महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत सन २०१९ पासून मधकेंद्र योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येते. या योजनेमुळे शेतकरी व बेरोजगारांना रोजगाराची एक नवी संधी उपलब्ध झाली आहे. तो एक नाविण्यपूर्ण उद्योग आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मधमाशापालन उद्योगाचे प्रशिक्षण देण्यात येते.
योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता
अ) वैयक्तिक मधपाळ
- या योजनेसाठी अर्जदार साक्षर असावा.
- स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येते.
- वयाची १८ वर्ष पूर्ण केलेली व्यक्ती या योजनेसाठी पात्र असते.
ब) वैयक्तिक केंद्र चालक (प्रगतशील मधपाळ)
- या योजनेसाठी किमान १० वी पास असावे.
- वय वर्षे २१ पेक्षा जास्त अशा व्यक्तींच्या नावे अथवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान १ एकर शेत जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन असणे आवश्यक.
- लाभार्थींकडे मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.
योजनेची वैशिष्ट्ये
- या योजनेंतर्ग मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येते.
- साहित्य स्वरुपात ५० टक्के अनुदान व ५० टक्के स्वगुंतवणूक अशाप्रकारे या योजनेचे स्वरुप आहे.
- शासनाच्या हमी भावाने मध खरेदी करण्यात येतो.
- विशेष (छंद) प्रशिक्षणाची सुविधा देण्यात येते.
- मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती करण्याचे काम या योजनेंतर्गत करण्यात येते.
अटी व शर्ती
लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणांपूर्वी लाभार्थींनी ५० टक्के स्वगुंतवणूक रक्कम भरणा करणे अनिवार्य राहील. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील.
संपर्क
- या योजनेच्या अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी कार्यालय (द्वारा-जिल्हा उद्योग केंद्र) येथे संपर्क साधवा.
- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सातारा येथील संचालक, मध संचालनालय, सरकारी बंगला नं.५, महाबळेश्वर, जिल्हा. सातारा ४१२८०६ (दुरध्वनी : ०२१६८-२६०२६४) यांच्याशी संपर्क साधावा.