Join us

विद्राव्य खतांच्या वापरासाठी फायदेशीर फर्टिगेशन तंत्रज्ञान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 1:54 PM

पाण्यात विरघळणारी खते ठिबक सिंचन अथवा तुषार सिंचन द्वारे पिकांच्या मुळाजवळ गरजेनुसार परंतु रोज किंवा १-२ दिवसाआड देणे याला फर्टिगेशन असे म्हणतात.

पाण्यात विरघळणारी खतेठिबक सिंचन अथवा तुषार सिंचन द्वारे पिकांच्या मुळाजवळ गरजेनुसार परंतु रोज किंवा १-२ दिवसाआड देणे याला फर्टिगेशन असे म्हणतात. फर्टिगेशनमुळे मोजकीच खते पिकांच्या मुळांना मिळतात. खतांचा प्रभावी वापर होतो व अपव्यय टळतो.

फर्टिगेशनचे फायदे १) झाडाची वाढ चांगली होते. पिकांना पाणी आणि अन्नद्रव्याचा नियमित पुरवठा होत असल्यामुळे उत्पादन वाढते. २) फळाची गुणवत्ता वाढते. विद्राव्य खत वापरल्यामुळे खताची बचत होते. ३) पारंपरिक रासायनिक खते पाण्यात संपूर्णपणे विरघळत नाहीत. परंतु हि खते पाण्यात संपूर्णपणे (१००%) विरघळतात त्यामुळे पिकांना ती लवकर उपलब्ध होतात.४) पारंपरिक खतांमध्ये क्लोराईड व सोडियम सारखी हानिकारक मूलद्रव्ये असतात. त्यामुळे उत्पादन व फळाची प्रत कमी होते. तसेच या क्षारामुळे जमिनी खारवट व चोपणट होतात.५) पारंपरिक खते मोठ्या प्रमाणात विकत घ्यावी लागतात. त्यांचा वाहतुकीचा खर्च खूपच जास्त असून. वाहतूक करणेही जिकरीचे काम असते. परंतु पाण्यात विरघळणारी खते हि अगदी कमी प्रमाणात घ्यावी लागतात. त्यामुळे वाहतुकीचा खर्च अगदी कमी असून वाहतूक करणे हि अगदी सोपे असते.६) आम्लधर्मीय खतांचा पाण्यात नियमितपणे ठिबक मधून वापर करावा. त्यामुळे जमिनीचा सामू नियंत्रित राहण्यास मदत होते.७) वाढीच्या प्रत्येक अवस्थेत वेगवेगळ्या अन्न घटकांची आवशकता त्याचे व्यवस्थापन आपण केवळ फर्टिगेशन तंत्रामधूनच करू शकतो.८) पारंपरिक रासायनिक खतामधील अन्नद्रव्ये झाडांना त्वरीत उपलब्ध होत नाहीत. परंतु या खतामधील अन्नद्रव्ये झाडांना त्वरित उपलब्ध होतात.९) पाण्याचा होणारा निचरा, बाष्पीभवन, स्थिरीकरण इ. कारणामुळे पारंपरिक रासायनिक खते झाडांना अगदी कमी प्रमाणात उपलब्ध होतात व बाकीची वाया जातात.१०) बहुतेक पारंपरिक खते पाण्यात विरघळत नसल्यामुळे ती ठिबक संचातून आगर तुषार सिंचनातून देता येत नाहीत.११) पारंपरिक खते फार तर दोन किंवा चार भागात विभागून देतात परंतु विद्राव्य खते पिकांच्या गरजेनुसार व अवस्थेनुसार अगदी नियमित देता येतात. १२) विद्राव्य खते थेट पिकांच्या मुळ्याच्या कक्षेत दिली जातात. १३) विद्राव्य खते आम्लधर्मीय असल्यामुळे ठिबक सिंचन संचात अगर तुषार सिंचन संचात क्षार साचत नाहीत. ड्रीपर किंवा नोझल चॉक होत नाहीत.१४) विविध विद्राव्य खते एकमेकांमध्ये मिसळता येण्यास योग्य असतात.१५) एकाच द्रावणातून नत्र, स्फुरद व पालाश हि तीनही अन्नद्रव्ये देता येतात. १६) विद्राव्य खताच्या वापरामुळे हलक्या जमिनीतूनही अधिक उत्पादन मिळणे शक्य आहे.

फर्टिगेशन करताना घ्यावयाची काळजीसाधारणतः जमीन रोज वापसा अवस्थेत राहील एवढेच पाणी झाडांना दिले पाहिजे. कारण वापसा स्थितीतच वनस्पती, हवा, पाणी, अन्नद्रवे चांगल्या रीतीने घेऊ शकते. पाण्याची मात्रा एकदा निश्चित केल्यावर विद्राव्य खते देण्याचा कालावधी निश्चित करावा. खते देण्याचा दर  व कालावधी खते देण्याच्या साधनानुसार बदलत असतो. विद्राव्य खतांचा वापर एकूण सिंचनाच्या कालावधीच्या मधल्या कालावधीत करायचा असतो.

समजा आपण १२० मिनिटे ठिबक सिचन संच चालवीत असलो तर सर्व प्रथम ६० मिनिटे ठिबक सिंचन संचाद्वारे फक्त पाणी द्यावे. नंतर ४० मिनिटे विद्राव्य खते ठिबक सिंचनाद्वारे द्यावीत. नंतर २० मिनिटे पुन्हा पाणी द्यावे. शेवटी पाणी एवढ्या करिता  द्यावे लागेल कि जेणेकरून ठिबक सिंचन संचात खते साचून न राहता खताचा संपूर्ण मात्रा झाडाच्या मूळच्या मुळापर्यंत पोहचेल. खते देण्याचे साधन कोणतेही असो किंवा कालावधी कितीही असला तरी खतांची तीव्रता हि पिकानुसार २०० ते ५०० पी.पी.एम. एवढी असावी. 

एवढ्या तीव्रतेची खते पिकांना  दिली तर पिके अन्नद्रवे घेऊ शकतात. त्यामुळे फर्टिगेशनच्या कालावधीला खूपच महत्व आहे. पिकांना जास्त पाणी देऊ नये. अन्यथा पाण्याबरोबर खतांचाही निचरा होऊन जाईल म्हणूनच पिकांना गरजे इतकेच पाणी देणे महत्वाचे ठरते. विद्राव्य खते फवारणी करण्यास योग्य असतात. हे जरी खरे असले तरी पिकांना कोणत्या अन्नद्रव्याची गरज अशाच खतांची निवड करून मगच त्याची फवारणी करावी. फवारणी करताना त्याची तीव्रता पिकांनुरूप ७५०-१००० पी.पी.एम. एवढी असावी.   

बी. जी. म्हस्केसहाय्यक प्राध्यापकडॉ. एन. एम. मस्केप्राचार्यएम. जी. एम. नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली, औरंगाबाद९०९६९६१८०१

टॅग्स :ठिबक सिंचनशेतकरीखतेपीकशेती