Join us

फायदेशीर चंदन लागवडीचे तंत्रज्ञान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 10:29 AM

चंदनाच्या लाकडाचा भाव प्रति किलो ४ ते ५ हजार रुपये असा आहे. २० वर्षे वाढ झालेल्या चंदन झाडापासून २५ ते ३० किलो लाकूड मिळते. आजचा बाजारभाव पाहता सुमारे ५ ते ६ कोटींचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळते.

चंदनाच्या लाकडाचा भाव प्रति किलो ४ ते ५ हजार रुपये असा आहे. २० वर्षे वाढ झालेल्या चंदन झाडापासून २५ ते ३० किलो लाकूड मिळते. आजचा बाजारभाव पाहता सुमारे ५ ते ६ कोटींचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळते. चंदनाच्या तेलालाही प्रति लिटर ५ लाख रुपये असा दर मिळतो. राज्यात चंदनाच्या झाडामध्ये तेलाचे प्रमाण सरासरी पाच लिटर इतके आहे. प्रति हेक्टरी १०० लिटर तेल सहज मिळून जाते. मात्र तेल मिळवण्यासाठी जितके मजूर वापरावे लागतात. त्या तुलनेत त्यांची मजुरी परवडणारी नाही. चंदनाची बाजारपेठ जगभर आहे. पूर्वेकडील चीन, जपान, सिंगापूर, हाँगकाँग, तवान या देशांत मोठी मागणी आहे. चंदनाचे लाकूड कोरीव कामासाठी खासकरून वापरले जाते. त्यामुळे काष्ठशिल्प बनविण्यासाठी त्याची मागणी वाढत आहे.

देवतांची मूर्ती, शोभेच्या वस्तू बनविण्यासाठी गाभ्याचे लाकूड आवश्यक असते. अशा प्रकारचे लाकूड २० वर्षांच्या लागवडीतून सहजपणे उपलब्ध होते. पावसाचे प्रमाण कमी होत चालले असताना दुष्काळी स्थितीत तग धरून राहणारी चंदनशेती लाभदायक ठरू शकते. बँकेतील ठेवीसारखा या शेतीचा फायदा करून घेता येणे सहज शक्य आहे. शासनानेही चंदनशेतीसाठी प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतलेली आहे. सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्ष लागवड व वैरण विकास योजनेंतर्गत याची लागवड करण्यासाठी अर्थसाहाय्य केले जाते. याचा लाभ घेत राज्याच्या अनेक भागांतील शेतकरी चंदनशेती करण्यासाठी पुढे येत आहेत.

लागवडमान्सून पावसाची सुरुवात होताच जून, जुलै, ऑगस्ट मध्ये रोपांची लागवड करता येते. याकरीता उन्हाळ्यामध्ये मार्च महिन्यात १६' x १२' अंतरावर १.५ x १.५ x १.५ फुटाचे खड्डे खोदून घ्यावेत. खड्डयामध्ये किटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी करून अर्धा खड्डा सेंद्रिय अथवा कंपोस्ट खत, निंबोळी पावडर व कल्पतरू सेंद्रिय खत (२५० ग्रॅम) ने भरून घ्यावा. त्यानंतर एक पाऊस झाल्यावर जमिनीत ओल असताना रोपांची लागवड करावी व शेजारच्या खड्डयामध्ये यजमान वृक्षाच्या रोपांची लागवड करावी. यजमान रोप कालांतराने मरते व चंदन त्याच्या जवळ असल्याने इतर दिर्घायुषी यजमान वृक्षाच्या मुळांमधून आपले आवश्यक ते अन्न शोषण सुरू करते.

