Join us

Ananas Lagavd : अननसाची लागवड कशी केली जाते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 2:10 PM

अननस हे एक महत्वाचे पिक आहे. हवाबंद डब्यात साठवलेल्या अननसात व रसामध्ये असलेले 'ब्रोमेलीन' हे पचनास उपयुक्त आहे. त्यामुळे परदेशात चांगली मागणी असल्याने अननस लागवड क्षेत्र वाढविण्यासाठी वाव आहे.

अननस हे एक महत्वाचे पिक आहे. हवाबंद डब्यात साठवलेल्या अननसात व रसामध्ये असलेले 'ब्रोमेलीन' हे पचनास उपयुक्त आहे. त्यामुळे परदेशात चांगली मागणी असल्याने अननस लागवड क्षेत्र वाढविण्यासाठी वाव आहे.

अननसाच्या अनेक जाती आहेत. परंतु, 'क्यू' व 'क्वीन' या जातींची लागवड मोठ्या प्रमाणावर व्यापारीदृष्ट्या केली जाते. 'क्यू' ही कॅनिंगसाठी प्रसिद्ध जात आहे.१) क्यू- त्याची फळे साधारणतः १.५ ते २.५ किलो वजनाची असतात.- पानांना दाते किंवा काटे टोकाकडे सोडल्यास इतरत्र नसतात.- तसेच डोळे खोलवर गेलेले नसतात. त्यामुळे फळांचा उपयोग विशेष करून चकत्या डब्यात हवाबंद (कॅनिंग) करण्यासाठी केला जातो.- 'क्वीन' या जातीच्या पानांना अणकुचीदार दाते असतात.- फळांचे वजन एक ते दीड किलोपर्यंत असते व फळांचा दर्जाही उत्तम असतो.- फळे खुसखुशीत व गोडीला चांगली असल्याने कापून खाण्यासाठी उत्तम असतात.- फळांचे डोळे खोलपर्यंत गेलेले असतात. त्यामुळे कॅनिंगसाठी अयोग्य आहे.

२) मॉरिशियस- 'मॉरिशियस' ही जात 'क्वीन' जातीप्रमाणे काटेरी व फळांवरील डोळे खोलगट गेलेली असते.- फळे एक ते दीड किलो वजनाची, कापून खाण्यासाठी उत्तम. - 'मॉरिशियस रेड' व 'मॉरिशियस यलो' असे दोन प्रकार फळाच्या रंगावरून पडतात.

३) जायंट क्यू- या जातीची फळे मोठी, अडीच ते ३.५ किलो वजनाची असून, 'क्यू' जातीसारखी आहेत.- कॅनिंगसाठी उत्तम जात आहे.

अननसाची अभिवृद्धी- अननसाची अभिवृद्धी शाखीय पद्धतीने झाडाला जमिनीपासून येणारे फुटवे (सकर्स) फळाखालचा मूळ दांडा व पाने यामध्ये वाढणारा फळाखालील कोंब व फळांवरील शेंडे (क्राऊन) यापासून करतात.- ४५० ग्रॅम वजनाचे फुटवे (सकर्स) लागवडीसाठी उत्तम असतात.- फुटवे वापरून लागवड केल्यास १८ ते २२ महिन्यांनी फळे तयार होतात.- अति पावसात लागवड न करता, कोकणात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये केलेली लागवड फायदेशीर ठरते.

पूर्वतयारीअननस लागवडीसाठी जमीन नांगरून व कुळवून ३० ते ४० सेंटिमीटर खोलीपर्यंत भुसभुशीत करावी. हेक्टरी २० ते २५ टन शेणखत टाकावे.

लागवड- या पिकाची लागवड ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये चरात केली जाते.- त्यासाठी ३० सेंटिमीटर खोलीचे ३ ते ४ मीटर लांबीचे चर तयार करावेत.- दोन चरांतील अंतर ९० सेंटिमीटर, चरातील दोन रांगेतील अंतर ६० सेंटिमीटर, दोन झाडांतील अंतर १५ सेंटिमीटर ठेवावे.- मात्र विरळ लागवडीमध्ये दोन झाडांतील हे अंतर ३० ते ४५ सेंटिमीटरपर्यंत वाढवता येते.

अननसाची लागवड अशा पद्धतीने केल्यास प्रति हेक्टरी ७६,१९० रोपे बसतात. त्यापासून सर्वाधिक ८६.५ टनापर्यंत 'क्यू' जातीपासून उत्पन्न मिळते. लागवड जवळ जवळ केल्यास प्रत्येक फळाचे वजन कमी होते. नारळ बागेत मिश्र पीक म्हणून अननसाची लागवड करता येते.