Lokmat Agro >स्मार्ट शेती > Borewell Recharge विहीर तसेच कुपनलीका पुनःर्भरणची शास्त्रीय पद्धत

Borewell Recharge विहीर तसेच कुपनलीका पुनःर्भरणची शास्त्रीय पद्धत

Borewell Recharge A classical method of well as well as wellbore recharge | Borewell Recharge विहीर तसेच कुपनलीका पुनःर्भरणची शास्त्रीय पद्धत

Borewell Recharge विहीर तसेच कुपनलीका पुनःर्भरणची शास्त्रीय पद्धत

मागील काही वर्षापासून पाऊसमान कमी झाल्यामुळे पिकांसाठी विहीरीतून किंवा कुपनलिकेतून पाण्याचा उपसा वाढलेला आहे. तसेच पाणी असल्यास त्याचा उपसा अनियंत्रीत, अमर्याद असल्याचे आढळून आलेले आहे.

मागील काही वर्षापासून पाऊसमान कमी झाल्यामुळे पिकांसाठी विहीरीतून किंवा कुपनलिकेतून पाण्याचा उपसा वाढलेला आहे. तसेच पाणी असल्यास त्याचा उपसा अनियंत्रीत, अमर्याद असल्याचे आढळून आलेले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

गेल्या काही वर्षापासून हवामान बदलाचे परिणाम प्रकर्षाने दिसून येत आहेत. दिवसेंदिवस पावसाच्या प्रमाणात बदल होत आहे. पाऊस कधी अधिक तर कधी कमी पडतो आहे. तसेच प्रत्यक्ष जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी होत आहे. गेल्या काही वर्षापासून सातत्याने दुष्काळाच्या झळा महाराष्ट्राला सोसाव्या लागत आहे.

मागील काही वर्षापासून पाऊसमान कमी झाल्यामुळे पिकांसाठी विहीरीतून किंवा कुपनलिकेतून पाण्याचा उपसा वाढलेला आहे. तसेच पाणी असल्यास त्याचा उपसा अनियंत्रीत, अमर्याद असल्याचे आढळून आलेले आहे. परंतु त्या प्रमाणात पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण होत नसल्याचे दिसून येत आहे व उन्हाळ्यात बहुतांश विहीरी व कुपनलिका कोरडया झालेल्या दिसतात.

या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाने विहीर तसेच कुपनलिका
पुनर्भरण तंत्रज्ञान विकसीत केले आहे.

विहीर पुनर्भरण तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी शेतजमिनीतून वाहणारे पावसाचे पाणी एकत्रितपणे वळवून विहीरीजवळ आणावे. या पाण्याचा उपयोग विहीर पुनर्भरणासाठी करावा. परंतु हे पावसाचे वाहणारे पाणी सरळ विहीरीत सोडू नये, कारण वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यात माती सरळ विहीरीत सोडु नये, कारण वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यात माती, गाळ मिश्रण असते. जर असे पाणी सरळ विहीरीत सोडले तर विहीरीत गाळ साठत जातो.

- या सयंत्रात दोन प्रकारच्या गाळण यंत्रणा आहेत. यामुळे पावसाच्या पाण्याबरोबर येणारा गाळ अडविला जातो. शुध्द पाणी विहीरीत सोडले जाते.
- शेतकऱ्याने आपल्या शेताच्या रचनेनुसार पावसाचे वाहते पाणी गाळण यंत्रणेकडे वळवावे.
- शेतातले पाणी सरळ टाक्यात घेण्याऐवजी टाक्याबाहेर एक साधा खड्डा करुन त्यात दगड गोटे, रेती टाकावेत. त्यातुन एका पीव्हीसी पाईपचे पाणी प्रथम प्राथमिक गाळण यंत्रणेत घ्यावे. शेताकडील चारीद्वारा वाहणारे पाणी प्रथम प्राथमिक गाळण यंत्रणेत घ्यावे.
- मुख्य गाळण यंत्रणेच्या अलीकडे १.५ मीटर x १ मीटर x १ मीटर आकाराची दुसरी टाकी बांधावी. त्याला प्राथमिक गाळण यंत्रणा असे म्हणतात.
- शेतातून वाहत येणारे पाणी प्रथम या टाकीत घ्यावे. तेथे जड गाळ खाली बसून, थोडे गढूळ पाणी पीव्हीसी पाईपच्या माध्यमातून किंवा खाचे द्वारे मुख्य गाळण यंत्रणेत सोडावे.
- विहीर पुनर्भरण मॉडलेच्या दुसऱ्या भागाला मुख्य गाळण यंत्रणा असे म्हणतात. ही यंत्रणा विहीरीपासुन २ ते ३ मीटर अंतरावर बांधावी. यासाठी २ मी लांब न २ मी. रुंद आणि २ मी खोल खड्डा करावा. याला आतून सिमेंट विटाचे बांधकाम करुन टाकीसारखे बांधुन घ्यावे.
- यात मुख्य गाळण यंत्रणेच्या खालील भागातून चार इंच व्यासाचा पीव्हीसी पाईप विहीरीत सोडावा.

