Lokmat Agro >स्मार्ट शेती > डाळिंब पिक संरक्षणासाठी अॅन्टी हेलनेट कव्हरला मिळतंय अनुदान वाचा सविस्तर

डाळिंब पिक संरक्षणासाठी अॅन्टी हेलनेट कव्हरला मिळतंय अनुदान वाचा सविस्तर

Anti hail net cover getting subsidy for pomegranate crop protection Read more | डाळिंब पिक संरक्षणासाठी अॅन्टी हेलनेट कव्हरला मिळतंय अनुदान वाचा सविस्तर

डाळिंब पिक संरक्षणासाठी अॅन्टी हेलनेट कव्हरला मिळतंय अनुदान वाचा सविस्तर

गारपीट व अवकाळी पाऊस यापासून डाळिंब बागांचे संरक्षण करणे. शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या व उच्च प्रतीच्या निर्यातक्षम डाळिंब पिकांच्या उत्पादनासाठी आर्थिक सहाय्य करणे.

गारपीट व अवकाळी पाऊस यापासून डाळिंब बागांचे संरक्षण करणे. शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या व उच्च प्रतीच्या निर्यातक्षम डाळिंब पिकांच्या उत्पादनासाठी आर्थिक सहाय्य करणे.

शेअर :

Join us
Join usNext

गारपीट व अवकाळी पाऊस यापासून डाळिंब बागांचे संरक्षण करणे. शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या व उच्च प्रतीच्या निर्यातक्षम डाळिंब पिकांच्या उत्पादनासाठी आर्थिक सहाय्य करणे. फळबागांकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे. ग्रामीण भागातील युवकांना कृषी क्षेत्रात स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणे.

पात्रतेचे निकष
योजनेअंतर्गत रोपवाटीका पूर्णपणे नव्याने उभारावयाची आहे. या घटकांतर्गत यापूर्वी शासनाचा लाभ घेतलेले खाजगी रोपवाटीकाधारक, शासनाच्या लाभ न घेता उभारलेल्या खाजगी रोपवाटीकाधारक तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजना, एकात्मिक फलोत्पादन अभियान, पोकरा किंवा इतर योजनेतून संरक्षित शेती (शेडनेट व हरितगृह) घटकाचा लाभ घेतलेले लाभार्थी पुनःश्च सदर योजनेंतर्गत लाभास पात्र राहणार नाहीत.

डाळिंब हे भारतातील कोरडवाहू प्रक्षेत्रावर येणारे अतिशय महत्वाचे फळपिक आहे. त्यात महाराष्ट्र राज्य हे अग्रेसर आहे. उत्पादनात अग्रेसर असले तरी महाराष्ट्र राज्यातील डाळिंब पिकाची उत्पादकता कमी होत आहे. यातील अनेक कारणांपैकी प्रामुख्याने वातावरणीय बदल, अद्ययावत तंत्रज्ञानाचा अभाव, जमिनी व पिकाचे आरोग्य इत्यादी महत्वाची कारणे आहेत. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तींना सतत सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार व निर्यातक्षम डाळिंब पिकाचे उत्पादन घेण्यास मर्यादा येत आहेत. अवेळी पाऊस व गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीपासून डाळिंब बागांच्या संरक्षणासाठी अॅन्टी हेलनेट कव्हर घटकाचा शासकीय योजनेअंतर्गत समावेश करण्याबाबत शेतकरी तसेच लोकप्रतिनिधींद्वारे सातत्याने मागणी होत आहे.

डाळिंब फळबागांचे गारपीटीपासून संरक्षणासाठी दक्षतेचा उपाय म्हणून अॅन्टी हेल नेट कव्हर एम.एस. अँगल सांगाड्यासहित या तंत्रज्ञानाबाबत महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहूरी यांच्या स्तरावर तज्ञ समितीने शिफारस केलेली आहे. अॅन्टी हेल नेट कव्हर एम.एस. अँगलच्या संरचनेवर लावल्याने गारपीट व अतिवृष्टीपासून फळे व झाडांचे संरक्षण होते. त्याअनुषंगाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत १०० हेक्टर क्षेत्राकरिता प्रायोगिक तत्वावर सदर घटकाची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यात करण्यात येत आहे.

लाभार्थी निवडीचे निकष
• शेतकऱ्याने योजनेअंतर्गत अर्ज करताना त्यांच्या स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे.
• स्वतःच्या मालकीची जमीन नसल्यास शेतकऱ्यांच्या आपसातील भाडेपट्टा करार या योजनेत ग्राह्य धरण्यात येणार नाही. तथापि शेतकऱ्याने शासकीय किंवा निमशासकीय घेतलेल्या जमिनीवर डाळिंब पिकासाठी प्लॅस्टिक कव्हर तंत्रज्ञानाचा वापर करावयाचा असल्यास दीर्घ मुदतीचा (किमान १५ वर्ष) व दुय्यम निबंधकाकडे नोंदणीकृत केलेला भाडेकरार या योजनेत ग्राह्य धरण्यात येईल
• या योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकरी, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था / भागीदारी संस्था, शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्या शासकीय, निमशासकीय व अशासकीय संस्था यांना लाभ घेता येईल.
• अॅन्टी हेलनेट कव्हर तंत्रज्ञानाचा वापर डाळिंब बागांसाठीच अनिवार्य राहील.
• या घटकाचा लाभ घ्यावयाचा असल्यास महाडिबीटी प्रणालीवर अर्ज करणे आवश्यक राहील तसेच जिल्ह्यास दिलेल्या लक्षांकाच्या मर्यादेत सदर शेतकऱ्यांना लाभार्थी निवडीमध्ये प्राधान्य देण्यात येईल.
• योजनेंतर्गत निवड होण्यापूर्वी सदर घटकाची अंमलबजावणी / उभारणी केलेला शेतकरी पात्र राहणार नाही.

