राज्यात सध्या सर्वत्र उन्हाळी बाजरी लागवड हंगाम सुरू आहे. शेतकरी बाजारात उपलब्ध असलेल्या विविध लोकप्रिय किंबहुना याआधी परिसरातील शेतकऱ्यांना सर्वोत्तम उत्पादन देणाऱ्या वाणाची निवड करून त्याची लागवड आपल्या शेतामध्ये करत आहे.
याच अनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत अधिक उत्पादन देणारे सर्वोत्तम बाजरीचे वाण कोणते आहेत तसेच त्यांची वैशिष्ट्य काय आहेत ? याविषयीची सविस्तर माहिती.
बाजरी (जैवसंपृक्त) संकरीत वाण : एएचबी - १२०० एफ इ
अ.क्र. | तपशिल | विवरण |
१ | पिक / वाणाचे नाव | बाजरी (जैवसंपृक्त) संकरीत वाण : एएचबी - १२०० एफ इ |
२ | प्रसारीत केलेले वर्ष | २०१७ |
३ | प्रसारीत करणारी संस्था/ विद्यापीठ | राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर (वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी). |
४ | हंगाम | खरीप |
५ | पिकाचा कालावधी | ८० ते ८५ |
६ | उत्पादकता / हे. | धान्य : २७ ते ३० क्विंटल. कडबा : ५५ ते ६० क्विंटल. |
७ | वाणाची वैशिष्ट्ये / विशेष गुणधर्म | • घट्ट कणीस व टपोरे दाणे रंग हिरवट तसेच फुटव्याचे प्रमाण जास्त १५ ते १८ ग्रॅम. • १००० दाण्याचे वजन १५ ते १८ ग्रॅम. • लोहाचे प्रमाण सरासरी ८८ मि.ग्रॅ./कि.ग्रॅ • जस्ताचे प्रमाण ४३ मि.ग्रॅ./कि.ग्रॅ असून संपूर्ण देशात प्रसारित करण्याची शिफारस करण्यात आली आहे. • हा वाण गोसावी व करपा रोगास प्रतिकारक आहे. |
बाजरी (जैवसंपृक्त) संकरीत वाण : एएचबी - १२६९
अ.क्र. | तपशिल | विवरण |
१ | पिक / वाणाचे नाव | बाजरी (जैवसंपृक्त) संकरीत वाण : एएचबी - १२६९ |
२ | प्रसारीत केलेले वर्ष | २०१८ |
३ | प्रसारीत करणारी संस्था/ विद्यापीठ | राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर (वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी). |
४ | हंगाम | खरीप |
५ | पिकाचा कालावधी | ८० ते ८२ दिवस |
६ | उत्पादकता / हे. | धान्य : ३० ते ३२ क्विंटल. कडबा : ७२ ते ७५ क्विंटल. |
७ | वाणाची वैशिष्ट्ये / विशेष गुणधर्म | • घट्ट कणीस व टपोरे दाणे रंग हिरवट तसेच फुटव्याचे प्रमाण जास्त १५ ते १८ ग्रॅम. • १००० दाण्याचे वजन १५ ते १८ ग्रॅम. • ह्या वाणामध्ये लोहाचे प्रमाण सरासरी ९१ मि.ग्रॅ./कि. ग्रॅ व जस्ताचे प्रमाण ४३ मि.ग्रॅ./कि.ग्रॅ. असून संपूर्ण देशात प्रसारीत करण्याची शिफारस करण्यात आली. • हा वाण गोसावी व करपा रोगास प्रतिकारक आहे. |
बाजरी सरळ वाण : एबीपीसी - ४ - ३
अ.क्र. | तपशिल | विवरण |
१ | पिक / वाणाचे नाव | बाजरी सरळ वाण : एबीपीसी - ४ - ३ |
२ | प्रसारीत केलेले वर्ष | २००९ |
३ | प्रसारीत करणारी संस्था/ विद्यापीठ | राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर (वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी) |
४ | हंगाम | खरीप व उन्हाळी |
५ | पिकाचा कालावधी | ८० ते ८५ दिवस |
६ | उत्पादकता / हे. | धान्य : २५ ते ३० क्विंटल. कडबा : ५० ते ५५ क्विटल. |
७ | वाणाची वैशिष्ट्ये / विशेष गुणधर्म | • दाण्याचा आकार मध्यम व रंग हलका हिरवट • फुटव्याचे प्रमाण जास्त. • १००० दाण्याचे वजन १२ ते १५ ग्रॅम. • या वाणाची शिफारस महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व तामिळनाडू राज्यासाठी करण्यात आली आहे. • हा वाण गोसावी व करपा रोगास प्रतिकारक आहे. |