Banana Sigatoka केळीतील करपा (सिगाटोका) या रोगामुळे केळीच्या उत्पादनामध्ये मोठी घट येते व रोगग्रस्त झाडावरील फळांना बाजारात योग्य भाव मिळत नाही. या रोगामुळे केळीची प्रत कमी झाल्याने उत्पादन व आर्थिक बाबींवर प्रतिकुल परिणाम होत आहे.
करपा रोगाचा प्रसार प्रामुख्याने हवेव्दारे होतो पावसाळ्यात व हिवाळ्यात पडणारे दव, भारी जमीनीतील लागवड पाण्याचा अयोग्य निचरा असणाऱ्या जमीनीत लागवड करणे रोगाच्या वाढीस आर्द्रता व उष्ण हवामान आवश्यक असते. (२२ ते २८ अंश सेंग्रे तापमान व ८० टक्के आर्द्रता)
करपा रोगाची लक्षणे
• रोगाची सुरवात झाडाच्या खालच्या पानांवर होते.
• सुरवातीला ठिपके लहान, लांबट वर्तुळाकार फिक्कट पिवळे दिसून येतात.
• ठिपके पानांच्या शिरेस समांतर वाढत जावून
• पिवळ्या रेषेच्या स्वरूपात दिसतात.
• कालांतराने ठिपके राखाडी रंगाचे होवून भोवताली पिवळसर वलय तयार होते.
• ठिपके साधारण १ ते २ मी.मी. ते २ ते ३ से.मी.
• करपा रोगाची ठिपके सर्वसाधारणपणे पानांच्या कडांवर/शेंडयावर आढळून येतात.
करपा रोगाचा प्रसार
• बुरशी लैंगिक (Ascospores) आणि अलैंगिक (Conidia)
• लैंगिक बिजाणू हवेमार्फत दूरवर वाहून केले जाते.
• अलैंगिक बिजाणूचा प्रसार रिमझिम पडणारा पाउस, दवबिंदू, सिंचन इत्यादी.
• लैंगिक बिजाणूमुळे नविन बागेवर रोगाची लागण.
रोग प्रसारास कारणीभुत घटक
१) हवामान : तापमान २३ ते ३० सें. ग्रेड आर्द्रता ८० ते ९० टक्के व रिमझिम पाउस
२) झाडांचे वय/अवस्था : झाडांचे जूने पान व सर्वात खालचे अकार्यक्षम पाने रोगास बळी बळी पडतात.
३) झाडाची वाढ/जोम : झाड जोमदार व सशक्त असेल तर रोगास कमी बळी पडतात. याउलट झाड कमकुवत असेल तर रोगास जास्त प्रमाणात बळी पडतात.
४) अन्नद्रव्य व पाण्याचे व्यवस्थापन : बागेला असंतुलीत व गरजेपेक्षा कमी अन्नपुरवठा कमी केल्यास रोगाचे प्रमाण वाढते. तसेच गरजेपेक्षा जास्त पाणी देणे यामुळेसुध्दा रोगाचे प्रमाण वाढते. याकरीता पाणी ठिबक सिंचनापे दयावे व बागेत ड्रेनेज चाऱ्या खोदाव्यात.
५) झाडाची अवस्था : रोगाचा प्रादुर्भाव झाड मुख्य वाढीच्या अवस्थेत, फळधारणेच्या काळात व झाडावर घड असतांना मोठया प्रमाणात होते. ही अवस्था पावसाळी हंगामात झाल्यास रोगाचा प्रकोप जास्त प्रमाणात होतो. तसेच अनेक शेतकरी घड पोसण्याच्या काळात रासायनिक खते नेहमी देत नाही त्यामुळे रोगाचे प्रमाण वाढते.
६) इतर मशागतीची कामे : बागेतील रोगग्रस्त पाने नियमीत न काढणे, तण नियंत्रण न करणे बाग अस्वच्छ ठेवणे, शिफारशीपेक्षा कमी अंतरावर दाट लागवड, कंद प्रक्रिया अभाव, सर्वसाधारण स्वच्छतेचा अभाव, पिकाची फेरपालट, प्रतिबंधात्मक फवारणींचा अभाव इत्यादी.
करपा रोगामुळे होणारे नुकसान
■ हरीतद्रव्याचा ऱ्हास, पाने फाटतात, पाने करपतात.
■ कार्यक्षम पानांची संख्या कमी होते.
■ अन्ननिर्मीतीच्या प्रक्रियेत बाधा.
■ घडातील केळी आकाराने लहान, गर भरत नाही, घडातील फळे अकाली पिकू लागतात.
रोगाचे प्रभावी व्यवस्थापन व नियंत्रण
■ मशागतीच्या पध्दतीने रोगाचे नियंत्रण करणे.
■ रोगग्रस्त पाने कापणे किंवा पानाचा रोगग्रस्त भाग कापणे.
■ शिफारसीनुसार योग्य अंतरावर लागवड करणे.
■ रोगमुक्त व जोमदार टिश्युकल्चर रोपे/कंद लागवड करणे.
■ कंदाची लागवड करतांना कंद बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून लावणे.
■ शिफारशीप्रमाणे अन्नद्रव्याचा पुरवठा करणे.
■ बागेत पाण्याचा निचरा निर्माण करणे, गरज असल्यास चर काढणे, बाग वाफसा स्थितीत ठेवावी.
■ पावसाळयापुर्वी बुरशीनाशकाची फवारणी.
■ खोडवा घेण्याचे टाळावे.
रासायनिक नियंत्रण
■ बुरशी नाशकांचा वापर केल्यास रोगाचे नियंत्रण प्रभावीपणे करता येते.
■ स्पर्शजन्य बुरशीनाशके पानांच्या पृष्ठभागावरील रोगाचे स्पोअर नष्ट करतात. आंतरप्रवाही बुरशीनाशके पानांमध्ये आत शिरून पानाच्या पेशीतील रोगाला नष्ट करतात.
■ कोरडया हवामानामध्ये १५ दिवसाला एक फवारणी व तर पावसाळ्यात ढगाळ वातावरणात १० दिवसांनी एक बुरशीनाशकाची फवारणी घेणे आवश्यक आहे.