Join us

Adsali Sugarcane : आडसाली उसातील संजीकांच्या फवारण्या कधी व कशा कराव्यात वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 10:55 IST

आडसाली उसात सद्यस्थितीत कसे व्यवस्थापन करावे व संजीकांची फवारणी कशी करावी ते पाहूया.

प्रत्येक साखर कारखान्याने उसाचे उत्पादन आणि साखर उतारा वाढविण्यासाठी एकूण गळीत क्षेत्राच्या १५ ते २० टक्के क्षेत्रावर आडसाली ऊस लागवड करण्याचे नियोजन करत असतात.

महाराष्ट्रात ऊस हे एक प्रमुख नगदी पीक असून, आडसाली हंगामात त्याची लागवड वाढत आहे. राज्याचे हवामान ऊस लागवडीसाठी अनुकूल आहे आणि योग्य तंत्रज्ञान वापरल्यास उत्तम उत्पादन मिळू शकते

आडसाली उसात सद्यस्थितीत कसे व्यवस्थापन करावे व संजीकांची फवारणी कशी करावी ते पाहूया.

  • आडसाली ऊसासाठी नोव्हेंबरमध्ये संजीवकांच्या तिसऱ्या फवारणीसाठी हेक्टरी ३५० लिटर पाणी लागेल. त्याकरिता जी.ए. ३ जिब्रेलिक अॅसीड (४० पीपीएम) १४ ग्रॅम, ६ बी.ए. ६ बेन्झिल अॅडेनाईन (४० पीपीएम) १४ ग्रॅम, ३५०० ग्रॅम १९:१९:१९, ८७५ ग्रॅम चिलेटेड सुक्ष्म अन्नद्रव्य व १७५० ग्रॅम सिलिकॉन (सिलिसायलिक अॅसिड) एकत्रित करून उसाच्या पानावर फवारणी करावी.
  • आडसाली उसाला साडे चार महिने झाले असल्यास मोठी बांधणीची कामे करावीत. बांधणीचे वेळी प्रति हेक्टरी १६० किलो नत्र (३४७ किलो युरिया) (७.७१ पोती), ८५ किलो स्फुरद (५३१ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) (११.८ पोती) व ८५ किलो पालाश (१४२ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) (३.१६ पोती) ही रासायनिक खतांची मात्रा द्यावी.
  • को ८६०३२ जातीसाठी प्रति हेक्टरी २०० किलो नत्र (४३४ किलो युरिया) (९.६४ पोती), १०० किलो स्फुरद (६२५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) (१३.८९ पोती) व १०० किलो पालाश (१६६ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) (३.६९ पोती) अशी रासायनिक खतांची मात्रा द्यावी.
  • लोकरी मावाग्रस्त उसावर मित्रकीटक आढळून आल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये. लोकरी माव्यासाठी डिफा अॅफिडीव्होरा, मायक्रोमस, क्रायसोपर्ला यासारख्या मित्र किटकांचे संवर्धन करावे. तसेच उसासाठी शिफारशीत रासायनिक खतांचा संतुलीत वापर करावा.
  • ठिबक सिंचनाची सोय असल्यास पाण्याबरोबर प्रति एकरी १२.५ किलो युरीया, ४.५ किलो युरीया फॉस्फेट व १३ किलो म्युरेट ऑफ पोटॅश या विद्राव्य खतांची मात्रा दर आठवड्यातून एकदा द्यावी.
  • आडसाली उसासाठी नोव्हेंबरच्या चौथ्या आठवड्यात संजीवकांच्या चौथ्या फवारणीसाठी हेक्टरी ३५० लिटर पाणी लागेल. त्याकरिता जी.ए. ३ जिब्रेलिक अॅसीड (४० पीपीएम) १५ ग्रॅम, ६ बी.ए. ६ बेन्झिल अॅडेनाईन (४० पीपीएम) १५ ग्रॅम, ३७५० ग्रॅम १९:१९:१९, ९३७ ग्रॅम चिलेटेड सुक्ष्म अन्नद्रव्य व १८७५ ग्रॅम सिलिकॉन (सिलिसायलिक अॅसिड) एकत्रित करून उसाच्या पानावर फवारणी करावी.

अधिक वाचा: Phule Sugarcane 11082 : आला हा ऊसाचा लवकर पक्व होणार वाण वाचा सविस्तर

टॅग्स :ऊसशेतीपीकठिबक सिंचनखतेपीक व्यवस्थापन