जगात ब्राझील, भारत. इंडोनेशिया, मोझांबिक, नायजेरिया, टांझानिया या प्रमुख देशांमध्ये काजूची लागवड केली जाते. जगामध्ये भारताचा काजूच्या लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादनात पहिला क्रमांक लागतो.
आवश्यक जमीन व हवामानपाण्याचा निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत काजूचे पीक चांगले येते. विशेषतः जांभ्या दगडापासून तयार झालेल्या वरकस जमिनीत काजूचे झाड चांगले पोसते. समुद्रसपाटीपासून ७०० मीटर उंचीपर्यंत काजूचे पीक चांगले येते. कोकणातील उष्ण व दमट हवामान या पिकासाठी फारच अनुकूल आहे.
सुधारित जाती- विद्यापीठाने काजूच्या उन्नत जाती लागवडीसाठी विकसित केल्या आहेत.- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने वेंगुर्ला २, ४, ६, ७, ८, ९ या काजूच्या सुधारित जाती विकसित केल्या आहेत.- प्रति झाड १५ ते २० किलो उत्पन्न मिळते.- एका किलोमध्ये बियांची संख्या १०० ते १६० असते, तर गराचे प्रमाण ३० ते ३१ टक्के आहे.- बोंडाचा रंग पिवळा, नारंगी, तांबडा असतो.- अधिक उत्पन्नासाठी विद्यापीठ प्रमाणित काजूची लागवड करण्यात येते.- कीडरोग व्यवस्थापन वेळेवर करणे गरजेचे आहे.
लागवड, खड्डा कसा काढावा वव भरावा?- काजूची लागवड कलमे लावून करतात.- एप्रिल किंवा मे महिन्यात सात बाय सात मीटर किंवा ८ बाय ८ मीटर अंतर ठेवून खड्डे खोदावेत.- हेक्टरी १५५ ते २०० झाडे बसतात.- खड्ड्यांची लांबी, रुंदी, खोली ०.६ बाय ०.६ बाय ०.६ मीटर असावी.- खड्यात दीड ते दोन घमेली चांगले कुजलेले कंपोस्ट, १/२ किलो सिंगल सुपर फॉस्फेट किंवा हाडाची पूड मातीत मिसळावी.- वाळवी नियंत्रणासाठी १.५ टक्का क्लोरपायरीफॉस (या किटकनाशकास लेबल क्लेम नाही) ५० ग्रॅम भुकटी प्रति खड्यात टाकावी.
लागवडीची वेळकाजूची लागवड पावसाळ्याच्या सुरुवातीस जून-जुलैमध्ये करावी. पाणीपुरवठ्याची सोय असल्यास यानंतरही लागवड केलेली चालू शकते.
लागवड करताना घ्यावायची काळजी- प्लास्टीकची पिशवी चाकू किंवा ब्लेडने कापून अलगदपणे काढून टाकावी.- कलमांची हंडी फुटणार नाही, याची काळजी घ्यावी, अन्यथा कलम दगावण्याची शक्यता असते.- कलमांना काठीचा आधार द्यावा. कलमाच्या खुंटावर जोडाखाली येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी, तसेच कलमाच्या जोडावरील प्लास्टीक पट्टी काढून टाकावी.- पाऊस कमी झाल्यावर ऑक्टोबरमध्ये कलमांच्या बुंध्याभोवती १.५ टक्का क्लोरपायरीफॉस टाकून गवत किंवा काळ्या प्लास्टीक कागदाचे आच्छादन करावे. त्यामुळे जमिनीतील ओलावा धरून ठेवण्यास मदत होते.
पाणी व्यवस्थापनपहिल्या वर्षी हिवाळ्यात दर १५ दिवसांनी, तर उन्हाळ्यात दर आठ दिवसांनी प्रति कलम १५ लीटर पाणी घालावे. कलमांचे मोकाट जनावरांपासून व आगीपासून संरक्षण करावे.
आंतरपीककोकणातील जांभ्या जमिनीवर सात बाय सात मीटर अंतरावर काजू लागवडीमध्ये सुरुवातीच्या काळात नाचणी, वरी, उडीद, कारळा या पिकांमध्ये कारळा हे पीक जास्त फायदेशीर ठरते.
खत व्यवस्थापनकाजूची झाडे खतास चांगला प्रतिसाद ४ घमेली शेणखत/हिरवळी खत, दोन किलो युरिया, १.५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट व ५०० ग्रॅम म्युरेट ऑफ फॉस्फेट ही खते ऑगस्ट महिन्यात द्यावी.
अधिक वाचा: Jamun Cultivation बाजारात या फळाला मिळतोय चांगला बाजारभाव; कशी कराल लागवड?