Join us

अधिक पिक उत्पादनासाठी रासायनिक खतांचा भडिमार टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2023 4:04 PM

कमी जमिनीत अधिक उत्पन्न मिळविण्याची स्पर्धा सध्या सर्वत्र लागली आहे. त्यामुळे रासायनिक खतांचा भडीमार मोठ्या प्रमाणात केला जात आहे. परिणामी, जमिनीचा पोत घसरण्यासोबतच उत्पादित अन्नधान्याचा मानवी आरोग्यावरसुद्धा विपरित परिणाम होत असल्याचे घातक चित्र सध्या निर्माण झाले आहे.

एकेकाळी खंडीने उत्पन्न मिळत असायचे, देशी अन्नधान्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हायचे. त्यामुळे पिकांसाठी रासायनिक खतांचा वापर टाळला जात होता. परंतु, कमी जमिनीत अधिक उत्पन्न मिळविण्याची स्पर्धा सध्या सर्वत्र लागली आहे. त्यामुळे रासायनिक खतांचा भडीमार मोठ्या प्रमाणात केला जात आहे. परिणामी, जमिनीचा पोत घसरण्यासोबतच उत्पादित अन्नधान्याचा मानवी आरोग्यावरसुद्धा विपरित परिणाम होत असल्याचे घातक चित्र सध्या निर्माण झाले आहे.

पूर्वीच्या काळात वयोवृद्ध शेतकरी गावातील पारावर बसून उत्पादनाबाबत चर्चा करत असायचे. पिकांवर कोणत्याही रोगांचे आक्रमण झाल्यास चर्चेतून उपाययोजना करत होते. मात्र, कालांतराने ही पद्धतच मोडीत निघाली. आता कोणत्याही गावात हे चित्र दिसून येत नाही. पीक चांगले राहण्याकरिता आता शेतकरी रासायनिक खते व औषधांचा भरमसाठ वापर करतात. त्यामुळे शेतजमिनीचा दर्जा खालावत आहे. सोबतच जमिनीतील अत्यंत सुपीक आणि पोषक तत्त्वे नष्ट होत आहेत. सध्या पिकांना रासायनिक खतांचा डोस न दिल्यास उत्पन्नात घट येत असल्याचेही दिसून येते. परिणामी शेतकरीही त्याचा अतिवापर करतात. अधिक उत्पन्नासाठी त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. सिंचन सुविधा मुबलक असल्याने त्यांना जमिनीतूनच जादा उत्पन्न घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे.

या पाळीव जनावरांची विष्ठा शेतीसाठी शेणखत म्हणून उपयोगी येत होती. या जनावरांची विष्ठाच खताचे काम करत होती. शेणखत जमिनीसाठी अत्यंत पोषक ठरत होते. त्यामुळे शेतजमिनीतील पोषक तत्त्वांना बळ मिळत होते. जमिनीतील पोषक तत्त्वांना शेणखतापासून कोणतीही हानी पोहोचत नव्हती. सोबतच पूर्णपणे निरोगी पिकांपासून शेतकऱ्यांना भाजीपाला व इतरही पिके घेता येत होती. परिणामी उत्पादनाचा दर्जाही अत्यंत चांगला राहात होता. पीक कसदार होत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनाही पौष्टिक अन्न मिळत होते. परंतु, सध्या शेती करण्याची पद्धत बदलली आहे.

पोषक तत्त्वे नामशेषसध्या आधुनिकतेच्या काळात नवीन तंत्र वापरून शेती पिकांचे उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तथापि, उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होत असल्याने जमिनीतील मुख्य पोषक तत्त्वेच नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे भविष्यात शेती नापीक होण्याची शक्यता बळावली आहे. शेतकरी गाय, म्हैस, बैल, शेळ्या आदी पाळीव जनावरे पाळून शेतीपूरक जोडधंदा करताना दिसून येते होते.

शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा वापर कमी करावा. जास्त करून सेंद्रिय खते, गांडूळखत, शेणखत, कंपोस्टखत आदीचा वापर करावा. या खतांचा वापर केल्यावर शेतीचे आरोग्य सुधारेल. जमिनींचा पोत वाढेल. - गणेश भोसले, तालुका कृषी अधिकारी, जुन्नर

वाढत्या लोकसंख्येमुळे वडिलोपार्जित शेती क्षेत्र कमी झाले आहे. जमीन कमी झाल्याने कमी शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्नासाठी शेतकरी रासायनिक खतांचा केमिकलयुक्त, किटकनाशके तसेच तणनाशक याचा अधिक वापर करत आहेत. परिणामी जमिनीतील पोषक घटक नष्ट होऊन जमीन नापीक होण्याचे प्रकार होऊ शकतात, त्यामुळे रासायनिक खतांचा वापर कमी करणे गरजेचे आहे. - शरद डुंबरे, शेतकरी

टॅग्स :खतेसेंद्रिय खतपीकशेतकरीशेतीआरोग्यअन्न