: Lemon Variety लिंबू लावताय, ह्या आहेत लिंबाच्या टॉप तीन जाती

Web Title: According to the market study, how to bahar management in lemon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.