चंदन हा अर्धपरजीवी वृक्ष आहे. याला संस्कृत भाषेत 'शर्विलक' म्हणतात. शार्विलक म्हणजे चोर. चंदन हे आपणास लागणारी सर्व खाद्यान्ने व जिवनसत्वे स्वत:च्या मुळाद्वारे शोषून घेत असतात. त्याकरिता चंदनाची लागवड करताना त्याच्या शेजारी यजमान वृक्षानी लागवड करावी लागते. चंदनाची वाढ खुरटी राहते व झाड २-३ वर्षांनी मरते. पिशवीतील रोपे लागवडीपुर्वी १ लि. जर्मिनेटर चे १०० लि. पाण्यात द्रावण तयार करून पिशवी मध्ये रोपांना ५० ते १०० मिली द्रावणाची आळवणी करावी. नंतर लागवडीच्यावेळी रोपाची प्लॅस्टिक पिशवी अलगद बाजूला काढून रोप लावावे. लागवडीनंतर त्याला पुन्हा जर्मिनेटरचे वरीलप्रमाणे ड्रेंचिंग (आळवणी) करावी.        यजमान दिर्घायुषी झाडे: साग, सादडा, लिंब, सुरू, पळस, करंज, निलगिरी, बाभूळ, सुबाभुळ, शिरीष, काशिद, खैद, सिसम, रक्तचंदन, तामण, गावडा, मोह, कुमकुम वृक्ष इ. ची लागवड करता येते.      यजमान मध्यम आयुषी झाडे: हादगा, शेवरी, शेवगा, सुरू, निलगिरी, बांबू, ग्लिरीसिडीया, निरगुडी, बकुळ, बारतोंडी इ.यजमान फळझाडे: सिताफळ, रामफळ, डाळींब आवळा, बोर.               यजमान खुरटी झुडपे: कन्हेर, रुई, घायपात, गुलतुरा, तरवड ही पिके आहेत.          आंतरपिचंदन व यजमान वृक्षाची लागवड करताना दोन ओळींमध्ये किमान १० फूट जागा उपलब्ध होऊ शकेल. या जागेत पहिले ४-५ वर्षापर्यंत हरभरा, उडीद, मूग, भुईमूग अशी आंतरपिके घेतल्यास लागवडीस पोषक वातावरण मिळून चंदनाची वाढ जोमदार होते. आंतरपीक घेताना जमीन नांगरणी/वखरणी केली जाते. शेताला पाणी, खते दिली जातात. कडधान्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते. नत्राचे प्रमाण वाढते. या सर्वांचा चंदन वाढीस फायदा होतो. या पिकांबरोबरच औषधी वनस्पतींमध्ये सर्पगंधा, अश्वगंधा, सफेद मुसळी, शतावरी, कोरफड अशी पिके घेता येतात.   

अधिक वाचा: चंदन लागवडीसाठी रोपवाटिका कशी तयार करावी?

जमीनलाल, काळी, चिकणमाती ते वाळू मिश्रीत लोहयुक्त, उत्तम निचरा होणारी, उत्तम उपजावू चिकण माती व नदी काठच्या निचऱ्याच्या पोयटायुक्त जमिनीत चंदनाची वाढ अगदी जोमाने होते. पाणी दिल्यानंतर विस्तारणारी माती, तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम व पोटॅशयुक्त जमीन झाडाची उंची व घेर वाढीस फायदेशीर ठरते. जमिनीचा सामू हा ६.५ ते ८.२ असणारी जमीन चंदन लागवडीस योग्य समजली जाते.

हवामानचंदनाने झाड हे ६०० ते १,६०० मि.मी. पर्जन्यमान असलेल्या पर्जन्यमान असलेल्या प्रदेशात व १२ ते ४५ डी. से. तापमानात चांगले वाढते. साधारणपणे थंड हवा, मध्यम पर्जन्यमान व भरपूर सुर्यप्रकाश तसेच भरपूर काळ कोरडी हवा चंदनास उत्तम ठरते.

पाणीचंदनाच्या झाडाला पहिल्यावर्षी ठिबकने आठवड्यातून २ ते ३ वेळा पाणी द्यावे. दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी आठवड्यातून २ वेळा पाणी ठिबकने द्यावे. चौथ्या वर्षापासून चंदनास नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये पाणी देण्याची गरज नसते. तसेच जानेवारी ते जून या काळात आठवड्यातून एकदा पाणी द्यावे. पावसाळ्यात पाऊस असल्यास पाण्याची आवश्यकता नसते. मात्र पावसाने ताण दिल्यास गरजेप्रमाणे महिन्यातून २ वेळा तरी पाणी द्यावे.

आंतरमशागतलागवडीनंतर प्रत्येक वर्षी ऑक्टोबरमध्ये १ मीटर व्यासाची वर्तुळाकार माती कुदळीने १५ सेमीपर्यंत खोदून कल्पतरू सेंद्रिय खत २५० ग्रॅम ते १ किलोपर्यंत आवश्यकतेनुसार झाडाच्या वयाप्रमाणे तसेच सुगंधी गाभ्याची अधिक वाढ होण्यसाठी सप्तामृताच्या फवारण्या दर महिन्याला कृषी विज्ञान केंद्रातील तज्ञांच्या सल्ल्यानुसार कराव्यात.

रोग व किडचंदनावर शक्यतो नुकसानकारक जैविक अथवा बुरशी रोगाचा प्रादुर्भाव आढळत नाही. परंतु जंगलातील जुनाट झाडांवर स्पाईक रोग मायक्रोप्लाझमा सदृश्य जिवाणूपासून झाल्याचा आढळून आला आहे. किडीमध्ये मुंगे हे रात्री पानांच्या कडा कुरतडत मधल्या शिरेकडे खात जातात. हे किडे पानांच्या खालच्या बाजूस अथवा पानाच्या गुंडाळीत अथवा जाळे बनवलेल्या पानात दिवसा आढळतात. त्याचबरोबर रस शोषणारी अळी, खोडपोखरणारी अळी, वाळवी या किडींचा प्रादुर्भाव चंदनावर आढळून येतो. यांचा प्रादुर्भाव होऊ नये. याकरिता कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सप्तामृताच्या फवारण्या वेळीच कराव्यात. प्रादुर्भाव झाल्यावर नुकसानीची पातळी ओलांडण्यापुर्वी रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी. मात्र सतत रासायनिक किटकनाशकाचा वापर शक्यतो टाळावा. म्हणजे त्याचा चंदनाच्या गाभा व तेलाच्या दर्जावर परिणाम होणार नाही.

काढणीचंदनाचे झाड साधारण ३०-६० वय वर्षापर्यंत तोडणीयोग्य होते.

उत्पन्नचंदन हि हळूहळू वाढणारी प्रजाती आहे. चंदनाचा खोड/गाभा १० व्या वर्षापासून परिपक्व होतो. खालील तक्त्यात दिलेल्या उंची आणि घेर या तपशिलाप्रमाणे झाड काढणी योग्य झाले कि नाही ते कळते.

सरासरी खोड/गाभा (प्रति/झाड)

वय (वर्ष)

घेर (से.मी)

उत्पन्न (किलो)

१०

१०

२०

२२

३०

३३

१०

४०

४४

२०

५०

५५

३०

चंदनाचा गाभाचंदनापासून सुगंधी गाभा व त्यापासून तेल मिळते. सुगंधी गाभा हा तुरट, कडू, ताप निवारक, थंड, उल्हासित, कडक, जड, टिकाऊ, मधुर आणी तिव्र वासाचे, दोष विरहीत पिवळसर अथवा तपकिरी रंगाचे, सरळ घट्ट दाणेदार व एक साच्याचे तंतुमय तेलकट गाठी विरहीत असतो. फिक्या रंगाच्या गाभ्यामध्ये गडद रंगाच्या गाभ्यापेक्षा तेलाचे प्रमाण जास्त असते. चंदन तेलाचे प्रमाण १० वर्षापेक्षा जास्त वयाच्या झाडात ०.२ ते २%, तर परिपक्व झाडात २.८ ते ५.६% असते. मुळापासून शेंड्याकडे ४५% पर्यंत तेलाचे प्रमाण कमी होत जाते तर गाभ्याच्या मध्यबिंदूपासून ते बाह्य भागापर्यंत २०% पर्यंत कमी होत जाते. गाभा तयार होण्याचे काम ४ वर्षाच्या पुढे सुरू होते. तर नैसर्गिक रित्या ते ७ वर्षाच्या पुढे होते. १२ ते १५ वर्षात १२ ते १५ सेंमी व्यासाच्या वृक्षापासून ३० ते ३५ किलो सुगंधी गाभा मिळू शकतो.गाभ्यापासून तेलगाभ्याच्या पावडरवर वाफेच्या उर्ध्व पतनाची क्रिया करून तेल काढले जाते. त्यास जगभर 'इस्ट इंडियन सँडलवूड ऑईल' या नावाने ओळखले जाते. बाह्य लाकडा पासून दुर्मिळ वस्तू, खेळणी, कॅरम गोट्या (कॉईन) बनविल्या जातात. तर ताज्या पानांपासून फिक्कट पिवळे मेण मिळते.

चंदन लागवड करतानाखाजगी जमिनीमध्ये चंदनाची लागवड करण्यसाठी परवानगी लागत नाही. परंतु प्रजाती तोडण्यासाठी विभागीय अधिकाऱ्याकडे परवानगी घेणे गरजेचे असते. चंदन एक संरक्षित वण प्रजाती आहे, त्यामुळेतोडणीस आणि विक्रीस वनरक्ष कायदा १९५६ अंतर्गत पुरवठा परवानगी घेणे आवश्यक आहे. लागवड केल्यानंतर जमिनीचा सातबारा नमुन्यामध्ये नोंद करून घ्यावी आणि संबंधित वन अधिकाऱ्याच्या आपल्या प्रक्षेत्रावर चंदन लागवड असल्याचा दाखला प्राप्त करून घ्यावा.

चंदन लागवडीसाठी अर्ज सदर करतांना लागणारी कागदपत्रे- वृक्ष तोडीचा नमुना नं.१लागवड असलेल्या जमिनीचा सातबारालागवड असलेल्या क्षेत्राचा ८ अलागवड असलेल्या जमिनीचा नकाशालागवड असलेल्या जमिनीच्या चतु:सीमा१२ हेक्टर पेक्षा कमी जमिन असल्याचे प्रमाणपत्रउन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्रपुन: वृक्ष लागवड करणार असलायचे हमीपत्र (१०० रुपयांच्या स्टांप पेपरवर)

डॉ. स्नेहल दातारकर, प्रा. अमोल नागमोतेकृषी विभाग, जी एच रायसोनी विद्यापीठ, साईखेडा, छिंदवाडा

टॅग्स :शेतकरीशेतीपीकसरकार