अंमलबजावणीची कार्यपद्धती
१) लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडिबीटी https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login या ऑनलाईन संकेतस्थळावर अर्ज करावेत.
२) महाडिबीटी प्रणालीवर सदर घटकासाठी निवड झाल्यानंतर लाभार्थ्यांनी खालील कागदपत्रे अपलोड करावीत.
• ७/१२ उतारा (डाळिंब फळबागेच्या नोंदीसह)
• ८-अ
• आधार कार्डची छायांकीत प्रत.
• आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत.
• जात प्रमाणपत्र (अनु. जाती/अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)
• विहीत नमुन्यातील हमीपत्र.
• बंधपत्र.
• चतुःसीमा नकाशा.

डाळिंब पिकासाठी अॅन्टी हेलनेट कव्हर तंत्रज्ञानाच्या खर्चाचे मापदंड व अनुदान मर्यादा
• एकर डाळींब पिकासाठी M.S. अँगलच्या सांगाड्यासहीत अॅन्टीहेलनेट कव्हर या घटकाकरिता रु.४,२२,६४०/- खर्च येतो (रु. १०६.१६ प्रति चौ.मी.)
• राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के अनुदान देय आहे.
• सदर घटकाचा लाभ २००० ते ४००० चौ.मी. च्या मर्यादेत डाळिंब पिकासाठी अॅन्टी हेलनेट कव्हर तंत्रज्ञानाच्या मार्गदर्शक सूचना सन २०२२-२३ सदर घटकाची अंमलबजावणी करुन लाभ घेता येईल.

१) डाळिंब पिकासाठी अॅन्टी हेलनेट कव्हरकरिता सांगाड्याची उभारणी
अ) M.S angle च्या मेन पोलची उभारणी करण्याकरिता २ फूट खोल व १ फूट व्यास घेऊन खड्डा तयार करावा व त्यामध्ये सिमेंट काँक्रीट (M15 ग्रेड) भरुन होलपासच्या (८ इंच लांबी व १० मिमी व्यास) सहाय्याने फाऊंडेशन पोलची जोडणी करुन मेन पोलची उभारणी करावी तसेच शेवटच्या मेन पोलला आधार देण्याकरिता Supporting MS angle ची जोडणी करावी त्याकरिता १.५ फूट खोल व १ फूट व्यासाचा खड्डा तयार करावा व त्यामध्ये सिमेंट काँक्रीट (M15 ग्रेड) भरुन होलपासच्या (८ इंच लांबी व १० मिमी व्यास) सहाय्याने फाऊंडेशन पोलची जोडणी करुन तिरकस पद्धतीने मेन पोलला Supporting MS angle ची जोडणी करावी.
ब) डाळिंब पिकासाठी मुलभूत 'Y' आकाराचा सांगाडा तयार करण्याकरिता MS STRIP (४ फूट २ इंच लांबी, १ इंच रुंदी आणि ५ मिमी जाडी) ची जोडणी प्रत्येक मेन पोल करिता नट बोल्टच्या (M८ X 25mm, M१० X ४० mm) सहाय्याने करावी. अशा प्रकारे 'Y' आकाराच्या सांगाड्याची उभारणी MS angle (५० X ५० X ५) mm मध्ये करुन यु.व्हि संस्करित अॅन्टी हेलनेट (गारा विरोधक जाळी) आच्छादन करावे तसेच अॅन्टी हेलनेट (गारा विरोधक जाळी) व 'Y' आकाराचा सांगाडा यांच्या मध्यभागी कमीत कमी ४ फूट लांब अँगलच्या (Minimum 4ft Length from the beginning of Y-angle) तुकड्याची उभी जोडणी करावी. जेणेकरुन डाळिंब पिकासाठी पोषक वातावरण ठेवता येईल.
२) एक एकर डाळिंब पिकाकरिता अॅन्टी हेलनेट कव्हरचा वापर करावयाचा असल्यास जाळीच्या संरक्षणासाठी पॉलिइथिलीन प्लास्टिक कॅप (UV Stabilized Polymer based Caps for MS-angles for protection of Net) किमान ९० प्लास्टिक कॅपचा वापर करावा.
३) यु.व्हि. संस्करित अॅन्टी हेलनेट (गारा विरोधक जाळी) कव्हरची जोडणी करण्यासाठी मधल्या व बाजूच्या जीआय वायर १० गेजच्या वापरण्यात याव्यात.
४) अॅन्टी हेलनेट (गारा विरोधक जाळी) कव्हर आणि जीआय वायर बांधण्यासाठी पॉलिइस्टर वायरचा वापर करावा.
५) अतिनील प्रतिरोधक अॅन्टी हेलनेट तांत्रिक निकष स्टँडर्ड साईज: १०० X ९ फूट, किमान ४ मिमी जाड अतिनील प्रतिरोधक दोरी चारही कडांवर एम्बेड केलेली. अॅन्टी हेलनेटचे आयुष्यमान किमान ३ वर्षे, सूर्यप्रकाश आत येण्याची क्षमता ७५ ते ८० टक्के, कमीत कमी वजन ६५ ते ८० ग्रॅ./ चौ.मी. अॅन्टी हेलनेट कव्हरच्या बाजुंना ५० सेंमी. पेक्षा कमी अंतरावर छिद्रे असावीत. अॅन्टी हेलनेट ही अॅन्टी सल्फर व अॅन्टी क्लोरीन असावी.

Web Title: Anti hail net cover getting subsidy for pomegranate crop protection Read more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.