तुमच्या शेतातील मातीचा प्रकार समजण्यासाठी सोपे उपाय व समस्यायुक्त मातीचे प्रकार कोणते व त्याची सुधारणा कशी करायची याविषयी माहिती पाहूया.
सुरवातीला माती हातामध्ये घेऊन थोडी ओली करावी व त्याचा तळहातानेच गोल गोळा बनवीण्याचा प्रयत्न करावा.
- जर ओल्या मातीचा गोळा तयार न होता मातीचे कण सुटे होवून बोटातुन गळू लागले तर समजावे जमिन रेताड मातीची आहे. अशा जमिनीत सेंद्रिय कर्ब भरपुर प्रमाणात टाकावे.
- जर ओला मातीचा अगदी सहज गोळा तयार होत असेल व माती चिकट जाणवत असेल तर जमिन चिकनमातीची (क्ले सॉईल) आहे. म्हणून अशा जमिनीत ५०% इतकी वाळू व सेंद्रिय खते मिसळावीत.
- मऊ पण थोडी खरबरित, थोडी चिकट व जिचा अगदी सहज गोळा बनतो अशी माती म्हणजे पोयटा माती, लागवडीसाठी अतिशय उपयुक्त मानली जाते. शिफारस केलेली सेंद्रिय व अन्नद्रव्ये अशा मातीत टाकावीत.
साम्स्यायुक्त जमिनी आणि सुधारणा
१) क्षारयुक्त जमिन
- ड्रीपर्सच्या खाली मातीच्या पृष्ठभागावर पांढऱ्या रंगाचा थर निर्माण झाला म्हणजे जमिन क्षारयुक्त आहे.
- अशा जमिनीत भरपुर प्रमाणात चांगले पाणी द्यावे जेणेकरुन क्षार खाली जातील (लीच) होतील.
- तसेच लागवड वरब्यांच्या उंचवट्यावर न करता उताराच्या मध्यावर करावी.
२) खारपड जमीन
- ज्या मातीमध्ये विनिमययोग्य सोडीयम चे प्रमाण अधिक असते अशा जमीनीस खारपड जमीन म्हणतात.
- अशी जमीनीत जेव्हा पाणी साठते व नंतर सुकल्यानंतर अशी मातीचे पापुद्रे अलग होतात.
- अशा जमिनीत मृदा परिक्षण अहवालानुसार ५०% जिप्सम द्यावे व त्यानंतर पाणी देऊन क्षारांचे लीचींग करावे.
अधिक वाचा: डाळिंब बागेत लवकर व मोठ्या प्रमाणात फुलधारणा होण्यासाठी सोपे उपाय