Lokmat Agro >स्मार्ट शेती > फळबागेचा केला अंगीकार; भंडारा जिल्ह्यातील शेतकरी मालामाल

फळबागेचा केला अंगीकार; भंडारा जिल्ह्यातील शेतकरी मालामाल

Bhandara district farmers are getting income from horticulture | फळबागेचा केला अंगीकार; भंडारा जिल्ह्यातील शेतकरी मालामाल

फळबागेचा केला अंगीकार; भंडारा जिल्ह्यातील शेतकरी मालामाल

जिल्ह्यात आंबा व पेरूकडे शेतकऱ्यांचा वाढता कल; धान पिकाला फळबाग ठरतोय हमखास पर्याय

जिल्ह्यात आंबा व पेरूकडे शेतकऱ्यांचा वाढता कल; धान पिकाला फळबाग ठरतोय हमखास पर्याय

शेअर :

Join us
Join usNext

मुख बागडे

भंडारा जिल्हा भातावर भिडला ही म्हण बाजूला सारत काळानुरूप जिल्ह्यात फळबागेला चांगले दिवस येत आहेत. २७२.४० हेक्टर आर क्षेत्रफळावर फळबाग लागवड केलेली आहे. शासनाचेही लक्ष फळबागेकडे वळलेले आहे. आंबा व पेरूच्या विक्रीतून शेतकरी निश्चितच मालामाल होत आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक १७२.३० हेक्टर आर जागेवर आंबा बागायतीची लागवड आहे. त्यानंतर पेरू ३२.४० हे. आर जागेवर आहे. सीताफळ २१.९० हे.आर, बोर ३.४० हे., चिकू ४.९० हे., लिंब ६ हे, केळी ६.२० हे. क्षेत्रफळावर लागवड केली आहे. कृषी विभागामार्फत मग्रारोह व भाऊसाहेब फुंडकर योजनेअंतर्गत अनुदानावर फळबाग लागवड नियोजित आहे. शेतकऱ्यांनी अधिकाधिक क्षेत्रात फळबाग लावावे, असे आवाहनही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संगीता माने यांनी केले आहे.

सरी वरंब्यावर लागवड फायद्याची
इस्रायल तंत्रज्ञान भारतातसुद्धा वापरले जात असून सरी वरंब्याचा आधार घेत डीप मल्चिंगच्या माध्यमातून कमी पाण्यात उत्तम बाग फुलवली जाते. पाच फायद्याची आहे. बाय पाच घनमीटर अंतरानुसार एक हेक्टर जागेत कमीत कमी ४०० झाडांची लागवड केली जाते. यात आणखी काही झाडे लावण्याची मुभा कृषी विभागाने पुरवलेली आहे.

दोन एकरात पाच लाखांचे उत्पन्न
सव्वा एकर (०.५०) हे. आर जागेत आंब्याची बाग लागवडीखाली आहे. यात २.५० टन उत्पन्न हाती आले. सरासरी पन्नास रुपये किलोच्या दराने लक्ष रुपयाचे उत्पन्न झाले.
-कवडू शांतलवर, माडगी, ता. भंडारा

चार वर्षांत उत्पन्न हातात
फळबाग लागवडीनंतर सरी वरंब्याचा आधार घेत लागवड केल्यास सहा महिने लवकर उत्पन्न हाती येते. झाडांची वाढसुद्धा दीडपटीने वाढून येते. लागवडीपासून उत्तम नियोजन केल्यास फळबागेतून चार वर्षांत उत्पन्न मिळते. पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सलग क्षेत्रात फळ बागायतीकडे अधिक लक्ष पुरवावे. वार्षिक उत्पन्न वाढविण्याकरिता निश्चितच फळबाग फायद्याची आहे.
- किशोर पाथरीकर, उपविभागीय कृषी अधिकारी, साकोली

शेतकयांनी आंब्याची प्रति एकर १० झाडे व फणसाची ३ झाडे बांधावर निश्चितच लावावी. इतर उत्पन्नाबरोबर फळबागेतूनही मिळणारे उत्पन्न अधिक आहे. गत महिनाभरापासून आंब्याच्या विक्रीतून शेतकऱ्यांना नगदी रुपये मिळत आहेत.
-विनायक बुरडे, जेवणाळा

Web Title: Bhandara district farmers are getting income from horticulture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी