Lokmat Agro >स्मार्ट शेती > गांडूळ खत तयार करतांना 'या' चुका टाळा आणि दर्जेदार गांडूळ खत मिळवा

गांडूळ खत तयार करतांना 'या' चुका टाळा आणि दर्जेदार गांडूळ खत मिळवा

Avoid these mistakes while preparing vermicompost and get quality vermicompost | गांडूळ खत तयार करतांना 'या' चुका टाळा आणि दर्जेदार गांडूळ खत मिळवा

गांडूळ खत तयार करतांना 'या' चुका टाळा आणि दर्जेदार गांडूळ खत मिळवा

Vermi Compost : आजच्या अर्थात गांडूळ खत काळाची गरज भाग ०४ या शेवटच्या भागात दर्जेदार गांडूळखत तयार करण्यासाठी घ्यावयाची काळजी, द्रवरूप गांडूळखत (व्हर्मी वॉश) म्हणजे नक्की काय? तसेच गांडूळखत वापरासंबंधी घ्यावयाची सर्वसाधारण काळजी या विषयीची माहिती जाणून घेणार आहोत. 

Vermi Compost : आजच्या अर्थात गांडूळ खत काळाची गरज भाग ०४ या शेवटच्या भागात दर्जेदार गांडूळखत तयार करण्यासाठी घ्यावयाची काळजी, द्रवरूप गांडूळखत (व्हर्मी वॉश) म्हणजे नक्की काय? तसेच गांडूळखत वापरासंबंधी घ्यावयाची सर्वसाधारण काळजी या विषयीची माहिती जाणून घेणार आहोत. 

शेअर :

Join us
Join usNext

गांडूळ खत काळाची गरज या मालिकेच्या भाग ०३ मध्ये आपण गांडूळ खत निर्मितीची सुलभ पद्धत कोणती? गांडूळखत निर्मितीसाठी लागणारे खाद्य, जागेची निवड, निकष, गांडूळखतात असलेले अन्नद्रव्याचे प्रमाण, उच्च प्रतीचे गांडूळखत कसे ओळखावे आदींची सविस्तर बघितली. 

आजच्या अर्थात गांडूळ खत काळाची गरज भाग ०४ या शेवटच्या भागात दर्जेदार गांडूळखत तयार करण्यासाठी घ्यावयाची काळजी, द्रवरूप गांडूळखत (व्हर्मी वॉश) म्हणजे नक्की काय? तसेच गांडूळखत वापरासंबंधी घ्यावयाची सर्वसाधारण काळजी या विषयीची माहिती जाणून घेणार आहोत. 

दर्जेदार गांडूळखत तयार करण्यासाठी घ्यावयाची काळजी

• गांडूळखत मिश्रण भरतांना प्रत्येक थरावर पाण्याचा भरपूर वापर करावा मात्र वाफ्याच्या किंवा टाकीच्या आजूबाजूला पाणी साचून दलदल होणार नाही याची काळजी घ्यावी.
• वाफ्यातील ओलसरपणा सतत टिकून राहण्यासाठी उन्हाळ्यात दिवसातून दोनदा (सकाळ/ सायंकाळ) व इतर ऋतूंमध्ये दररोज एकदा झारीने पाणी द्यावे. 
• गांडूळखत निर्मिती झाडाच्या नैसर्गिक सावलीत किंवा इतर मार्गाने निर्माण केलेल्या सावलीतच करावी. 
• वाफ्यावर गोणपाटाचे आच्छादन ठेवावे. 
• अधूनमधून वाफ्यातील आच्छादन उघडून पाहावे व गांडूळाचे नैसर्गिक शत्रू उदा. बेडूक,उंदीर, मुंगळे, मुंग्या इत्यादींचा प्रादुर्भाव तपासून पहावा व वेळीच त्यांचा बंदोबस्त करावा. 
• जाड्या भरड्या सेंद्रिय अवशेषांचे शक्य तितके लहान तुकडे करावे व पाण्याने भिजवून घेऊन मऊ झाल्यावरच त्याचा गांडूळखत निर्मितीसाठी वापर करावा. 
• गांडूळाच्या खाद्यासाठी जनावरांचे ताजे शेण उपयोगात अनु नये. कारण त्यात उष्णता असते व त्यामुळे गांडूळाना इजा होण्याची शक्यता असते. त्याऐवजी चार ते पाच दिवस सावलीत साठवलेले शेण वापरावे. 
• शेणाबरोबरच हरभरा/ज्वारी इतर कडधान्याचे गीरणीतील पीठ किंवा स्वयंपाक घरातील भांडी धुतलेले टाकाऊ पाणी यांचा वापर केल्यास गांडूळाचे चांगले पोषण होऊन संख्येत जलद वाढ होते व कमी कालावधीत उत्तम प्रतीचे गांडूळखत तयार होण्यास मदत होते. 
• गांडूळखत तयार होण्याच्या शेवटच्या चार ते पाच दिवसाआधी आणि देणे बंद करावे जेणेकरून गांडूळखत कोरडे होईल व गांडूळे ओलाव्याच्या शोधात तळाशी जातील व वरचे गांडूळखत चाळून घेणे सोपे जाईल. 
• तयार गांडूळखत बारीक चाळून झाडाच्या सावलीत सिमेंटच्या टाक्यात किंवा गोणपाटाच्या पोत्यात व्यवस्थित भरून ठेवावे. 

द्रवरूप गांडूळखत (व्हर्मी वॉश)

• गांडूळाच्या शरीरातील चिकट द्रवालाच द्रवरूप गांडूळखत म्हणतात. गांडूळाचे शरीर लांब व दंडगोल आकाराचे असून आतील भागात आतडी असतात, त्या आतड्याच्या भोवतालचा बराच भाग पोकळ असतो. तो जाड चिकट द्रव्याने भरलेला असतो. गांडूळाच्या शरीरातून जास्तीचे पाणी जाऊ दिले तर हा चिकट द्रव्य गोळा करता येतो या चिकट द्रवालाच द्रवरूप गांडूळखत, गांडूळ पाणी किंवा व्हर्मिवाश असेही म्हणतात.

• द्रवरूप गांडूळखतात पिकांना लागणारे सर्व अन्नद्रव्य असतातच पण त्याचबरोबर सूक्ष्म जिवाणू अमिनो आम्ले, संजीवके, प्रतीजैविके मोठ्या प्रमाणावर असतात यांचा उपयोग जमिनीत पिकांच्या मुळाशी केल्यास किंवा पाण्यात पिकानुसार १:१ ते १:१० या प्रमाणात मिसळून पिकांवर फवारणी केल्यास पिकाच्या वाढीस अनुकूल परिणाम होतात.

गांडूळखत वापरासंबंधी घ्यावयाची सर्वसाधारण काळजी 

• गांडूळखताचा वापर रासायनिक खते, तणनाशके, कीटकनाशके इत्यादी सोबत कटाक्षाने टाळावा. गांडूळखतासोबत पिकांना रासायनिक खतेही द्यावयाची असल्यास प्रथम रासायनिक खते वापरून १५ ते २० दिवसांनी ते जमिनीत एकजीव झाल्यानंतर गांडूळखत वापरावे. 

• पिकांच्या मुळाभोवती गांडूळखत टाकल्यानंतर भरपूर ओलावा राहील याची काळजी घ्यावी. ओलाव्याशिवाय गांडूळखताची उपयोगिता दिसून येत नाही. 

• गांडूळ खतातील अंडीपुंज व छोटी गांडूळ याची वाढ होऊन जमिनीत त्यांची संख्या वाढवण्यासाठी इतर सेंद्रिय पदार्थ वरचेवर देऊन सतत ओलावा राखणे गरजेचे आहे. अन्यथा गांडूळखताची व गांडूळाची कार्यक्षमता टिकणार नाही. 

डॉ. श्रीकांत मोहन खुपसे
सहाय्यक प्राध्यापक
एमजीएम, नानासाहेब कदम, कृषी महाविद्यालय, गांधेली, छ संभाजीनगर.

डॉ. व्ही. जी. अतकरे 
सहयोगी अधिष्ठाता,
कृषी महाविद्यालय, नागपुर.

हेही वाचा : (मागील भाग) गांडूळ खत निर्मितीसाठी शेतकऱ्यांच्या फायद्याची सोपी पद्धत कोणती? वाचा सविस्तर

Web Title: Avoid these mistakes while preparing vermicompost and get quality vermicompost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.