Lokmat Agro >स्मार्ट शेती > Adhar Card Free Update : आधार कार्ड आता 'या' तारखेपर्यंत करता येणार फ्री अपडेट वाचा सविस्तर

Adhar Card Free Update : आधार कार्ड आता 'या' तारखेपर्यंत करता येणार फ्री अपडेट वाचा सविस्तर

Adhar Card Free Update : Aadhar card can now be updated free of cost till 'this' date, read in detail | Adhar Card Free Update : आधार कार्ड आता 'या' तारखेपर्यंत करता येणार फ्री अपडेट वाचा सविस्तर

Adhar Card Free Update : आधार कार्ड आता 'या' तारखेपर्यंत करता येणार फ्री अपडेट वाचा सविस्तर

आधार कार्ड अपडेट करण्याच्या संदर्भात एक मोठी अपडेट आजच समोर आली आहे. वाचा सविस्तर (Adhar Card Free Update)

आधार कार्ड अपडेट करण्याच्या संदर्भात एक मोठी अपडेट आजच समोर आली आहे. वाचा सविस्तर (Adhar Card Free Update)

शेअर :

Join us
Join usNext

Adhar Card Free Update : आधार कार्ड अपडेट करण्याच्या संदर्भात एक मोठी अपडेट आजच समोर आली आहे.  आधार कार्ड अपडेट करणे सर्वांसाठी अनिवार्य आहे. त्यासाठी सरकारकडून मोफतमध्ये ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. आता ही फ्री सुविधा देण्याची तारिख वाढवण्यात आली आहे.

आधार कार्ड हे महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. बँकेपासून ते सरकारी कामांपर्यंत सर्वच ठिकाणी आधार कार्डचा वापर करण्यात येतो. आधार कार्ड शिवाय अनेक कामे रखडू शकतात. त्यामुळेच आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकांना महत्वाचे दस्तऐवज आहे.

यूआयडीएआयकडून भारतातील नागिरकांना आधार कार्ड देण्यात येते. हेच आधार कार्ड फ्रीमध्ये अपडेट करण्याची शेवटची तारिख आता परत एकदा वाढविण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपूर्वी यूआयडीएआयने आधार कार्ड फ्री अपडेट करण्याची तारिख १४ डिसेंबर म्हणजे आजपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतू आता ही तारिख ६ महिन्यांसाठी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आता तुम्ही तुमचे आधार कार्ड ऑनलाईन मोफत अपडेट करू शकता.

'ही' आहे नवीन तारिख
 
आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारिख १४ डिसेंबर २०२४ अशी ठवण्यात आली होती. पण अता ही वाढवून १४ जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या संदर्भात यूआयडीएआयने माहिती दिली आहे. त्यामुळे जर तुम्ही आतापर्यंत आधार कार्ड अपडेट केले नसेल किंवा अपडेट करायचा विचार करत असाल तर तुम्हाला फ्रीमध्ये आधार कार्ड अपडेट करण्याची एक संधी उपलब्ध झाली आहे.

असे करा आधार कार्ड अपडेट

*  पहिले UIDAI च्या अधिकृत वेबसाईट  https://myaadhaar.uidai.gov.in/portal ला भेट द्या.

* या वेबसाईटवर लॉग इन करा.

* सर्वप्रथम तुमचा आधार क्रमांक टाका.

* यानंतर तुम्हाला दिलेला कॅपचा कोड टाका.

* तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल.

* तो ओटीपी भरल्यावर तुमचा डॅशबोर्ड ओपन होईल.

* यानंतर अपडेट आधार कार्ड या पर्यायावर क्लिक करा.

* यानंतर तुम्हाला आयडी प्रूफ आणि ॲडेस प्रूफ अपडेट करावा लागेल.

* हे दोन्ही कागदपत्र अपलोड करा अपलोड करताना एक खबरदारी घ्या फाईलची साइज ही २  MB पेक्षा जास्त नासावी.

* त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करुन ते सबमिट करा.

* काही दिवसांनी तुमचे आधार कार्ड अपडेट होईल.

Web Title: Adhar Card Free Update : Aadhar card can now be updated free of cost till 'this' date, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.