या टाकीत ३० से.मी. उंचीपर्यंत मोठे दगड नंतर ३० से.मी. उंचीपर्यंत छोटे दगड त्यानंतर ३० सें. मी जाडीचा वाळूचा थर टाकावा. असे ९० सें.मी. जाडचे गाळण थर असावे. त्यावरील ६० सें.मी. भागात पाणी साठते. या गाळण यंत्रणेमार्फत पाणी गाळले जाऊन विहीरीत जाते. साधरणतः दोन एकर क्षेत्रातून वाहणारे पावसाचे पाणी विहीर पुनर्भरणासाठी वापरले तर निश्चितच २ ते ३ वर्षात पाणी पातळीत १.५ ते २ मीटरपर्यंत वाढ दिसून येते.

पाण्याचा शाश्वत स्त्रोत निर्माण होऊ शकतो. उपलब्ध पाण्याचा वापर तुषार सिंचनाच्या माध्यमातून केल्यास पिकांचे शाश्वत उत्पादन मिळु शकते. शेतकऱ्यानी स्वतः वाळु, विटा, सिमेंट खरेदी करुन बांधकाम केल्यास १०,००० रुपयापर्यंत खर्च येवू शकतो. एकदा हे बाधकाम व्यवस्थित केले, तर त्याचे आयुष्यमान १२ ते १५ वर्ष राहते. फक्त दर दोन वर्षांनी गाळण टाकी आणि साहित्याची स्वच्छता करावी

कुपनलिका पुनर्भरण तंत्रज्ञान
कुपनलिका पुनर्भरण संयंत्र दोन भागात विभागले आहे. प्रथम भाग म्हणजे प्राथमिक गाळण यंत्रणा शेतातील पावसाचे वाहते पाणी चरांद्वारे वळवून एकत्रित रित्या प्राथमिक गाळण यंत्रणेपर्यंत आणावे. प्राथमिक गाळण यंत्रणेत १ x १ x १ मीटर चा खड्डा तयार करुन यात मोठे व छोटे दगड टाकावे व आतून ३ इंच व्यासाचा पीव्हीसी पाईप मुख्य गाळण यंत्रणेत सोडावा.

प्राथमिक गाळण यंत्रणेमुळे पावसाच्या पाण्याबरोबर वाहून येणारा काडी कचरा, तसेच काही प्रमाणात गाळ अडविण्यास मदत होईल व मुख्य गाळण यंत्रणेत कमी गाळाचे पाणी जाऊन मुख्य गाळण यंत्रणेची कार्यमान आयुष्य वाढविण्यास मदत होईल.

दुसरा भाग म्हणजे मुख्य गाळण यंत्रणा यात कुपनलीकेच्या सभोवताल १.५ मीटर व्यासाचा २.० मीटर खोल खड्डा करावा त्यातील माती वर काढून घ्यावी. तसेच केसींग पाईप पूर्णपणे स्वच्छ करुन घ्यावा. केसींग पाईपला खालून ५० सेंमी उंचीपर्यंत बारीक छिद्र करावे व त्यावर नायलान जाळीने झाकून पक्के बांधावे. नंतर खालून ५० सेमी उंचीपर्यंत मोठे दगड त्यानंतर ५० सेंमी उंचीपर्यंत छोटे दगड व त्यावर ३० सेंमी उंचीपर्यत मोठी वाळू व त्यावर २० सेंमी उंचीपर्यंत बारीक वाळुचे थर घ्यावे.

यानंतर सिमेंट रिंग १.५ मीटर व्यासाची ठेवून मुख्य गाळण यंत्रणेचे काम पूर्ण करावे. वरच्या भागात सिमेंट रिंग ठेवण्याचा उद्देश म्हणजे बाजूची माती खड्यात किंवा गाळण साहित्यावर पावसामुळे घसरुन पडणार नाही व एकंदरीत संपूर्ण संयंत्र दिर्घ काळापर्यंत सुरक्षित व सुस्थितीत राहील.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी च्या प्रक्षेत्रावर सर्व संशोधन केंद्र तसेच महाविद्यालयाच्या परीसरातील सर्व कुपनलिकांचे पुनर्भरणाचे काम पावसाळयापूर्वी करण्यात आले. विद्यापीठ मुख्यालयाच्या प्रक्षेत्रावर एकुण २८ कुपनलिकांचे पुनर्भरण शास्त्रीय पध्दतीने करण्यात आले.

तसेच विद्यापीठ अंतर्गत असलेले अंबाजोगाई येथील चार ठिकाणी, बदनापूर येथील सात ठिकाणी कुपनलिका पुनर्भरण करण्यात आले. यावर्षी ५० टक्यापेक्षा कमी पाऊस पडून देखील विहीरीच्या पाणीपातळीत ३ मीटरपेक्षा अधिक वाढ झालेली आढळून येत आहे व त्या पाण्याचा उपयोग रबी पिकांच्या सिंचनासाठी होत आहे.

डॉ. मदन पेंडके
कृषि अभियंता, अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन केंद्र, व.ना.म.कृ.वि., परभणी
९८९०४३३८०३

अधिक वाचा: Water Scarcity पाणी टंचाई मधून आपण बोध कधी घेणार?

Web Title: Borewell Recharge A classical method of well as well as wellbore recharge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.