Lokmat Agro >स्मार्ट शेती > Bhajipala Sheti : भाजीपाला पिकांची लागवड करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींचा अभ्यास कराल? वाचा सविस्तर

Bhajipala Sheti : भाजीपाला पिकांची लागवड करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींचा अभ्यास कराल? वाचा सविस्तर

Bhajipala Sheti : What to study before cultivation of vegetable crops? Read in detail | Bhajipala Sheti : भाजीपाला पिकांची लागवड करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींचा अभ्यास कराल? वाचा सविस्तर

Bhajipala Sheti : भाजीपाला पिकांची लागवड करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींचा अभ्यास कराल? वाचा सविस्तर

भाजीपाला लागवडीचे नियोजन करत असाल तर लागवड करता असताना लागवडीसाठी लागणारे काही महत्त्वाच्या घटक म्हणजे जमीन, पाणी, खते, सूर्यप्रकाश, औषधे, चांगल्या गुणवत्तेची रोपे/बियाणे इ. गोष्टींची उपलब्धता आहे का हे पाहूनच पुढे जावे.

भाजीपाला लागवडीचे नियोजन करत असाल तर लागवड करता असताना लागवडीसाठी लागणारे काही महत्त्वाच्या घटक म्हणजे जमीन, पाणी, खते, सूर्यप्रकाश, औषधे, चांगल्या गुणवत्तेची रोपे/बियाणे इ. गोष्टींची उपलब्धता आहे का हे पाहूनच पुढे जावे.

शेअर :

Join us
Join usNext

भाजीपाला लागवडीचे नियोजन करत असाल तर लागवड करता असताना लागवडीसाठी लागणारे काही महत्त्वाच्या घटक म्हणजे जमीन, पाणी, खते, सूर्यप्रकाश, औषधे, चांगल्या गुणवत्तेची रोपे/बियाणे इ. गोष्टींची उपलब्धता आहे का हे पाहूनच पुढे जावे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
- भाजीपाला लागवडीसाठी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर केल्यास कमी पाण्यातही उत्पादन घेता येते. त्याचबरोबरच विद्राव्य खतांचा वापर प्रभावीपणे होतो.
- बदलत्या तापमानामुळे उन्हाळ्यात भाजीपाला पिकवणे कठीण झाले आहे. म्हणून ५०% शेडनेटचा वापर करून तापमान नियंत्रण करता येते. त्यामुळे उन्हाळ्यातही पालेभाज्या व फळभाज्यांचे उत्पादन घेऊन चांगले उत्पन्न मिळवता येते.
- याशिवाय तापमान कमी करण्यासाठी तुषार सिंचन प्रणाली वापरणे फायदेशीर ठरते.

भाजीपाला लागवडी अगोदर कोणत्या गोष्टींचा अभ्यास करावा?
१) सध्याच्या बाजारपेठेतील मागणी पाहता, सेंद्रिय भाजीपाल्याला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त सेंद्रिय खते व निविष्ठांचा वापर करून भाजीपाला पिकवल्यास ग्राहकांची पसंती मिळेल आणि त्यातून चांगला नफा मिळू शकतो.
२) उन्हाळ्यात भाजीपाला लागवड केल्यास बाजारात चांगला दर मिळतो, मग ते पालेभाज्या असोत की फळभाज्या, वातावरणातील बदलामुळे भाजीपाला शेतीत अडचणी वाढल्या आहेत. आपण या अडचणींना संधी मानून उन्हाळ्यात भाजीपाला पिकवून चांगला नफा मिळवू शकतो.
३) मार्केटचा सखोल अभ्यास असणे महत्त्वाचे आहे. बरेच शेतकरी ज्या भाजीपाल्याला जास्त दर असतो त्याचीच लागवड करतात, परंतु नंतर त्याच मालाची बाजारात भरपूर आवक झाल्यामुळे दर घसरतात. त्यामुळे बाजारपेठेचा अभ्यास करून योग्य पिकाची निवड करणे गरजेचे आहे.

भाजीपाला लागवडीतील अडचणी
भाजीपाला लागवडीमधील अडचणी पहिल्या तर इच्छाशक्तीचा अभाव, वातावरणातील बदल, मजुरांची कमी उपलब्धता, अतिवृष्टी, उच्च तापमान, जीवघेणी थंडी या नैसर्गिक अडचणी आहेत.

भाजीपाला उत्पादकता कशी वाढवावी?
जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर, चांगल्या वाणाचे बियाणे वापरणे आवश्यक आहे. तसेच गुणवत्तापूर्ण रोपांची लागवड करणे, रोग व किड प्रतिबंधक उपाययोजना करणे, उपयुक्त जिवाणू व बुरशींचा वापर परसबागेत करणे आवश्यक असल्याचे ते सांगतात.

कोणती पिके फायदेशीर ठरू शकतात?
फायदेशीर पिकांचा विचार करता मेथी, पालक, कोथिंबीर, कोबी, बीटरूट, फ्लॉवर, मिरची, वांगी यांची वर्षभर चांगली मागणी असते.

खर्च नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना
लागवड करत असताना खर्चावर नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक असून त्यासाठी जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करणे, जैविक सेंद्रिय निविष्ठांचा वापर करणे, रोग व किड प्रतिबंधक उपाययोजना केल्यास पुढील खर्च टाळता येतो, तसेच नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यासही खर्चावर नियंत्रण येते.

भाजीपाला पिकातील संधी
२० गुंठ्यातही भाजीपाला लागवड शक्य आहे. त्याचप्रमाणे स्थानिक बाजारपेठेत भाजीपाल्याची विक्री करून चांगले उत्पन्न मिळवता येते. शिवाय विक्री दरम्यान शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीची संकल्पना प्रत्यक्षात उतरवता येईल. ८-१० जणांचा गट करून उच्च प्रतिचा भाजीपाला इतर बाजारपेठेत विकू शकतो.

- प्रविण ननावरे
भाजीपाला रोपवाटिका तज्ञ

Web Title: Bhajipala Sheti : What to study before cultivation of vegetable crops? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.